Ashadhi Vari 2026 Schedule : महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा लाभली आहे. आषाढी वारी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि पवित्र वारी समजली जाते. वारीच्या काळात आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराकडे सर्व विठ्ठल भक्त पदयात्रा करत प्रस्थान करतात. यावर्षीच्या वारीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.
पुणे : 24-06-2026
यावर्षीच्या आषाढी वारी 2026 चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. यंदाची देवशयनी आषढी एकादशी 25 जुलै 2026 रोजी साजरी होणार आहे. यानिमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्या पालख्यांचे प्रस्थान कधी होणार याचे वेळापत्रक जाणून घेऊन.
Table of Contents
प्रमुख पालखी प्रस्थान ( Ashadhi Vari 2026 Schedule )
संत तुकाराम महाराज प्रस्थान (देहू) : मंगळवार, 7 जुलै 2026 रोजी देहूहून प्रस्थान
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी (आळंदी) : बुधवार, 8 जुलै 2026 रोजी आळंदीहून
संत ज्ञानेश्वर माऊली पालखी 8 जुलै रोजी दुपारी 3 वाजता आळंदीहून पंढरपूरसाठी रवाना होणार आहे.
पंढरपूर आगमन- 24 जुलै 2026
आषाढी एकादशी – 25 जुलै 2026 (मुख्य सोहळा)
संत तुकाराम महाराज पालखी – 7 जुला 2026 रोजी देहू येथून प्रस्थान
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख मुक्काम आणि रिंगण
पालखी सोहळा : मुख्य टप्पे ( Ashadhi Vari 2026 Schedule )
वारीच्या मार्गाचे पालखीचे होणारे मुक्काम आणि रिंगण सोहळे हे भाविकांसाठी मुख्य आकर्षणाचे केंद्र असतात.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी (आळंदी)
प्रस्थान : आळंदी येथून आषाढ कृष्ण अष्टमीच्या सुमारास प्रस्थान होते.
पुणे मुक्काम : पालखी पुण्यात दोन दिवस विसावते.
नीरा स्नान : माऊलींची पालखी नीरा नदी ओलांडून सातारा जिल्ह्यात प्रवेश करते.
जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी (देहू) ( Ashadhi Vari 2026 Schedule )
प्रस्थान : देहू मुख्य मंदिरातून भजन-किर्तनच्या गजरात प्रस्थान
इंदापूर रिंगण : गोल रिंगण सोहळ्यासाठी इंदापूरचे मैदान सज्ज असते.
अकलूज मुक्काम : सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाचा मुक्काम
कुठे असणार रिंगण ? आणि इतर मुक्काम ( Ashadhi Vari 2026 Schedule )
आषाढी वारी 2026 : संत ज्ञानेश्वर महाराज (माऊली) पालखी : मुक्काम आणि रिंगण सोहळ्यांची माहिती
पालखी 8 जुलै 2026 – संत ज्ञानेश्वर महाराज पालखी : मुक्काम आणि रिंगण सोहळ्यांची माहिती
पालखी 8 जुलै 2026 (बुधवारी ) रोजी दुपारी 3 वाजता आळंदीहून प्रस्थान करेल आणि 24 जुलै 2026 रोजी पंढरपूरला पोहोचेल. यात सुमारे 17 दिवस पायी प्रवास, 4 गोल रिंगण आणि 3 उभे रिंगण होणार आहे.
प्रमुख मुक्काम ( Ashadhi Vari 2026 Schedule )
8 जुलै : आळंदी (प्रस्थान आणि मुक्काम)
9-10 जुलै : पुणे ( 2 दिवस मुक्काम)
11-12 जुलै : सासवड (2 दिवस मुक्काम)
13 जुलै : जेजुरी
14 जुलै : वाल्हे
15 जुलै : लोणंद (नीरा स्नान )
16 जुलै : तरडगाव
17 जुलै : फलटण
18 जुलै : बरड
19 जुलै : नातेपुते
20 जुलै : माळशिरस
21 जुलै : वेळापूर
22 जुलै : भंडीशेगाव (बंधूभेट )
23 जुलै : वाखरी
24 जुलै : पंढरपूर (आगमन )
25 ते 28 जुलै : पंढरपुरात मुक्काम (आषाढी एकादशी सोहळा 25 जुलै ) नंतर परतीचा प्रवास
संपूर्ण वारीच्या प्रवासात सर्वात जास्त आकर्षणाचा भाग असतो ते म्हणजे रिंगण सोहळा. वारकरी आणि सेवेकरी यात सहभागी होतात.
रिंगण सोहळ्याचे वेळापत्रक ( Ashadhi Vari 2026 Schedule )
पहिले उभे रिंगण : 16 जुलै 2026 (चांदोबाचा लिंब, तरडगाव जवळ )
पहिले गोल रिंगण : 20 जुलै 2026 (पुरंदवडे, माळशिरस)
दुसरे रिंगण – 21 जुलै 2026 (खुडुस/ खडूस फाटा, वेळापूर)
तिसरे गोल रिंगण – 22 जुलै 2026 (ठाकुरबुवाची समाधी, भंडीशेगाव)
दुसरे उभे रिंगण – 23 जुलै 2026 (बाजीरावची विहीर, वाखरी )
तिसरे उभे रिंगण – 24 जुलै 2026 (इसबावी/ पंढरपूर प्रवेशादरम्यान, दुपारी )
या वेळापत्रकात थोडे बदल होऊ शकतात.