Translate :

Sponsored

Maharashtra Local Body Election,Big news, 2025 : कॉंग्रेस निवडणुका स्वबळावर लढणार, नवनियुक्त जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण यांची माहिती : Local Body Election Congress Will Contest The Elections On Its Own Information From Newly Appointed District President Shrirang Chavan

कॉंग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

Maharashtra Local Body Election : नुकत्याच राज्यातील निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकांमध्ये कॉंग्रेस पक्ष काय रणनिती आखणार याची माहिती नवनियुक्त जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण यांनी दिली आहे.

पुणे : 05/11/2025 

आगामी जिल्हा परिषद (ZP), पंचायत समिती आणि नगर परिषदांच्या निवडणुका (Maharashtra Local Body Election)  कॉंग्रेस पक्ष स्वबळावर लढणार आहे. यामध्ये बारामतीचाही समावेश आहे. याठिकाणी शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही नेते व त्यांचे पक्ष आमच्यासारखेच प्रतिस्पर्धी आहेत. जुन्नरची निवडणूक मात्र, आघाडीच्या माध्यमातून लढण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहीती कॉंग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण व इतर पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष देविदास भन्साठी आणि पदाधिकाऱ्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.

काय म्हणाले चव्हाण ? (Maharashtra Local Body Election)

चव्हाण म्हणाले की, पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या निष्ठावंतांवर अन्याय केला. पक्षाच्या नावावर पदे भोगून भाजपामध्ये गेले. त्यांच्या जाण्यामुळे पक्षाचे नुकसान होणार नाही, पक्षाचे कार्यकर्ते पक्षासोबत आहेत. या कार्यकर्त्यांना सोबत येऊन आपण जिल्ह्यात पुन्हा उभारणी करणार आहे. तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेस पक्ष सर्व गट, गण आणि वॉर्डात आपले उमेदवार उभे करणार आहे. लोणावळा, खेड, हवेली, आंबेगाव, इंदापूरसह बारामतीमध्ये सुद्धा आम्ही स्वबळावर लढणार आहेत.

आवश्यक तिथे आघाडी (Maharashtra Local Body Election)

देविदास भन्साळी म्हणाले की, राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर 1999 मध्ये कॉंग्रेस पक्ष असाच अडचणीत आला होता. यावेळी अडचणींवर मात करून आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवले, आताही आम्ही ताकदीने लढून यश मिळवू. बारामतीमध्ये स्वबळावर निवडणूक लढत असताना शरद पवार आणि अजित पवार हे आमच्यासाठी एकसारखेच प्रतिस्पर्धी असणार आहेत. कोणाच्याही पुढे झुकणार नाही. जिथे शक्य नाही, तिथे मात्र आमचा आघाडी करण्याचा प्रयत्न असेल.पण आघाडी केल्याने पक्षाचे आणि चिन्हाचेही नुकसान होते अशी टिपण्णीही त्यांनी केली.

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored