Massajog Sarpanch Election : बीडमधील मस्साजोग सरपंच पोटनिवडणुकीत अश्विनी देशमुख यांचा पराभव झाला असून स्वरुपानंद देशमुख यांनी 92 मतांनी विजय मिळवला आहे. या निवडणुकीत तब्बल 84 टक्के मतदान झाले.
मस्साजोग : 29-04-2026
बीडमधील मस्साजोग येथील सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत (Massajog Sarpanch Election), दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव झाला आहे. स्वरुपानंद देशमुख यांचा 92 मतांनी देशमुख यांचा पराभव झाला. आता मस्साजोगचे नवीन सरपंच स्वरुपानंद देशमुख असणार आहेत.
बीडमधील केज तहसील कार्यालयात मस्साजोगच्या पोट निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पार पडली. मंगळवारी झालेल्या मतदानात एकूण 2080 मतदारांपैकी 1744 मतदारांनी आपला हक्क बजावला होता. त्यामुळे गावात एकूण 84 टक्के मतदान झाले आहे.
दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सर्व गाव या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभा होता. सर्व गाव एकत्रपणे संतोष देशमुखांना न्याय मिळावा म्हणून आंदोलनाला बसायचे. हे चित्र असताना, अश्विनी देशमुख यांचा पराभव कसा झाला ? हे राजकारणातील एक न उलगडणारे कोडे सर्वांना वाटत आहे.
संतोष देशमुख यांची हत्या प्रकरण (Massajog Sarpanch Election)
दीड वर्षांपूर्वी 9 डिसेंबर 2024 ला मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांनी अत्यंत निर्घुण हत्या झाली होती. मारेकऱ्यांनी क्रूरतेचे टोक गाठत, हे कृत्य पार पाडले होते. या प्रकरणात आत्तापर्यंत वाल्मिक कराड आणि इतर काहीजण तुरूंगात आहेत. न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सूरू आहे. गुन्ह्याची क्रूरता पाहता संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी बीडसह संपूर्ण राज्यभरात मोर्चे निघाले होते. संतोष देशमुखांना न्याय मिळावा म्हणून सर्व गाव त्यांच्या पाठीशी उभा राहिला होता. मात्र आज सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत देशमुख कुटुंबाला गावाची ही साथ मिळाली नसल्याचे पहायला मिळत आहे. याचा परिणाम म्हणून संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव झाला आहे.
काय म्हणाले धनंजय देशमुख ? (संतोष देशमुख यांचे बंधू ) (Massajog Sarpanch Election)
” पराभवाची अनेक कारणं आहेत. आमचा भाऊ गेल्यानंतर अनेकांना वाटायचं मला हे काम मिळावं. पण माझ्या हातात काही नव्हतं. न्यायाच्या लढाईत आम्ही असल्याने गावाशी असेलेली नाळ तुटत गेली. भाऊ गेल्यानंतर मला ती टिकवून ठेवता आली नाही. मी पैसे वाटप केल्याचा आरोप कोणावरही केला नाही. त्यांनी जो राजकारण केल्याचा आरोप केला ते त्यांचं मत होतं” असे धनंजय देशमुख यांनी सांगितले.
स्वरुपानंद देशमुखांची संतोष देशमुख यांच्या कुटुंबाशी भेट (Massajog Sarpanch Election)
या निवडणुकीत विजयी झालेले नवे सरपंच स्वरुपानंद देशमुख निकाल जाहीर झाल्यानंतर स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव झाल्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी ते गेले होते. संतोष देशमुख यांच्या न्यायाच्या लढ्यात आपण यापुढे देखील सोबत राहणार असल्याती प्रतिक्रीया स्वरुपानंद यांनी दिली. स्वरुपानंद देशमुख यांनी संतोष देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहाप अर्पण केला. यावेळी धनंजय देशमुख उपस्थित होते.