Translate :

Sponsored

Dr. Anand Nadkarni Passes Away, Shocking News, 2026 : प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन, 68 वर्षी घेतला अखेरचा श्वास : Dr. Anand Nadkarni Passes Away, Took his last Breath At the Age Of 68

प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन, 68 वर्षी घेतला अखेरचा श्वास.

Dr. Anand Nadkarni Passes Away : प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे आज 15 मे रोजी पहाटे निधन झाले. त्यांनी अवघ्या 68 वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूने अवघ्या मानसोपचार क्षेत्रासह सामान्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

ठाणे : 15-05-2026

डॉ. आनंद नाडकर्णी यांचे आज 15 मे रोजी पहाटे 4:30 ते 5 वाजण्याच्या सुमारास निधन (Dr. Anand Nadkarni Passes Away) झाले. त्यांचे वय 68 होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. माहील आठवड्यात झालेल्या शस्रक्रियेनंतर तब्येतीबाबत काही गुंतागुंत निर्माण झाली होती. शस्रक्रियेनंतर ते बरे झाले होते, परंतु अचानक त्यांची प्राणज्योत मालवली. आनंद नाडकर्णी यांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी सरस्वती मराठी शाळेमध्ये सकाळी 11 वाजता ठेवण्यात आले होते.

डॉ. आनंद मधुसूदन नाडकर्णी यांनी मुंबईहून वैद्यकीय पदवी पूर्ण केली आणि त्यानंतर मुंबई विद्यापीठातून मानसोपचारतज्ञ विषयात एमडी पदव्यू्त्तर पदवी मिळवली होती. ते गेल्या तीन दशकांपासून मानसोपचार क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत होते. त्यांनी मानसिक आरोग्याची संकल्पना समाजातील प्रत्येक स्तरात पोहोचवली.ते विविध क्षेत्रात कार्यरत होते.

डॉ.आनंद नाडकर्णी यांचे कार्य (Dr. Anand Nadkarni Passes Away)

डॉ.आनंद नाडकर्णी हे पुणे येथील ‘मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे’ संस्थापक सदस्य होते. डॉ.नाडकर्णी यांनी मानसशास्रव्यतिरिक्त अन्य विषयांवरही पुस्तके लिहिली होती. त्यांच्या ‘गद्धेपंचवीशी’ आणि’ विषादयोग’ या पुस्तकांना महाराष्टर सरकारचा पुरस्कार मिळाला आहे. नाडकर्णी यांनी ‘रंग माझा वेगळा’  व ‘ असेच आम्ही सारे’ ही व्यावसायिक नाटके लिहिली आहेत. त्यांच्या ‘मयसभा’ या नाटकाला लेखन पुरस्कार मिळालेला आहे. ‘मिफ्ता’च्या नाट्य विभागासाठी आनंद नाडकर्णी यांची कथासंकल्पना असेलल्या ‘गेट वेल सून’ या नाटकाची त्यावर्षीच्या 10 सर्वोत्कृष्ट नाटकांत निवड करण्यात आली होती.

डॉ. नाडकर्णी यांचा जन्म 1958 ला जळगाव येथे झाला. एक विख्यात मनोविकरतज्ञ, विचारवंत, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते अशी त्यांची खास ओळख होती. डॉ. नाडकर्णी यांना लहाणपणी पोलिओचा आजार झाला होता.त्यामुळे त्यांच्या वाट्याला बराच संघर्ष आला. मात्र प्रखर बुद्धीमत्ता, संवेदनशीलता आणि सकारात्मकता ह्यांची देणगी लाभल्यामुळे ते या आजारवर मात करू शकले.

डॉक्टरांचं व्यसनमुक्ती केंद्रातील काम समाजासाठी मार्ग दाखवणारे आहे.

डॉ.नाडकर्णी हे ठाण्यातील समतानगर भागात रहात होते. मुंबईतील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. गुरूवारी रात्रीपासून त्यांची प्रकृती खालावली होती.शुक्रवारी त्यांचे पहाटे निधन झाले.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored