Translate :

Sponsored

Ladaki Bahin Yojana E-KYC, Important Update : खात्यात पैसे आले नाही तर शासनाची चूक नाही, बहिणींनी अटी पूर्ण करा : Ladaki Bahin Yojana If Money Does Not Deposti In The Account, It Is Not The Government Fault, It is The Beneficiary Women know The Big Update

राज्यातील लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांना ई-केवायसी अपडेट बंधनकारक.

Ladaki Bahin Yojana E-KYC : लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1,500 रुपये दरमहा मिळतात. पात्र महिलांसाठी आता ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. नोव्हेंबरपर्यंत त्यासाठी कालावधी देण्यात आला आहे. तर सरकारने या योजनेसाठी मोठी अपडेट समोर आली आहे.

मुंबई : 14/10/2025

राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता बहिणींच्या बँक खात्यात जमा झाला आहे. तर आता या योजनेत पात्र लाभार्थी महिलांनी ई-केवायसी (Ladaki Bahin Yojana E-KYC) करणे बंधनकारक करण्यात आला आङे. 18 सप्टेंबर रोजी याविषयीचे एक परिपत्रक काढण्यात आले आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी 9 नोव्हेंबर रोजी याविषयीचे आवाहन करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. या आवाहनानंतर आता ई-केवायसी करण्यासाठी गर्दी होत आहे. पण कुठे वेबसाईट डाऊन तर कुठं अन्य काही कारणांसाठी महिलांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशावेळी जर ई-केवायसी पूर्ण करता आला नाही आणि खात्यात रक्कम जमा झाली नाही तर दोषी कोण ? याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

नोव्हेंबरच्या रक्कमेबाबत काय ? (Ladaki Bahin Yojana E-KYC)

राज्य सरकारने दिवाळीपूर्वीच लाडक्या बहिणींच्या खात्यात 1,500 रुपये जमा केले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना थोडा आर्थिक हातभार लागत आहे. सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झाल्यानं त्यांना हायसं वाटंल आहे. ई-केवायसी प्रक्रियेसाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता सुद्धा विना अडथळा जमा होईल. पण नोव्हेंबर 2025 चा हप्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली.

पण ई-केवायसीतील अडथळे आणि काही अडचणींचा सामना महिलांना करावा लागत आहे. पती अथवा वडील हयात नाही, त्या महिलांसाठी काय उपाय योजना करण्यात येणार याविषयीचे धोरण अद्याप समोर आलेले नाही. तर ग्रामीण भागातील काही महिलांनी वडील, पतीचे आधार कार्ड क्रमांक न नोंदवताच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्याची चर्चा जोर धरत आहे. त्यामुळे या महिलांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. जर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर हा सरकारचा दोष नसेल तर लाभार्थी महिलेचा असेल हे स्पष्ट होत आहे.

E-KYC नवीन अंतिम मुदत (Ladaki Bahin Yojana E-KYC)

मंत्रिमंडळ निर्णयानुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्येक वर्षी जून महिन्यात E-KYC करणे बंधनकारक आहे. चालू आर्थिक वर्षात 2025-26 मध्ये शासकीय परिपत्रकेच्या तारखेपासून दोन महिन्याच्या आत लाभार्थी महिलांना E-KYC च्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन पूर्ण करणे गरजेचे आहे. जर लाभार्थी महिलेने या काळात आधार ऑथेंटिकेशन नाही केले तर तो पुढील कोणत्याही प्रक्रियेसाठी पात्र नसेल. राज्य सरकारने 18 सप्टेंबर 2025 रोजी याविषयीचे परिपत्रक जाहीर केले होते.

अशी करा ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण  (Ladaki Bahin Yojana E-KYC)

  • लाभार्थी महिलांना मोबाईल अथवा संगणकावर ladakibahin.maharahtra.gov.in या पोर्टलला भेट द्या.
  • लॉगिन केल्यावर ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याविषयीचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
  • तुमचा आधार क्रमांक (Aadhar Number) नोंदवा
  • आता कॅप्टा कोड (Captcha Code)
  • आधार प्रामाणिकरणासाठी मंजूरी द्या. send OTP या पर्यायावर क्लिक करा
  • आधारशी लिंक मोबाईल क्रमांकावर OTP नमूद का Submit करा
  • आता ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे
  • नवीन नियमानुसार पती, वडिलांचा आधार कार्ड क्रमांक, कॅप्चा को़ड आणि OTP नमुद करा
  • आता लाभार्थी लाडक्या बहिणीचा जात प्रवर्ग निवडा
  • आवश्यक प्रमाणित घोषणापत्रावर क्लिक करा. नंतर सबमिट बटणवर क्लिक करा. E-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा संदेश स्क्रिनवर दिसेल.

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored