Translate :

Sponsored

Bhor Crime News, Shocking News, 2026 : भोर हदरले !, 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार, दगडाने ठेचून खून : Bhor Crime News, 4 Year Old Girl Tortured Crushed To Death with A Stone Of 65 Year Old Man

भोर हदरले !, 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार, दगडाने ठेचून खून

Bhor Crime News : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. एका कोवळ्या वयाच्या, चार वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून क्रूर अंत केल्याची घटना घडली आहे.

पुणे : 02-04-2026 

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात (Bhor Crime News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सुट्ट्यांसाठी आजीच्या घरी आलेल्या चार वर्षांच्या मुलीचे एका वृद्ध व्यक्तीने अपहरण करून बलात्कार केला. ही ह्रदयद्रावक घटना पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात घडली आहे. चार वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिची निर्घुणपणे हत्या करण्यात आली. ही मुलगी सुट्ट्यांसाठी आजीच्या घरी आली होती. या घटनेमुले परिसरात संतापाटी लाट उसळली असून, लोकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

घटनाक्रम असा …(Bhor Crime News)

चार वर्षांची ही मुलगी उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आजीच्या घरी आली होती. शनिवारी ती बाहेर खेळत असताना, 65 वर्षींय भीमराव कांबळे यांनी तिला फसवून आपल्या घरासमोरील गोठ्यात नेले. त्यांनी मुलीसोबत क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्याचे समजते. प्रथम त्याने तिच्यावर बलात्कार केला, नंतर दगडाने चिरडून तिचा जीव घेतला. त्यानंतर टाळण्यासाठी त्याने तिचा मृतदेह गोठ्यात शेणाच्या ढिगाऱ्याखाली लवला.

जेव्हा मुलगी बराच काळ घरी परतली नाही, तेव्हा तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध सुरू केला. जेव्हा त्यांनी संपूर्ण गावात शोध घेतला आणि तरीही ती सापडली नाही, तेव्हा कुटुंबियांची चिंता वाढली. गोठ्यात शोध घेत असताना मुलीचा मृतदेह सापडला. ते दृश्य पाहून कुटुंबियांनी आक्रोश सुरू केला. सर्व गाव या घटनेने हादरून गेले.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला. जवळ लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये आरोपी मुलीला गोठ्याकडे घेऊन जाताना दिसला. यानंतर पोलिसांनी तात्काळ भीमराव कांबळे याला ताब्यात घेतले. सध्या त्याची सखोल चौकशी सुरू आहे.

या भीषण घटनेमुळे संपूर्ण गावात संतापाची लाट उसळली. शेकडे गावकरी घटनास्थळी जमले आणि त्यांनी आरोपीला कठेरात कठेर शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. गावकरी संतत्प आहेत. जोपर्यंत आरोपीला त्यांच्या ताब्यात दिले जात नाही, तोपर्यंत मृतदेह घेऊन जाणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. गावकऱ्यांनी तबेल्यासमोर तळ ठोकला आहे. पोलीस प्रशासन लोकांशी वाटाघाटी करत आहे, परंतु ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात कऱण्यात आला आहे.

संतप्त जमावाने मुंबई-बंगळूर महामार्ग रोखल्यामुळे वाहतूक कोंडी झाली. पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदीप सिंग गिल यांनी घटनास्थळी (Bhor Crime News) पोहोचून जमावाला शांत केले आणि या प्रकऱणात 15 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करण्याचे आश्वासन दिले.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored