Translate :

Sponsored

DCM Sunetra Pawar Decision , Great News 2026 : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मोठी घोषणा ! ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी 11 शासकीय वसतिगृहांचे होणार बांधकाम : Beed Hostels For Sugarcane Workers Children Fund Sanstioned Sunetra pawar

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मोठी घोषणा केली आहे.

DCM Sunetra Pawar Decision : बीड जिल्ह्यातील स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी 11 शासकीय वसतिगृहांच्या बांधकामासाठी 159 कोटी 36 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

मुंबई : 12-02-2026

स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजनेंतर्गत बीड जिल्ह्यातील 11 वसतिगृहांच्या बांधकामासाठी 159 कोटी 36 लाख 60 हजार इतक्या रकमेच्या बांधकाम अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार (DCM Sunetra Pawar Decision ),यांनी दिली.

‘ संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजने’ विषयी जाणून घेऊ  (DCM Sunetra Pawar)

ऊसतोड कामगारांच्या मुलांची शिक्षणाबाबतची आस्था वाढीस लावून त्यांचा पुढील शिक्षणाचा मार्ग सुकर करण्यासाठी स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी “संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना” सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील ऊसतोड कामगारांची संख्या अधिक असलेल्या 41 तालुक्यांच्या ठिकाणी मुलांसाठी 41 व मुलींसाठी 41 अशी एकुण 82 (प्रत्येकी 100 विद्यार्थी क्षमता) शासकीय वसतिगृह सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार प्रथम टप्प्यात मुलांसाठी 10 व मुलींसाठी 10 अशी एकूण 20 शासकीय वसतिगृह  वगळता उर्वरित 62 शासकीय वसतिगृग सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

या योजनेअंतर्गत बीज जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दोन (मुलांचे 1 व मुलीचे 1 ) प्रत्येकी 100 विद्यार्थी क्षमता ) अशी एकूण 22 शासकीय वसतिगृहे सुरू करण्यास सामाजिक न्याय विभागाच्या शासन निर्णयाद्वारे यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे.

अजित पवार यांची इच्छा (DCM Sunetra Pawar Decision )

ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलांनी शिकले पाहिजे, शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आले पाहिजे अशे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वप्न होते. त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले आणि या मुला-मुलींसाठी वसतिगृह बांधण्यासाठी पाठपुरावा केला आणि ते पालकमंत्री असताना अनेक ठिकाणी जागाही निश्चित करण्यात आल्या होत्या. सारथी संस्थेच्यावतीने मराठा समाजातील मुलांसाठी विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या वसतिगृहांच्या धर्तीवर बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृहांचे दर्जेदार बांधकाम करावे, अशा सुचना दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियांत्यांना वेळोवेळी दिल्या होत्या, अशी माहितीही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार (DCM Sunetra Pawar Decision ) यांनी दिली.

ही सर्व शासकीय वसतिगृहे शासकीय इमारतीत सुरू करावयाची आहेत. सद्यस्थितीत केवळ तीन ठिकाणी शासकीय जागा उपलब्ध झाली असून त्या ठिकाणी वसतिगृहाचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. उर्वरित 19 वसतिगृहांपैकी 11 जागा उपलब्ध असलेल्या वसतिगृहांच्या बांधकाम अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय विभागातर्फे जाहीर कऱण्यात आला आहे. यामध्ये पाटोदा, केज,परळी, गेवराई, माजलगाव येथे प्रत्येकी दोन  आणि बीड येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहाचा समावेश आहे.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored