Translate :

Sponsored

MBA Entrance Exam, Good News, 2026 : मॅनेजमेंट प्रवेशाची कॅट परीक्षा ‘या’ तारखेला होणार, जाणून घ्या परीक्षा पॅटर्न आणि महत्त्वपूर्ण बदल होणार : Cat 2026 MBA Entrance Exam Date Pattern Syllabus Iim Admissions

मॅनेजमेंट प्रवेशाची कॅट परीक्षा 'या' तारखेला होणार, जाणून घ्या परीक्षा पॅटर्न आणि महत्त्वपूर्ण बदल होणार

MBA Entrance Exam : देशातील प्रतिष्ठित बिझनेस स्कूल्समध्ये प्रवेशासाठी घेतली जाणारी CAT 2026 परीक्षा कधी आणि कोणत्या पॅटर्नवर होणार आहे ? जाणून घ्या याविषयीची सर्व माहिती.

दिल्ली : 27-07-2026

भारतीय व्यवस्थापन संस्थेद्वारे आयोजित CAT 2026 परीक्षा (MBA Entrance Exam) 29 नोव्हेंबर 2026 रोजी घेतली जाईल. ही परीक्षा आयआयएमसह (IIM) देशातील अनेक प्रतिष्ठित बिझनेस स्कूलमध्ये एमबीए आणि इतर पोस्ट ग्रॅज्युएट मॅनेजमेंट प्रोगाम्समध्ये प्रवेशासाठी घेतली जाते. परीक्षेची तयारी कऱणाऱ्या उमेदवारांसाठी उत्तम रणनितीसह परीक्षेत सहभागी होण्यासाठी एक्झाम पॅटर्न आणि मार्किंग स्कीम समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

आधिकारिक सूचनेनुसार, या वर्षी CAT 2026 च्या परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रमामध्ये कोणताही मोठा बदल कऱण्यात आलेला नाही,. परीक्षा पूर्वीप्रमाणेच कॉम्युटर-बेस्ड टेस्ट (CBT) मोडमध्ये होईल आणि ती तीन शिफ्टमध्ये आयोजित केली जाईल. त्यामुळे ज्या उमेदवारांनी मागील वर्षांच्या पॅटर्नच्या आधारावार तयारी केली आहे, त्यांना आपली रणनीती बदलण्याची गरज भासणार नाही.

पेपरमध्ये किति प्रश्न असतील ? (MBA Entrance Exam)

CAT 2026 मध्ये एकूण 68 प्रश्न विचारले जातील. हे प्रश्न तीन वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागलेले असतील. उमेदवारांना प्रत्येक सेक्शनसाठी ठरवून दिलेल्या वेळेतच प्रश्न सोडवावे लागतील. परीक्षेदरम्यान वेळ पूर्ण होण्यापूर्वी एका सेक्शनमधून दुसऱ्या सेक्शनमध्ये जाण्याची परवानगी असणार नाही. संपूर्ण परीक्षेचा कालावधी 120 मिनिटांचा असेल आणि प्रत्येक सेक्शनसाठी 40 मिनिटांचा वेळ मिळेल.

कोणकोणते सेक्शन असतील ? (MBA Entrance Exam)

CAT 2026 च्या प्रश्नपत्रिकेत तीन प्रमुख सेक्शन समाविष्ट असतील. पहिला- व्हर्बल ॲबिलिटी अँड रीडिंग्स कॉम्प्रिहेंशन, ज्यामध्ये भाषा आणि रिडिंग कॉम्प्रिंहेंशनशी संबंधित प्रश्न असतील.

दुसरा – डेटा इंटरप्रिटेशन अँड लॉजिकल रीझनिंग, ज्यामध्ये डेटा विश्लेषण आणि तार्किक क्षमतेची परीक्षा घेतली जाईल. तिसरा – क्वान्टिटेटिव्ह ॲपिटिट्यूड ज्यामध्ये गणित आणि संख्यात्मक योग्यतेशी संबंधित प्रश्न विचारले जातात.

अभ्यासक्रमात काय समाविष्ट असणार आहे ? (MBA Entrance Exam)

CAT 2026 चा सिल्याबसही मागील वर्षांप्रमाणेच असेल. IIM परीक्षेचा सविस्तर अधिकृत सिल्याबस जाहीर करत नाही, प्रामुख्याने VARC, DILR  आणि क्वान्टिटेटिव्ह ॲपट्यिट्युडमधून प्रश्न विचारले जातात. मागील वर्षांच्या ट्रेन्डच्या आधारावर उमेदवारांनी रीडिंग कॉम्प्रिहेंशन, लॉजिकल रीझनिंग, डेटा इंटरप्रिटेशन, अंकगणित, बीजगणित, भूमिती आणि आधुनिक गणित यांसारख्या विषयांवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे,

या वर्षी परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम कोणताही बदल झालेला नसल्यामुळे, उमेदवार मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, मॉक टेस्ट आणि टाईम मॅनेजमेंटवर लक्ष केंद्रीत करू शकतात.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored