Translate :

Sponsored

Nashik Religion Conversion Case, Shocking news 2026 : नाशिक TCS कंपनीतील पीडित व्यक्तीकडून धक्कादायक बाबी उघड : Nashik religious Conversion Case Victim Statement Open

नाशिक TCS कंपनीतील पीडित व्यक्तीकडून धक्कादायक बाबी उघड .

Nashik Religion Conversion Case : पीडित कर्मचाऱ्याने त्याच्यासोबत घडलेल्या धक्कादायक प्रसंगाचा खुलासा केला आहे. टीम लीडरने त्याला कलमा वाचण्यास, नमाज पठण करण्यास आणि बळजबरीने मांसाहार खाण्यास भाग पाडलं होतं.

नाशिक : 16-04-2026

नाशिकमधील नामांकित बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील (Nashik Religion Conversion Case )महिलांचं लैंगिक शोषण आणि सक्तीच्या धर्मांतरण प्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या प्रकऱणात दररोज वेगवेगळी माहिती समोर येत आहे. या प्रकरणाचा तपास सध्या एसआयटीकडून करण्यात येत आहे. नामांकित कंपनीत इतक्या दिवसांपासून असे प्रकार होत असण्याबद्दल सर्वच स्तरातून आश्चर्याची भावना व्यक्त केली जात आहे.

याप्रकरणी एका पीडित व्यक्तीने सांगितले आहे की, टीम लिडर्सने त्याला बळजबरीने नमाज पठण करायला, कलमा म्हणायला आणि टोपी घालण्यास भाग पाडल्याचे आरोप केले आहे. इतके करून आरोपीचे समाधान न झाल्याने  आरोपीने पीडित व्यक्तीचे खासगी आयुष्य चव्हाट्यावर आणत, त्याला म्हटले की, ” उपचारानंतर तुझी पत्नी आई होऊ शकली नाही, जर बाळ हवं असेल तर तुझ्या पत्नीला माझ्याकडे पाठव”. 2022 पासून हा मानसिक त्रास सुरू झाल्यांचे त्याने सांगितले.

काय आहे हे प्रकरण ? (Nashik Religion Conversion Case)

पीडित व्यक्तीने कंपनी जॉईन केल्यानंतर टीम लीडर तौसिफ अत्तारी आणि त्याचा साथिदार दानिश शेख यांनी त्याच्यावर डूख धरला होता. टीम लिडर असल्याने पीडित व्यक्तीला त्याच्या सर्व गोष्टी ऐकाव्या लागत होत्या. पीडित हिंदू आहे. रामदास स्वामींचा भक्त असल्याने तो गळ्यात रूद्राक्षाची माळ घालून असायचा. हीच धार्मिक ओळख तौसिफ आणि दानिशला आवडत नव्हती. कामाच्या बाबतीतही त्याच्यावर प्रचंड दबाव टाकला जात होता.

कामादरम्यान तौसिफ आणि दानिश त्याला घेरायचे आणि हिंदू देवी-देवतांवरून त्याची खिल्ली उडवायचे. ” तुमच्या हिंदू धर्मात देव आहे का ? कधी पाहिलयं का? देवासारखं काहीच नसतं, फक्त अल्लाहच सत्य आहे. असं ते म्हणायचे. पीडित व्यक्तीने सांगितलं की, देव-देवतांच्या रुपाबद्दल इतक्या अश्लिल टिपण्ण्या करायचे की ते कोणत्याही भक्ताला ऐकणं असह्य होत असे.

हा छळ केवळ शाब्दिक नव्हता, तर धमक्या देणंही त्यांच्या त्रास देण्याचा एक भाग होता. पीडित व्यक्ती कट्टर शाकाहारी आहे, पण तौसिफ आणि दानिश त्याला ड्युटीनंतर बळजबरीने हॉटेलमध्ये घेऊन जात असत. तिथे त्याला धमक्या देऊन आणि दबाव टाकून मांसाहारी अन्न खाण्यास भाग पाडत असतं. 2023 च्या ईदच्या दिवशी तौसिफ त्याला त्याच्या घरी घेऊन गेला आणि त्याच्या संमतीशिवाय त्याला धार्मिक टोपी घालण्यास भाग पाडलं होतं. इतकचं नव्हे तर त्याला नमाज पठण कऱण्यास भाग पाडलं आमि त्याचा फोटो काढून कंपनीच्या अधिकृत ग्रुपवर पोस्ट करण्यात आला होता.

पीडित आणि त्याच्या पत्नीला लग्नानंतर अनेक वर्षांपासून मूलबाळ होत नव्हतं. यावरूनही तौसिफ आणि दानिश त्याची थट्टा करायचे. ” इतके उपचार करूनही तुझी पत्नी आई होऊ शकली नाही. एक काम कर. तुझ्या पत्नीला माझ्याकडे पाठव”. असं ते पीडित व्यक्तीला म्हणायचे. हे ऐकुण त्याचा संयम सुटला. यावरून झालेल्या वादादरम्यान तौसिफने पीडित व्यक्तीवर टेबल फॅन फेकला आणि त्याला जीवे मारण्याचीही धमकी दिली.

कायदेशीर कारवाईची मागणी  (Nashik Religion Conversion Case)

2022 मध्ये सुरू झालेले हे संपूर्ण प्रकरण 23 मार्च 2026 पर्यंत सुरूच होेते. तौसिफ, दानिश, शाहरूख आणि रझा मेमन यांच्या संपूर्ण टोळीने कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या चारित्र्याबद्दलही अश्लिल टिप्पणी कऱण्यास सुरूवात केली होती. पीडित व्यक्तीने जेव्हा त्यांचं म्हणणं एकूण घेण्यातं थांबवलं, तेव्हा तौसीफने त्याला नोकरीवरून काढून टाकण्यासाठी मुख्यालयात त्याच्याविरूद्ध खोट्या तक्रारी दाखल करण्यास सुरूवात केली. अखेर पीडित व्यक्तीने कायद्याचा आधार घेतला. या प्रकरणात समील असलेल्यांवर कायदेशीर कारवाईची मागणी करणारी तक्रार त्याने दाखल केली आहे.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored