Translate :

Sponsored

Medical Student Gang Raped In Sangali : सांगलीमध्ये मेडिकलच्या विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार ; 3 आरोपींना अटक

Medical Student Gang Raped In Sangali -सांगली जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. एमबीबीएसच्या ( Medical Student ) एका विद्यार्थीनीवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. 

सांगली : 2025-05-23

महाराष्ट्रातील सांगली (Sangali )  जिल्ह्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. संपूर्ण परिसर या घटनेने हदरून गेला आहे. एमबीबीएस करणाऱ्या मेडिकलच्या एका विद्यार्थ्यीनीवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना उघटकीस आली आहे. एमबीबीएसच्या  (Medical Student )  तिसऱ्या वर्षात शिकत असल्याल्या सदर तरूणीवर तिच्याच ओळखीतल्या काही तरूणांनी हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. पोलीसांनी त्वरीत कारवाई करत, हे कृत्य करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली आहे.  संपूर्ण प्रकरण पाहता, व्यवस्थित प्लॅन करून हे कृत्य केल्याचे दिसून येत आहे. 

विशेष म्हणजे सर्व आरोपी हे 20 ते 22 वर्ष या वयोगटातील आहेत. पुणे, सोलापुर आणि सांगली अशा भागातील हे रहिवासी आहेत. पिडीत तरूणी ही सांगली मधील एका प्रतिष्ठित मेडिकल महाविद्यालयाची विद्यार्थ्यीनी आहे. येथे शिकत असताना, तिची येथील दोन मुलांशी ओळख झाली होती. या ओळखीमुळेच, या मुलांनी पिडीत तरुणीला बाहेर फिल्म बघायला जाण्याच्या अमिषाने एका फ्लॅटवर घेऊन गेले होते. तिथे त्यांनी तिला कोल्ड्रिंगमधून नशीला पदार्थ देऊन बेशुद्ध केले. बेशुद्धीतच तिच्यावर तीन जणांनी सामुहिक बलात्कार केला. शुद्धीत आल्यावर पिडितेने तत्काळ पोलीस स्टेशनला धाव घेतली. 

पिडीताच्या साहसाचे कौतुक 

पिडीत मुलीला शुद्ध आल्यावर तिन नराधमांनी तिला धमकावलेसुद्धा. जर तिने कोणाला काही सांगितले तर, फार वाईट करू अशी धमकी दिली गेली. मात्र तिने त्यांना न घाबरता, धाडसाने पोलीसात तक्रार दिली. तिच्या या धाडसामुळे आणि त्वरीत निर्णय घेण्याने तीनही आरोपींना काही तासातच अटक करण्यात यश आले. 

विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार करण्यात आली होती. पोलीसांनी त्वरीत शोध घेऊन, आरोपींना जेरबंद केले. आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या सामुहिक बलात्काराशी संबंधीत कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने तिघांनाही 27 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

घटनेविषयी पिडीतेच्या पालकांना समजताच त्यांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली. पोलीससुद्धा या प्रकरणाचा गंभीरते तपास करत आहेत. फॉरेंसिक रिपोर्ट, कॉल रेकॉर्डर्स आणि घटनास्थळी मिळालेल्या वस्तूंच्या सहाय्याने पुढील तपास सुरू आहे. 

 

 

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored