Europe HeatWave Red Alert : युरोपमधील तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे परिस्थिती तिथे खुप बिकट झाली आहे. फ्रान्स, ब्रिटन आणि इटलीसह अनेक देशांनी तात्काळ रेड अलर्ट जाहीर केला आहे. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून, हजारो घरांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.
ब्रिटन : 24-06-2026
संपूर्ण युरोप खंड (Europe HeatWave Red Alert )एका अत्यंत धोकादायक आणि जीवघेण्या उष्णतेच्या लाटेच्या विळख्यात सापडला आहे. निसर्गाच्या या कोपामुळे गेल्या अनेक वर्षांचे रेकॉर्ड मोडीत निघाले आहेत. येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. ब्रिटन, फ्रान्स, इटली यांसारख्या प्रगत देशांमध्ये कडक उन्हामुळे तेथिल जनजीवन विस्कळित झाले आहे. तेथील प्रशासनाला तात्काळ ‘रेड अलर्ट’ म्हणजेच आणीबाणीचा इशारा घोषीत करावा लागला आहे.
वाढत्या तापमानाचा फटका थेट तिथल्या पायाभूत सुविधांना बसला आहे. रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.तर हजारो नागरिक वीज आणि पाण्यावीना त्रस्त झाले आहेत.
ब्रिटनमध्ये परिस्थिती बिकट (Europe HeatWave Red Alert )
विशेषतः ब्रिटनमध्ये परिस्थिती चिंताजनक आहे. तेथिल रेल्वे रुळांना तीव् उष्णतेमुळे ताण निर्माण होण्याचा धोका असल्यामुळे अनेक रेल्वे सेवा तात्पुरत्या स्थगित कऱण्यात आल्या आहेत. नॅशनल रेल्वेने दिलेल्या इशाऱ्यानुसार, गॅटविक एक्सप्रेस आणि थेम्सलिंक सारख्या अत्यंत महत्त्वाच्या रेल्वे मार्गांवर शुक्रवारपर्यंत मोठा व्यत्यय येणार आहे. प्रशासनाने नागरिकांना अत्यंत महत्त्वाचे काम असल्याशिवाय प्रवास न कऱण्याचे कडक आवाहन केले आहे. प्रवाशांना स्टेशनवर ताटकळत रहावे लागत असून वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.
शाळांना सुट्ट्या आणि वीज संकट (Europe HeatWave Red Alert )
यावर्षी संपूर्ण युरोपला उष्णतेच्या लाटेचा विळखा पडला आहे. या उष्णतेच्या लाटेचा मोठा फटका लहान मुलांना बसू नये म्हणून ब्रिटनमधील सॉमरसेट, बकिंगहॅमशायर आणि ग्लॉस्टरशायरमधील सुमारे 300 हून अधिक शाळा पूर्णपणे किंवा अंशतः बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
फ्रान्समध्ये परिस्थिती खुप भयानक आहे. पश्चिम फ्रान्समध्ये अचानक विजेची मागणी वाढल्यामुळे आण तांत्रिक बिघाडामुळे तब्बल 68,000 हून अधिक घरांचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. फ्रान्सच्या इतिहासातील चालू हंगामातील हे सर्वात मोठे वीज संकट मानले जात आहे, ज्यामुळे लोकांना या कडक उन्हात एसी आणि पंख्यांशिवाय रहावे लागत आहे.
हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, फ्रान्समध्ये सध्या सरासरी तापमान 29.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. दुपारच्या वेळी अनेक शहरांमध्ये पारा 40 ते 42 अंश सेल्सिअसच्या पार जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे रात्रीच्या वेळीही लोकांना या उष्णतेपासून दिलासा मिळत नाहीये, कारण रात्रीचे तापमानही 23 ते 28 अंश सेल्सिअसच्या आसपास रहात आहे. सरकारी आकडेवारीनुसार, फ्रान्सची 90 टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या सध्या या तीव्र आणि जीवघेण्या उष्णतेच्या थेट प्रभावाखाली आली आहे.
नियमांचे उल्लंघन, पाण्यात बुडून मृत्यू, इटली-नेदरलँडसमध्ये हाय अलर्ट (Europe HeatWave Red Alert )
उष्णतेच्या तीव्र त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी अनेक नागरिक समुद्रकिनारे आणि नद्यांकडे धाव घेत आहेत. मात्र, सुरक्षिततेचे नियम न पाळल्यामुळे फ्रान्समध्ये तब्बल 40 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण युरोपमध्ये पोहण्याबाबत कडक नियमावली लागू कऱण्यात आली आहे.
इटलीच्या आरोग्य मंत्रालयानेही मिलान आणि रोमसह देशातील 16 प्रमुख शहरांमध्ये तात्काळ ‘रेड अलर्ट’ लागू केला आहे. नेदरलँडसच्या ‘कोड ऑरेंज’ लागू कऱण्यात आला आहे. ॲमस्टरडॅम शहरात नागरिकांना दिलासा देण्यासाठी काही सार्वजनिक जलतरण तलावांमध्ये मोफत प्रवेश दिला जात आहे.
पर्यावरण तज्ञांच्या मते ही भीषण परिस्थिती म्हणजे केवळ नेहमीचा उन्हाळा नाही, तर हे जागतिक तापमानवाढीचे थेट आणि विनाशकारी परिणाम आहेत. वातावरणातील हवा एकाच ठिकाणी स्थिर झाल्यामुळे गरम हवेचा थर तिथेच अडकून राहिला आहे. ज्याला सायंटिफिक भाषेत ‘हिट होम’ असेही म्हटले आहे. येत्या काही दिवसांत ही उष्णतेची लाट पोलंड, क्रोएशिया आणि हंगेरी या पूर्व युरोपीय देशांमध्ये वेगाने पसरणार आहे. या देशामध्येही सर्वोच्च सुरक्षा सतर्कता जाहीर करण्यात आली आहे.