Translate :

Sponsored

Farmers Schemes, Good News For Farmers, Goverments Announced 2 New Schemes : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सरकारच्या बळीराजासाठी 2 मोठ्या योजनांची घोषणा, मिळणार दिलासा.

Farmers Schemes  : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बळीराजासाठी सरकारनं मोठा निर्णय घेतला असून, या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

मुंबई : 16/07/2025

 शेतकऱ्यांच्या दृष्टीने मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने कृषी विकासाला चालना देण्यासाठी मोठ्या योजनांची घोषणा केली आहे. मोदी सरकारच्या कॅबिनेट बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा पातळीवरील कृषी वाढ आणि प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणुक संस्थांना बळकटी देण्यासाठी या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. या योजनांवर एकुण वार्षिक खर्च 50,000 कोटी रूपयांपेक्षा जास्त प्रस्तावित आहेत. 

पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना ( Farmers Schemes)

सरकारने सर्वांगीण कृषी विकासाला चालना देण्यासाठी पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना ( पीएमडीडीकेवाय) सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश 36 केंद्रीय योजनांच्या समन्वयाद्वारे जिल्हा पातळीवर कृषी क्षेत्रात परिवर्तन घडवून आणणे हा आहे. या योजनेसाठी वार्षिक 24,000 कोटी रुपयांचा  खर्च प्रस्तावित आहे. ज्यामुळे पायाभूत सुविधा, बाजारपेठेतील प्रवेश आणि शेती उत्पादकता यांना पाठबळ मिळणार आहे. 

एनयापीसीसाठी निधी  (Farmers Schemes )

सरकारने राष्ट्रीय पायाभूत सुविधा आणि प्रकल्प महामंडळाच्या (एनआयपीसी) क्षमता वाढवण्यासाठी 20.000 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या निधीमुळे एनआयपीसी सौर, पवन, आणि हरित हायड्रोजन क्षेत्रातील मोठ्या प्रमाणावरील नवीकरणीय उर्जा प्रकल्पामध्ये गुंतवणूक करणार आहे. यासोबतच राष्ट्रीय स्वच्छ उर्जा गुंतवणूक मर्यादित ‘एनसीआयएल’ला स्वच्छ उर्जा गुंतवणूकीसाठी 7,000 कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे आता गुंतवणुकीला चालना मिळणार आहे.

दरम्यान यापूर्वी शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने देखील मोठी निर्णय घेतला होता. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने तुकडे बंदी कायदा रद्द करण्याची घोषणा केली होती. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची घोषणा केली होती. या घोषणेमुळे छोट्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. छोट्या स्वरूपात शेतीचे व्यवहार करणं आता शक्य होणार आहे. 

आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेण्यात आला. जिल्हा पातळीवरील कृषी वाढ आणि प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणूक संस्थांना बळकटी देण्यासाठीया योजना जाहीर करण्यात आल्या आहेत, याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे.  

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored