Bengal Violence Chandranath Rath : परगणा जिल्ह्यातील मध्यग्राम येथे बुधवारी रात्री भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक (PA) चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या कऱण्यात आली. हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग केला आणि त्यांची हत्या केली.
नवी दिल्ली : 07-06-2026
पश्चिम बंगालमध्ये झालेल्या निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. यानंतर आता येथील राजकीय वातावरण संपूर्णतः हिंसक वळण घेत असल्याचे दिसून येत आहे. परगणा जिल्ह्यातील मध्यग्राम येथे बुधवारी रात्री भाजप नेते सुवेंदू अधिकारी (Bengal Violence Chandranath Rath) यांचे स्वीय सहाय्यक (PA) चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग केला आणि त्यानंतर दोहरिया परिसरात गोळीबार केला . स्थानिक सुत्रांनुसार, चार गोळ्या झाडण्यात आल्या, त्यापैकी तीन गोळ्या चंद्रनाथ यांच्या डोक्यात लागल्या.
Table of Contents
असा झाला हल्ला (Bengal Violence Chandranath Rath)
चंद्रनाथ रथ हे एका कामानिमित्त कारने जात असताना हल्लेखोरांनी त्यांची गाडी थांबवली. गाडी थांबताच दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी चंद्रनाथ यांच्यावर गोळीबार केला. यात गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या चंंद्रनाथ यांना रूग्णालयात नेण्यात आले., तिथे नंतर त्यांना मृत घोषित कऱण्यात आले. या घटनेनंतर परिसरात घबराट पसरली आहे. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, तपास सुरू कऱण्यात आला आहे.
दरम्यान, चंद्रनाथ रथ यांच्या हत्येवरून भाजपने तृणमूल कॉंग्रेसवर आरोप केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात आणखी एक व्यक्ती जखमी झाली असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हल्लेखोरांनी चंद्रनाथ यांचा बराचवेळ पाठलाग केला. त्यांची गाडी हळू होताच त्यांनी गोळीबार केला.
गोळीबाराचा व्हिडियो व्हायरल (Bengal Violence Chandranath Rath)
या गोळीबाराचा व्हिडियो आता व्हायरल होत आहे. यात गोळ्या लागून गाडीच्या पुढील आणि बाजूच्या काचा फुटल्या आहेत. दरम्यान, या हत्येनंतर पोलीस आणि केंद्रीय दलांनी परिसराला घेराव घातला आहे. हत्येची बातमी पसरल्यानंतर भाजप कार्यकर्ते आणि समर्थक वैद्यकीय केंद्राबाहेर जमले आणि त्यांनी आपला संताप व्यक्त करत आहेत.
निवडणुकीच्या यशात होता मोठा हात (Bengal Violence Chandranath Rath)
भाजपच्या सुत्रांनुसार, भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीदरम्यान सुवेंदू अधिकारी यांच्यासाठी काम कऱणाऱ्या टीममधील चंद्रनाथ हे प्रमुख सदस्यांपैकी एक होते. त्यांच्यापैकी उपस्थित असेलेले बुद्धदेव बेरा हे त्या पथकाचा भाग असल्याचे सांगितले जात असून, ते या हल्ल्यात जखमी झाले आहेत.
हिंसाचाराची 200 प्रकरणांची नोंद (Bengal Violence Chandranath Rath)
निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये उसळलेल्या हिंसाचारांत मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांचे वैयक्तिक सहाय्यक (PA) चंद्रनाथ रथ यांच्यासह आणखी तिघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी हिंसाचार, जाळपोळ, तोडफोड आणि हल्ल्याशी संंबंधित जवळपास 200 गुन्हे दाखल केले आहेत. 433 जणांना अटक केली आहे. 1100 हून अधिक लोकांना प्रतिबंधात्मक कोठडीत घेण्यात आले आहे.