Translate :

Sponsored

Maharashtra Farmers Sucide, Shocking News, 2026 : तीन महिन्यात महाराष्ट्रातील तब्बल 217 शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला ! कॉंग्रेसची सरकारवर टीका : A 217 Farmers Suicides In Three Months

तीन महिन्यात महाराष्ट्रातील तब्बल 217 शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला ! कॉंग्रेसची सरकारवर टीका. ( फोटो-सोशलमीडिया)

Maharashtra Farmers Sucide : मराठवाडा हा दुष्काळ, अवकाळी पाऊस, पिकांचे नुकसान, कर्जबाजारीपणा व हमीभावाच्या प्रश्नांनी ग्रासलेला प्रदेश म्हणून ओळखला जातो. या संकटांच्या अडकलेल्या आर्थिक विळख्यात शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणींचे सापळे रचलेले असतात. या विळख्यात अडकत जात, हा भूमीपुत्र ‘मृत्यू’ला कवटाळताना दिसत आहे.

मुंबई : 29-04-2026 

राज्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांवरून (Maharashtra Farmers Sucide) कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. मराठवाड्यासह अवघ्या 3 महिन्यात तब्बल 217 शेतकर्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. या सरकारला आणखी किती बळी हवेत, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

मराठवाडा हा दुष्काळ, अवकाळी पाऊस, पिकांचे नुकसान, कर्जबाजारीपणा व हमीभावाच्या प्रश्नांनी ग्रासलेला प्रदेश म्हणून ओळखला जातो. या संकटांच्या अडकलेल्या आर्थिक विळख्यात शेतकऱ्यांसमोर अडचणींसह मानसिर तणावाचाही मोठा डोंगर उभा राहतो. त्यातून अनेकदा आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेतले जातात. शासनाकडून कर्जमाफी, मदत पॅकेज व विविध योजनांची घोषणा होते. पण प्रत्यक्षात त्याचा लाभ वेळेत व प्रभावीपणे पोहोचत नसल्याची खंत शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, वडेट्टीवार यांनी भाजप नेते विनोद तावडे यांनी राहुल गांधींवर केलेली टीका जोरकसपणे फेटाळून लावली होती. ज्यांना परकीय सत्तांसमोर लोटांगण घालण्याता वारसा लाभला आहे, ते कोणत्या तोंडाने बोलतात ? असा प्रश्न तावडेंनी राहुल गांधीच्या संघावरील टीकेला प्रत्युत्तर देताना उपस्थित केला होता. वडेट्टीवार म्हणाले होते, स्वातंत्र्यलढ्यात ज्यांचा कुठेही सहभाग नव्हता, ज्याची विचारसरणीच परकीय सत्तेसमोर नतमस्तक होण्यात वाढली, त्यांनी कॉंग्रेसला प्रश्न करणे म्हणजे इतिहासाचाच अपमान आहे.

सरकारकडून केवळ घोषणाच, लाभ नाही : वडेट्टीवार (Maharashtra Farmers Sucide)

आत्महत्या थांबवण्यात सरकार अपयशी आहे. सोशल मीडियातील आपल्या एका पोस्टमध्ये वडेट्टीवार म्हणाले, मराठवाड्यात अवघ्या तीन महिन्यांत 217 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलयं. कर्जाचा बोजा आणि उद्धवस्त झालेल्या पिकांमुळे बळीराजा हतबल झाला आहे. रक्ताचं पाणी करून जगाला पाणी करून पोसणारा अन्नदाता आज स्वतःच्या शेतात फासावर लटकतोय, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे.

खरीप हंगामापूर्वीच अडवणूक (Maharashtra Farmers Sucide)

खत कंपन्यांकडून लिंकिंगची शेतकर्यांना होणारी सक्ती यावरून गडहिंग्लज पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेत पडसाद उमटले. खत लिंकिंगमुळे शेतकऱ्यांना भुर्दंड बसत आहे. शेतकऱ्यांना कोणी वाली आहे की नाही ? अशी विचारणा पंचायत समिती सदस्यांनी केली. त्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात एकीकडे रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत असतानाच आता खत विक्रेत्यांनी बेमुदत बंद पुकारल्याने खळबळ उडाली आहे.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored