BMC Election Result 2026 : राज्यात सध्या सर्वत्र एकच चर्चा ही ती म्हणजे निवडणुकांची. राज्यातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका निवडणुकिच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मुंबईवर ठाकरे गट शिवसेना राज्य कऱणार की भाजप-शिंदे शिवसेना गटाचे राज्य असणार याची सर्वत्र उत्सूकता आहे. मुंबईत कोणाची सरशी झाली आहे ते जाणून घेऊन.
मुंबई : 16-01-2026
काल राज्यभरात 29 महानगरपालिकांसाठी ( BMC Election Result 2026) मतदान झाले. आज सकाळपासून मतमोजणीला सुरूवात झालेली आहे. देशातील सर्वात मोठी आणि श्रीमंत महानगरपालिका म्हणून महाराष्ट्रातील मुंबईच्या महापालिकेकडे बघितले जाते. त्यामुळे या पालिकेच्या निकालाकडे लक्ष लागून राहिलेले आहे. अनेक वर्ष मुंबईवर ठाकरे गटाच्या शिवसेनेचे राज्य होते. मात्र सध्या मुंबईतीला 227 जागांपैकी 127 जागांवर भाजप आणि शिवसेनेची आघाडी पहायला मिळत आहे. भाजपाची जवळपास 96 जागांवर आघाडी पहायला मिळत आहे. हा निकाल पहिल्यानंतर भाजपच्या प्रविण दरेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
प्रविण दरेकरांची पहिली प्रतिक्रिया ( BMC Election Result 2026)
भाजप नेते प्रविण दरेकर यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, ‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कोणी दिला? तर नरेंद्र मोदी साहेबांनी. देवाभाऊंनी त्यासाठी पाठपुरावा केला. मराठी माणसे मुंबईतून बाहेर गेली. कुणाच्या राज्यात गेली ? तुमच्या राज्यात गेली ? बीडीडीमध्ये घरं कुणी दिली ? देवाभाऊंनी दिली, एकनाथ शिंदे यांनी दिली ‘.
पुढे दरेकर म्हणाले की, बीडीडी असेल, अभिद्या नगर असेल, आज त्याठिकाणी आदर्श नगर असेल सगळीकडे आम्ही मुंबईतील मराठी माणूस मुंबईत रहावा म्हणून प्रयत्न करतोय. ज्यांनी त्याठिकाणी आयुष्यभर मराठी माणसांच्या नावावर दुकान सुरू केले होतेय बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार, विकासाची भूमिका शिंदे साहेबांसोबत आली. आता यांचं दुकान बंद झालेलं आहे.
आकडेवारी काय सांगते ? ( BMC Election Result 2026)
समोर आलेल्या आकडेवारी नुसार भारतीय जनता पक्ष (भाजप ) आणि उममुख्यमंत्री एकनाथ सिंदे यांच्या शिवसेनेला मिळून 129 जागांवर आघाडी मिळालेली आहे. यामध्ये भाजप 98 जागांवर आघाडीवर आहे तर एकनाथ शिंदे शिवसेना गटाला 31 जागांवर आघाडी मिळाली आहे. यामुळे मुंबईतील स्थानिक राजकारणात महायुतीची ताकद स्पष्ट झाली आहे. उद्धव ठाकले यांच्या शिवसेनेला (ठाकरे गट) 62 जागांवर आघाडीवर असून, महायुतीच्या तुलनेत पाठीमागे आहे. मनसे 9 जागांवर आहे. कॉंग्रेसची 13 जागांवर आघाडी आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) 2 जागेवर निवडून आले आहेत.
प्रविण दरेकर यांच्या भावाने या निवडणुकित बाजी मारत विजय मिळवला आहे. प्रकाश दरेकर हे मुंबई प्रभाग 3मधून निवडणूक लढत होते.
This post was last modified on January 16, 2026 2:28 pm