Donald Trump Son India Tour : डोनाल्ड ट्रम्प यांचे सुपुत्र सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात त्यांनी ताजमहाल, जामनगरमधील अंबानींच्या वंतारा आणि उदयपूरमधील लग्नात हजेरी लावली.
दिल्ली : 21/11/2025
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पुत्र डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर ( Donald Trump Son’s India Tour) हे सध्या भारताच्या एका अतिशय चर्चित आणि हाय-प्रोफाइल दौऱ्यावर आले आहेत. या भेटीने केवळ भारतीय माध्यमांचेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही लक्ष वेधले आहे. त्यांच्या या खास दौऱ्याची सुरुवात ऐतिहासिक आणि जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या आग्रा येथील ताजमहालपासून झाली.
ज्युनिअर ट्रम्पने घेतला ताजमहालाचा अनुभव (Donald Trump Son’s India Tour)
आग्रा येथे पोहोचताच कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये ट्रम्प ज्युनियर यांनी ताजमहालला भेट दिली. सुमारे एक तास त्यांनी या स्मारकाची भव्यता, कलात्मकता आणि इतिहासाता अुनभव घेतला. ताजमहालसमोर असलेल्या लोकप्रिय ‘ डायना बेंच’ वर त्यांनी फोटोसुद्धा घेतला. विशेष म्हणजे, 2022 मध्ये त्यांच्या वडिलांनी सुद्धा येथे भेट दिली होती. या दौऱ्यात अमेरिकन सुरक्षा पथक, स्थानिक पोलिस आणि CISF यांच्या तुफान सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आल्या होत्या.
ज्युनियर ट्रम्प यांची वंताराला सुद्धा भेट ( Donald Trump Son’s India Tour )
ताजमहालच्या भेटीनंतर ते जामनगरकडे रवाना झाले. तिथे ते अनंत अंबानी आणि अंबानी परिवाराचे विशेष पाहुणे होते. या भेटीदरम्यान त्यांनी वंतारा वन्यजीव संरक्षण आणि पुनर्वसन केंद्राला भेट दिली. हे केंद्र भारतातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक वन्यजीव संवर्धन प्रकल्पांपैकी एक मानले जाते. ट्रम्प ज्युनिअर यांनी वनताऱ्याता परिसर पाहताना प्राणीसंवर्धन, पर्यावरण संवर्धन आणि सांस्कृतिक मूल्यांंबद्दल अंबानी परिवराचे समर्पण पाहून खुप प्रशंसा व्यक्त केली. याच ठिकाणी त्यांनी गणपती मंदिर आणि इतर पवित्र स्थळांना भेट देत पूजा-अर्चनाही केली. त्यांनी हा अनुभव “अविस्मरणीय, अध्यात्मिक आणि भारताच्या आदरातिथ्याचा अद्वितीय नमुना” असे सांगितले आहे.
उदयपूर रॉयल डेस्टिनेशन वेडिंगमध्ये विशेष उपस्थिती (Donald Trump Son’s India Tour )
या दौऱ्याचा तिसरा आणि सर्वात चर्चित टप्पा आहे उदयपूर. इथे ते एका हाय-प्रोफाईल डेस्टिनेशन वेडिंगमध्ये सहभागी होणार आहेत. हे लग्न दक्षिण भारतातील मोठ्या व्यापारी राजू मंटेना यांच्या मुलाचे असून वधू अमेरिकन वंशाची आहे. दोन्ही कुटुंबाचे अमेरिकेशी व्यावसायिक आणि राजकीय संबंध असून ट्रम्प परिवाराशी जवळचे संबंध असल्यामुळे ट्रम्प ज्युनिअर यांचे आगमन विशेष ठरते.
Leave a Reply