Translate :

Sponsored

Hadapsar Pune Fire News, Sad News 2026 : पुण्यातील हडपसर भागात अग्नितांडव, 19 झोपडया जळून खाक ! : Massive Fire In Ram Manohar Garden Hadapsar Pune, 19 huts Damage

पुण्यातील हडपसर भागात अग्नितांडव, 19 झोपडया जळून खाक !

Hadapsar Pune Fire News :  पुण्यात हडपसर भागात मोठी दुर्घटना घडली आहे. पुणे-सोलापुर रस्त्यावर राममनोहर लोहिया उद्यान आहे. उद्यानाच्या मागील बाजूस मजुरांची वसाहत आहे. मध्यरात्री अडीचच्या सुमारास वसाहतीतील एका झोपडीला आग लागली.

पुणे : 21-02-2026 

हडपसर भागातील राममनोहर लोहिया उद्यानाजवळ असलेल्या मजुरांच्या वसाहतीत (Hadapsar Pune Fire News )शनिवारी आग लागली. आगीत 19 झोपड्या आणि तीन दुचाकी भस्मसात झाल्या. आग लागल्यानंतर मजूर, तसेच कुटुंबिय बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. आगीमागचे कारण समजू शकले नाही.

कशी लागली आग ? (Hadapsar Pune Fire News )

पुणे-सोलापूर रस्त्यावर राममनोहर लोहिया उद्यान आहे. उद्यानाच्या मागील बाजूस मजुरांची वसाहत आहे. मध्यरात्री अडीचच्या सुमारास वसाहतीतील एका झोपडीला आग लागली. झोपड्या तात्पुरत्या स्वरूपात बांबू आणि पत्र्याचा वापर करून बांधण्यात आल्या आहेत. गृहोपयोगी साहित्याने पेट घेतल्यानंतर आग भडकली. आग भडकल्यानंतर शेजारी असलेल्या झोपड्यांनी पेट घेतला. आग लागताच वसाहतीतील मजूर आणि कुटुंबीय बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पाच बंब, टॅंकर घटनास्थळी दाखल झाले. आग भडकल्याने जवानांनी चहुबाजूंनी पाण्याचा मारा सुरू केला. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.

काय झाले भस्मसात ? (Hadapsar Pune Fire News )

आगीत 19 झोपड्या भस्मसात झाल्या, तसेच तीन दुचाकीही जळल्या. आगीत कपडे, धान्य, तसेच अन्य साहित्य जळाले. मध्यरात्री आग लागल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. मात्र प्रसंगावधान राकून मजूर आणि कुटुंबिय बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनवणे, विलास दडस यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.

हडपसरमधील राम मनोहर लोहिया उद्यानाच्या तात्पुरत्या स्वरूपात झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. या भागात राहणारे मजूर आणि कुटुंबीयांचे हातावर पोट आहे. आग लागल्यानंतर त्वरीत वसाहतीत सर्वजण बाहेर पडल्याने गंभीर दुर्घटना टळली. आगीत गृहोपयोगी साहित्या जळाल्याने मजुरांच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झावे.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored