Translate :

Sponsored

Maharashtra Rains Heavy Monsoon Rainfall Orange Alert Issued Flood Alert : पुढील पाच दिवस महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, मान्सून संपूर्ण महाराष्ट्राला व्यापणार !

Maharashtra Rains Update : महाराष्ट्रात पावसाने चांगलाच जोर धरलेला आहे. यंदा मान्सूनचे वेळेआधी आगमन झाले. त्यानंतर काही काळ राज्यातून पावसाने दडी मारली होती. मात्र आता परत एकदा राज्याला मान्सूने व्यापले आहे. रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. मुंबईसह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील पाच दिवसातही चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काही ठिकाणी महामार्गांवर वाहतूक व्यवस्थेत अडचणी निर्माण झाल्या आहेत. 

मुंबई : 2025-06-18

सध्या राज्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. भारतीय हवामान विभागाने  (Maharashtra Rains Update )  पुढील 24 तासांसाठी रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि सिंधूदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला  आहे. राज्यात आता मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला आहे. अशी माहीती हवामान विभागाने दिली आहे. सध्या सगळीकडे मान्सूनचा पाऊस पडत आहे. 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी मंगळवारी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. साधारणपणे 15 ते 16 जून दरम्यान मोसमी वारे संपूर्ण महाराष्ट्र व्यापतात. यंदा अंदाजित वेळेनुसार मौसमी वाऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. तसेच मौसमी पावसाने बहुतांश गुजरात व्यापला आहे. झारखंड आणि बिहारपर्यंत मजल मारली आहे. राज्यात सर्वदूर पाऊस पडण्यास अनुकूल वातावरण आहे. पुढील पाच दिवस राज्यात बहुतेक भागात चांगला पाऊस पडणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने नोंदवला आहे. 

नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मान्सूनच्या आगमनामुळे राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. पुढील पाच दिवस राज्यात बहुतेक भागांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. कालपासून म्हणजेच गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरूच रहाणार आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि सिंधूदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जाहिर केला आहे. यामुळे या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्याचा आला आहे. 

कोठे किती पाऊस ?

गेल्या 24 तासांत मुंबई उपनगर जिल्ह्यात सर्वाधिक 83.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ ठाणे (73.7 मिमीः मुंबई शहर (62.9 मिमी) रायगड (54.1. मिमी) आणि पालघर (49.7) जिल्ह्यांत चांगला पाऊस झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीसाठी धोक्याचा इशारा दिला आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. मुंबई  गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील वळंजवडी येथे महामार्गावर भेगा पडल्याने वाहतूक एकेरी मार्गावरून सुरू आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावरील पर्यायी रस्ता पाण्याखाली जाऊन खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली . 

पावसाच्या या जोरदार आगमनामुळे हवामान खात्याने सर्वत्र नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored