Leopard Spotted On Pune Airport : ग्रामिण भागात बिबट्याच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढलेले असताना, आता हे संकट पुणे विमानतळाच्या परिसरापर्यंत आले आहे. आता बिबट्याला पकडण्यासाठी लोहगाव परिसरात पिंजरे लावण्यात आले आहेत. कॅमेऱ्यांच्या माध्यमातून त्याच्या हालचालींवर सतत नजर ठेवली जात आहे.
पुणे : 22/11/2025
पुणे विमानतळाच्या धावपट्टीलगत असलेल्या टॅक्सी वे के 4 परिसरात गुरूवारी रात्री सुमारे दीडच्या सुमारास बिबट्या (Leopard Spotted On Pune Airport) आढळून आला. गेल्या दोन दिवसांत या भागात बिबट्याचे हे दुसऱ्यांदा दर्शन झाले आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी विमानांची सर्वाधिक वाहतूक असतानाच बिबट्या पार्किंग गेट क्रमांक 8,9 आणि 10 पासून काहीच अंतरावर दिसला.
सुदैवाने तो थेट धावपट्टीवर पोहोचला नाही. या आठवड्यात मंगळवार आणि गुरूवारी मध्यरात्री बिबट्या धावपट्टीवर पोहोचला नाही. या आठवड्यात मंगळवारी आणि गुरूवारी मध्यरात्री बिबट्या धावपट्टीजवळील टॅक्सी वे -4 परिसरात दोनदा दिसल्याची नोंद आहे.
पहिल्यांदा त्याचे अस्तित्व हवाई वाहतूक नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले, तर गुरूवारी रात्री ग्राऊंड स्टाफने बिबट्या पहिल्याचे समजते. त्यावेळी धावपट्टी रिकामी असल्याने अनर्थ टळला. रे-4 हा मार्ग टर्मिनलला जोडणाऱ्या समांतर टॅक्सीवेद्वारे महत्त्वाचा असल्याने ही घटना गंभीर मानली जात आहे.
वन विभागाच्या सूचनांकडे विमानतळ प्रशासनाचे दुर्लक्ष (Leopard Spotted On Pune Airport)
यापूर्वीच्या घटनेनंतर वन विभागाने विमानतळ प्रशासनाला लोहगावच्या दिशेने असलेल्या संरक्षणभिंतीची डागडुजी तातडीने करण्याचे पत्र दिले होते. मात्र, अद्यापही भिंत दुरूस्तीअभावी तशीच असून, या भिंतीतूनच बिबट्या विमानतळ परिसरात येत असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे. के-4 परिसरातील लोहगाव परिसरात पिंजरे लावण्यात आले आहेत.
कॅमेऱ्यांच्या माध्यमातून त्याच्या हालचालींवर सतत नजर ठेवली जात आहे. धावपट्टीखालील गटारांनाही जाळ्या लावून बंद कऱण्यात आले आहे. बिबट्याच्या वारंवार होत असलेल्या हालचालींमुळे सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली आहे. विमान प्रवास सुरळीत ठेवण्यासाठी तातडीची पावले उचलण्याची गरज आहे.
तज्ञांचे म्हणणे आहे की संयुक्त मोहिमेची गरज (Leopard Spotted On Pune Airport )
धावपट्टीजवळ बिबट्याचा वावर असणे हे विमान व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गंभीर आहे. हवाई दल,विमानतळ प्रशासन आणि वन विभाग यांनी संयुक्तपणे मोहीम राबवून बिबट्याला पकडावे.
– धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतून तज्ञ
विमानतळाच्या आत व लोहगाव परिसरात दिसणारा बिबट्या हा एकच असून, दहा दिवसांनी तो पुन्हा विमानतळावर आला आहे. त्यावरून त्याचे क्षेत्र वाढत असल्याचा अंदाज आहे.
– मंगेश ताटे, सहाय्यक वनसंरक्षक, पुणे वन विभाग
Leave a Reply