Mira Road Crime : मीरा रोड येथील चाकू हल्ला प्रकरणात दहशतावादाचा अँगल समोर येत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. ATS च्या तपासात काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
मुंबई : 29-04-2026
मीरा रोड (Mira Road Crime ) नया नगर परिसरात दोन सिक्युरिटी गार्डवर झालेल्या चाकू हल्ल्याच्या प्रकरणात तपासाला गंभीर वळण मिळाले असून, दहशतवादविरोधी पथक (ATS) तपासात काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी जैब जुबेर अन्सारी याने तपास यंत्रणांपासून पुरावे लपवण्यासाठी स्वतःचा मोबाईल फ़ॉरमॅट केल्याची माहिती ATS च्या सूत्रांकडून मिळाली आहे. यामागचा उद्देश फोनमधील महत्त्वाची माहिती व डेटा नष्ट कऱण्याचा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
तसेच, आरोपीने वापरलेला दुसरा मोबाईल फोन कुठेतरी पेकून दिल्याचेही तपासात निष्पन्न झाले असून, त्या मोबाईलचा शोथ ATS कडून सुरू आहे. हा फोनमधून अधिक महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, आरोपीच्या घराची झडती घेतली असता ATS ला एक हस्तलिखित पत्र सापडले आहे. या पत्रातील मजकूर अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून, त्यामध्ये आरोपीने ISIS या दहशतवादी संघटनेप्रती निष्ठा व्यक्त केल्याचे नमूद केले आहे.
याच पत्रामध्ये ” लोन वुल्फ हल्ल्या’चा उल्लेख करत भविष्यातील संभाव्य हल्ल्याचे संकेत दिल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. तसेत, ‘बिलाद अल-हिंदमध्ये खरा जिहाद पहायला मिळेल’ अशा स्वरूपाचे विधानही या पत्रात आढळले आहे. युवकांना इस्लामिक स्टेटमध्ये समील होण्याचे आवाहन केल्याचेही या नमूद असल्याची महिती आहे.
ATS कडून तपास सुरू (Mira Road Crime )
या सर्व पार्श्वभूमीवर, हा हल्ला केवळ व्यक्तिगत कारणातून झाला की त्यामागे कोणताही मोठा कट किंवा दहशतवादी प्रेरणा आहे का ? याचा तपास ATS कडून सुरू आहे. दरम्यान, जखमी सिक्यूरिटी गार्डवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे मीरा रोड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. या प्रकऱणाचा तपास पुढे जात असताना आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.