• Home
  • महाराष्ट्र
  • Maharashtra Cabinet Decisions, Big News : राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्वात मोठे 6 निर्णय घेण्यात आले आहेत , काय आहेत हे निर्णय जाणून घ्या.
Maharashtra Cabinet Decisions

Maharashtra Cabinet Decisions, Big News : राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्वात मोठे 6 निर्णय घेण्यात आले आहेत , काय आहेत हे निर्णय जाणून घ्या.

Maharashtra Cabinet Decisions : राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. यातील काही निर्णय तर रा्ज्यात मोठे बदल घडवून आणणारे आहेत. काय आहेत हे निर्णय जाणून घ्या.

मुंबई : 18/11/2025

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अनेक महत्त्वाचे निर्णय  (Maharashtra Cabinet Decisions) घेण्यात आले आहेत. या बैठकीला एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे सर्व मंत्री अनुपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वगळता शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी या बैठकीवर बहिष्कार घातला होता. असे असतानाच आता या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय समोर आले आहेत. राज्य सरकारने आजच्या बैठकीत आजच्या बैठकीत एकुण सहा मोठे निर्णय घेतले आहेत. यातील काही निर्णय हे नगरविकास विभाग, गृहनिर्माण विभाग, महिला व बालकल्याण विभागाशी संबंधित आहेत.

सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील सर्वच स्तरातील नागरिकांना फायदा होणार असल्याता दावा राज्य सरकारने केला आहे.

नगर विकास विभाग  (Maharashtra Cabinet Decisions)

राज्यातील सिडकोसह, विविध प्राधिकरणांकडील जमीनी, भुखंडाचा सुयोग्य वापर निश्चित करण्यास प्राधान्य देण्याचे ठरवण्यात आले आहे. संकल्पना आधारित आयकॉनिक शहर विकासासाठी धोरण जाहीर करण्यात आले आहे. सिडकोसह, अन्य प्राधिकरणांना संबंधित संकल्पनांवर आधारित एकात्मिक वसाहती निर्माण करण्याकरिता अधिकार मिळणार आहे. निवासी एकात्मिक वसाहत किंवा आंतरराष्ट्रीय व्यावसायिक क्षेत्रांची उभारणी केली जाणार आहे. सिडकोसह, विविध प्राधिकरणांकडील लँड बँकेचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी हे धोरण राबवण्यात येईल.

गृहनिर्माण विभाग  (Maharashtra Cabinet Decisions)

बृहन्मुंबई उपनगरातील वीस एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळावरील म्हाडांच्या गृहनिर्माण प्रकल्पांचा पुनर्विकास करण्याबाबतचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. यातून मुंबई शहर व उपनगर क्षेत्रामध्ये नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात परवडणारी घरे उपलब्ध होणार आहे.

मदत व पुनर्वसन विभाग  (Maharashtra Cabinet Decisions)

भूसंपादन, पुनर्वसन, पुनर्स्थापनेची प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी नवीन पदांची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे भूसंपादन, पुनर्सवन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 मधील कलम 64 अनुसार दाखल असलेल्या प्रलंबित प्रकरणांचा जलदगतीने निपटारा होणारा आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग  (Maharashtra Cabinet Decisions)

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापिठाकरिता 339 पदांची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षकांच्या 232 आणि शिक्षकेतर 107 पदांना मान्यता देण्यात आली आहे.

महिला व बाल विकास विभाग. (Maharashtra Cabinet Decisions)

महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध कायद्यातील मानहानिकारक शब्द वगळण्यास मान्यता देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विधि व न्याय विभागाने केलेल्या शिफारशीनुसार महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध अधिनियम, 1959 या अधिनियमातील कलम 9 व कलम 26 मधील महारोगाने पिडीत, कुष्टरोगी, कुष्ठालय असे शब्द वगळण्यात येणार आहे.

विधी व न्याय विभाग  (Maharashtra Cabinet Decisions)

महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम, 1950 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Leave a Reply

Releated Posts

Pakistan Protest News, 2025, Big News : पाकिस्तानमध्ये राजकीय खळबळ ! इम्रान खान समर्थकांची शाहबाज-मुनीर विरोधात घोषणाबाजी : Pakistan Imran Khan Pti Protest Against Shehbaz Sharif And Asim Munir

Pakistan Protest News : सध्या पाकिस्तानात मोठा राजकीय गदारोळ सुरू आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकांनी रावळपिंडीत…

ByByJyoti Bhalerao Dec 2, 2025

Pimple Saudagar Fire Incident, Breaking News : पिंपळे सौदागरमध्ये कमर्शियल इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाची तत्परता : Massive Fire Breaks Out At Commercial Building In Pimple Saudagar

Pimple Saudagar Fire Incident : पुणे शहरातील पिंपळे सौदागरमधील एका व्यावसायिक इमारतीला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे.…

ByByJyoti Bhalerao Dec 2, 2025

TET Exam Update, Big News : TET परीक्षेच्या शिक्षक संघटना आक्रमक, 5 डिसेंबरला काढला जाणार भव्य मोर्चा : Teachers Union Aggressive Against Tet Exam A March Will Be taken Out On December 5th

TET Exam Update : येत्या 5 नोव्हेंबरला रोजी सकाळी 11 वाजता दसरा चौक या ठिकाणाहून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा…

ByByJyoti Bhalerao Dec 1, 2025