Translate :

Sponsored

Rohit Pawar On TET Fraud, Big News, 2026 : TET घोटाळ्यातील आरोपी आणि भाजप नेत्याचे आर्थिक कनेक्शन ! रोहित पवारांचा गंभीर आरोप : Rohit Pawar Press Conference MPSC Fda Drug Inspector TET Exam Paper Leak Allegations

TET घोटाळ्यातील आरोपी आणि भाजप नेत्याचे आर्थिक कनेक्शन ! रोहित पवारांचा गंभीर आरोप .

Rohit Pawar On TET Fraud : एमपीएसी आणि एफडीएने या पेपर लीक प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी रोहित पवार यांनी  केली आहे. तसेच, या प्रकरणाची चौकशी सीबीआयच्या माध्यमातून केली जावी. सीआयडीच्या चौकशीबाबत आमचा पूर्वीचा अनुभव चांगला नाही. त्यामुळे निष्पक्ष तपासासाठी केंद्रीय यंत्रणेकडून चौकशी होणे आवश्यक आहे.

मुंबई : 27-07-2026

महाराष्ट्रात पुन्हा एक पेपरफुटीचा घोटाळा (Rohit Pawar On TET Fraud) समोर आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) एमपीएससी औषध निरीक्षक भरती परीक्षेतील कथित गैरप्रकार आणि टिईटी (TET) घोटाळ्यावरून राजकारण तापलं आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहेत. TET परीक्षा घोटाळ्यातील आरोपी हा भाजपशी संबंधित असून तो एका नेत्याचे आर्थिक व्यवबार सांभाळतो,” असा खळबळजनक आरोप रोहीत पवार यांनी केला आहे.

महाराष्ट्रात एमपीएससी परीक्षेतील पेपरलीकची काही प्रकरणे 2026 मध्ये उघडकीस आली. यात NEET, TET,SRPF या परीक्षांचे पेपर लीक झाले. त्यानंतर आता एफडीए मधील औषध निरीक्षक परीक्षेचाही पेपर लीक झाल्याचा प्रकार समोर आले आहे. पेपरफुटीतून अधिकारी होणार असतील तर काही दिवसांपूर्वी खोकळ्याच्या औषधांनी जसा 22 मुलांचा मृत्यू झाला होता तशा घटना भविष्यात अशा अधिकाऱ्यांमुळे घडू शकतात.” असा दावाही रोहित पवारांनी यावेळी केला.

रोहित पवार म्हणाले, की हे प्रकरण कसं समोर आले, नंदुरबारमधील कौटिल्य ॲकॅडमी क्लासमधून हा पेपर लीक केला गेला. MPSC चा पेपर फुटला असं नाही पण पेपर सेट करणारा व्यक्ती फुटल्याने ज्याने हा पेपर फोडला, त्या व्यक्तीने ज्यांना पेपर दिले त्यांना तो व्हॉटसअपवरून प्रश्नपत्रिका पाठवायचा आणि पाच मिनिटात डिलीट करायचा. त्यातल्या एकानी त्याच्या मित्राला प्रश्नपत्रिका पाठवल्याने हे प्रकरण उघडकीस आले.

‘एका नायब तहसीलदारांच्या दोन्ही मुलांना अव्वल क्रमांक’ (Rohit Pawar On TET Fraud)

रोहीत पवार म्हणाले,” एका नायब तहसीलदारांच्या मुलाला 13 वा आणि मुलीला 16 वा क्रमांक मिळाला आङे. हा केवळ योगायोग आहे का ? असा प्रश्न निर्माण होतो. या प्रकरणात बार्शी कनेक्शन असल्याची माहिती आम्हाला मिळाली असून विद्यार्थ्यांनी 21 जुलै रोजी एमपीएससीकडे तक्रार केली होती. पण त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झाल्याची माहिती नाही. उलट तक्रार कऱणाऱ्यांनाच पोलिसांकडून कारवाईची धमकी दिली जात आहे.”

एमपीएससी आणि एफडीएने या पेपर लीक प्रकरणाती तातडीने चौकशी करावी, अशी मागणी करत रोहित पवार केली. तसेच, या प्रकरणाची चौकशी सीबीआयच्या माध्यमातून केली जावी. सीआयडीच्या चौकशीबाबत आमचा पूर्वीचा अुनभव चांगला नाही. त्यामुळे निष्पक्ष तपासासाठी केंद्रीय यंत्रणेकडून चौकशी होणे आवश्यक आहे, असेही रोहित पवार यांनी नमुद केले.

तलाठी भरतीत 62 गैैरप्रकार उघड झाले ” (Rohit Pawar On TET Fraud)

तलाठी भरती प्रक्रियेचाही उल्लेख करत रोहित पवार म्हणाले, ” तलाठी भरतीतील कथित गैरप्रकरणांचे पुरावे आम्ही मुख्यमंत्र्यांकडे दिले होते. मात्र त्यावर पुढे कोणतीही कारवाई झाली नाही. अखेर विद्यार्थ्यांना न्यायासाठी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (MAT) जावे लागेल. न्यायाधिकरणायच्या निकालात तलाठी भरती प्रक्रियेत 62 गैरप्रकार समोर आल्याचा उल्लेख कऱण्यात आला आहे.”

‘टीईटी घोटाळ्यातील आरोपींचे भाजपशी संबंध’ (Rohit Pawar On TET Fraud)

टीईटी पेपरफुटी प्रकरणाचाही उल्लेख रोहित पवार यांनी काही व्यक्तींवर गंभीर आरोप केले. “2028 मध्ये प्रथम टीईटी पेपरफुटी झाली होती. अलीकडील प्रकरणातही प्रीतीश देशमुख, अभिषेक सावरीकर आणि सुशील खोडवेकर यांची नावे समोर आली आहेत. अभिषेक सावरीकर यांचे कोणाशी संबंध आहेत, त्यांना संरक्षण कोण देत आहे, ते तपासले पाहिजे. टीईटी घोटाळ्यातील आरोपींचे भाजपशी संबंध असल्याता आमचा आरोप आहे,” असे ते म्हणाले.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored