Table of Contents
आग्रा लाल किल्ला (Agra Red Fort ) हिंदूस्तानच्या राजकीय प्रवासाचा साक्षीदार ( पुर्नबांधणी -इ.स. १५७३)
आग्रा शहर ( Agra Red Fort ) जागतिक दर्जा मिळालेल्या अनेक प्राचीन वास्तूंचे शहर म्हणता येईल. या शहरात ताजमहल, फतेहपुरसिक्री, आग्रा लाल किल्ला अशा एका पेक्षा एक सुंदर वास्तू आहेत. या पुरातन वास्तू बघण्यासाठी दरदिवशी या शहराला हजारो, लाखो पर्यटक भेट देत असतात. आज या लेखात आपण आग्र्याच्या लाल किल्ल्याविषयी( Agra Red Fort ) जाणून घेणार आहोत.
जेव्हा मी आग्र्याच्या या भव्यदिव्य किल्ल्याला भेट दिली तेव्हा मला हा भुईकोट किल्ला एखाद्या राजमहालाप्रमाणे भासला होता. याच भव्य किल्ल्यावरून मुघल बादशहांनी संपूर्ण हिंदूस्थानावर राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता.
बाबर, हुमायुं, अकबर, जहांगीर, शहाजहां आणि औरंगजेब हे त्यातील काही महत्त्वाचे मुघल शासक म्हणता येतील. मात्र हा किल्ला मुघलांनी विस्तारित करण्याआधी तो हिंदूस्थानातील कोणत्या शासकाकडे होता, नंतर तो कोणाकडे गेला, हा इतिहास फार महत्त्वाचा आणि रंजक आहे. तो इतिहास, किल्ल्याची वास्तूरचना, इतिहासातील घटना, त्याचे महत्त्व हे सगळे आपण जाणून घेणार आहोत.
आग्रा शहराचा प्राचीन इतिहास – आग्रा लाल किल्ला: एक ऐतिहासिक वारसा
आग्रा शहर स्थित आग्रा लाल किल्ला (लाल किल्ला किंवा आग्रा किल्ला) हा भारताच्या ऐतिहासिक वारशातील एक अद्वितीय ठिकाण आहे. हा किल्ला ( Agra Red Fort ) केवळ त्याच्या वास्तुकलेमुळेच नाही, तर त्याच्या ऐतिहासिक महत्त्वामुळेही प्रसिद्ध आहे. या लेखात, आपण आग्रा लाल ( Agra Red Fort ) इतिहास, त्याची मुघल वास्तुकला, सांस्कृतिक महत्त्व आणि पर्यटकांसाठी असलेल्या आकर्षणांबद्दल टप्प्याटप्प्याने चर्चा करू.
आग्रा हे शहर भारतातील उत्तर प्रदेशात यमुना नदीच्या काठावर वसलेले आहे. देशाची राजधानी असणाऱ्या दिल्ली शहरापासून सुमारे २०६ किलोमीटरवर दक्षिणबाजूला आग्रा शहर आहे. मुघल साम्राज्यापूर्वी चा आग्रा शहराचा आणि या आग्रा लाल किल्ल्याचा( Agra Red Fort ) इतिहास फारसा स्पष्ट नाही. जो काही उपलब्ध आहे त्यावरून असे दिसते की, हा किल्ला ( Agra Red Fort ) पूर्वी सिकरवार वंशाचे राजपूत राजे होते त्यांच्या अधिकाराखाली हा किल्ला होता. त्यावेळेस आग्रा लाल किल्ला ( Agra Red Fort ) साध्या विटांनी बांधलेला होता.
पुढे महमद गजनवीने हिंदूस्थानावर आक्रमण करून आग्रा लाल किल्ल्यावर ( Agra Red Fort ) कब्जा मिळवला. महमंद गजनवी हा मध्य अफगानिस्तानातील गजनवी राजवंशांचा एक प्रमुख शासक होता. जो इराणच्या साम्राज्य विस्तारासाठी ओळखला जातो. हा गजनवी तूर्क होता आणि त्याच्या समकालीनांमध्ये पूर्वेकडे इस्लामीक राज्ये स्थापन करण्यामध्ये त्याचा मोठा वाटा होता.
हिंदूस्थानामध्ये इस्लामी शासन स्थापन करण्यासाठी आणि येथील संपत्ती लूटून नेण्यासाठी तो ओळखला जातो. तो एक आक्रमक शासक होता. त्याच्यानंतर आलेल्या सिकंदर लोदीने दिल्लीत सुलतान वंशाचे राज्य स्थापित केले. त्यावेळी त्याने आग्र्याला भेट दिली होती. त्यानंतर त्याने या आग्रा लाल किल्ल्याची ( Agra Red Fort ) डागडुजी १५०४ मध्ये करून घेतली.
१५०६ मध्ये त्याने इथे आपली राजधानी वसवली आणि येथूनच तो शासन करू लागला. त्याचा मृत्यू १५१७ मध्ये आग्र्याच्या लाल किल्ल्यात ( Agra Red Fort ) झाला. पुढे त्याचा मुलगा इब्राहिम लोदी यानेही पुढील नऊ वर्षे म्हणजे पहिल्या पानिपतच्या महायुद्धात त्याचा मृत्यू झाला, तोपर्यंत म्हणजे १५२६ पर्यंत येथूनच शासन केले. त्याच्या कार्यकाळात येथे अनेक वास्तू, मशिदी, विहिरी यांचे बांधकाम करण्यात आले.
पहिल्या पानिपत युद्धानंतर मुघलांची सत्ता स्थापन झाली आणि त्यांनी या किल्ल्यावर ( Agra Red Fort ) कब्जा केला. त्यावेळी आग्र्याच्या लाल ( Agra Red Fort ) अमाप संपत्ती होती. त्या संपत्तीतच प्रसिद्ध कोहिनूर हिरा होता असे सांगण्यात येते. इब्राहिम लोदीच्या नंतर येथे बाबराचे वास्तव्य होते. पुढे १५३० मध्ये हुमायुने येथे शासन केले. मात्र त्याचा लवकरच शेरशहा सूरीने पराभव केला आणि सुरीने या किल्ल्यावर कब्जा केला.
या किल्ल्यावर ( Agra Red Fort ) या अफगानी सुरी यांचा अंमल पुढे पाच वर्षे राहिला. शेवटी मुघलांनी १५५६ मध्ये पानिपतच्या दुसऱ्या युद्धात त्यांचा पराभव करून परत एकदा आग्र्याच्या लाल किल्ल्यावर ताबा मिळवला. या सर्व घडामोडींनंतर पुढे बराच काळ मुघलांचेच वास्तव्य येथे होते.
अकबराचे आग्रा किल्ल्याच्या ( Agra Red Fort ) पुर्नबांधणीतील योगदान –
अकबराने येथे आपली राजधानी वसवली तो काळ १५५८चा होता. अकबराच्या इतिहासकाराने लिहून ठेवले आहे की, आग्र्याचा हा किल्ला ( Agra Red Fort ) विटांनी बांधलेला होता आणि त्याचे नाव बादलगढ असे होते. अकबराने या किल्ल्याची( Agra Red Fort ) लाल बलुआ दगडामध्ये पुनर्बांधणी करून घेतली. या किल्ल्याच्या निर्मीतीसाठी अनेक मोठ्या नावाजलेल्या वास्तूकारांची मदत घेण्यात आली होती. आतून हा किल्ला विटांनी आणि बाहेरून लाल दगडांनी बांधला आहे.
एकुण आठ वर्षे या किल्ल्याच्या ( Agra Red Fort ) लागली. चौदा लाख चव्वेचाळीस हजार कारागिरांनी या किल्ल्याच्या निर्मीतीत सहभाग घेतला होता. यावरूनच या किल्ल्याची भव्यता आपल्या लक्षात येते. शेवटी १५७३ मध्ये अकबराच्या कार्यकाळात आग्रा लाल किल्ल्याची ( Agra Red Fort ) पूर्ण होऊन त्याला वैभवशाली स्वरूप प्राप्त झाले.आज आपल्याला ज्या स्वरूपात हा किल्ला( Agra Red Fort ) बघायला मिळतो त्याचे स्वरूप घडवले ते अकबराचा मुलगा शहाजहां याने. त्याने या किल्ल्याच्या अंतर्गत भागात त्याच्या कार्यकालात अनेक वास्तू बांधल्या. ज्या आजही आपल्याला बऱ्याच अंशी चांगल्या अवस्थेत बघायला मिळतात.
शहाजहान बादशहाला पांढऱ्या रंगातील संगमरवरी वास्तूंचे जास्त आकर्षण असावे, कारण त्याने या आग्रा लाल किल्ल्यातील अनेक वास्तू पाडून त्याच्या आवडत्या पांढऱ्या संगमरवरी दगडात वास्तू बांधल्याचे आपल्याला दिसते. तशी माहिती येथील माहितीगारांकडून देण्यात येते.
पुढे त्याने आपल्या पत्नीच्या थडग्यासाठी जो प्रसिद्ध ताजमहालबांधला त्याचे दर्शन येथीलच( Agra Red Fort ) एका महालातून व्हावे अशी त्याने ताजमहाल बांधताना काळजी घेतली होती. आणि दैवदुर्विलास असा की, पुढे त्याच्या मुलाने औरंगजेबाने जेव्हा त्याला कैद करून याच ( Agra Red Fort ) नजरकैदेत ठेवले होते, तेव्हा तो येथील मुसम्मन बुरूजावरील एका संगमरवरी झरोख्यातून ताजमहालाकडे बघत दिवस कंठत असे.
याच बुरूजाच्या जागेतच त्याचा मृत्यू झाला. आजही हा झरोखा आपल्याला बघायला मिळतो. येथून खरोखरच ताजमहालाचे विहंगम दुश्य आणि यमुनानदीचा परिसर दिसतो.
याठिकाणीच नमाज पढण्यासाठीची बादशहाची विशेष जागाही आहे. आजही या सर्व वास्तू फार चांगल्या अवस्थेत आहे. त्यावरील नक्षीकाम, भव्यता विशेष आहे. या संपू्र्ण किल्ल्यातील ही एक जागा विशेष म्हणता येईल.
आग्रा शहरावर मुघलांच्या पतनानंतर, काही काळ मराठा साम्राज्याचे अधिपत्य होते. त्यानंतर येथे ब्रिटीशांचे राज्य आले. आणि आग्रा लाल किल्ल्याचे उरले सुरले वैभव जाऊन आजच्या आधुनकि काळात जो किल्ला उरला आहे तो आपण पहात आहोत. आज जो किल्ला उभा आहे तोच इतका सुंदर, भव्य वाटतो, तर जेव्हा येथे अमाप संपत्ती, सजावट होती तेव्हा तो किती सुंदर वाटत असेल हे सतत जाणवत रहाते.
आग्रा लाल( Agra Red Fort ) आकार आणि बांधकामशैली –
किल्ला बांधण्यासाठी लाल बलूच दगडाचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे त्याला ‘लाल किल्ला’ हे नाव प्राप्त झाले. किल्ल्याचा ( Agra Red Fort ) साधारणतः 2.5 किलोमीटर लांब आणि 2 किलोमीटर रुंद आहे. त्याच्या भव्य भिंती 20 मीटर उंच आहेत, ज्यामुळे हा किल्ला सुरक्षिततेच्या बाबतीत एक प्रभावी किल्ला समजला जातो.
आग्रा लाल ( Agra Red Fort ) किल्ल्याची वास्तुकला –
आग्रा लाल किल्ल्याची ( Agra Red Fort ) वास्तुकला मुघल स्थापत्यकलेचा एक उत्तम उदाहरण आहे. किल्ल्याच्या भिंतींवर आणि इमारतींवर अनेक सुंदर नक्षीकाम आहेत. आजही हा किल्ला इतका सुस्थितित असल्याचे पाहून आपण आश्चर्यचकित होतो. किल्ला इतका विस्तिर्ण आहे परंतु तरीही या किल्ल्यातील काही प्रमुख ठिकाणांची नावे आणि त्यांची वैशिष्ट्ये सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. ते खालीलप्रमाणे आहेत:
अंगुरी बाग
ही एक सुंदर आणि विस्तिर्ण अशी बाग आहे. येथून पर्यटक संपूर्ण( Agra Red Fort ) किल्ल्याची भव्यता अनुभवू शकतात. मुघल स्थापत्यकलेत मोठ्या बागांना किल्ल्याच्या आत, महालांच्या बाजूला विशेष स्थान असल्याचे दिसून येते. त्यातीलच ही एक विशेष बाग म्हणता येईल.
दीवान-ए-आम
दीवान-ए-आम म्हणजे जनतेसाठी असलेला दरबार. येथे साम्राट अकबर सामान्य जनतेसाठी दरबार भरवत. येथे सामान्य जनतेच्या समस्या व शंका समजून घेतल्या जात होत्या. या दिवानखान्याच्या भिंतींवर असलेले नक्षीकाम, सुंदर स्तंभ आणि खुले छत या किल्ल्याच्या वास्तुकलेच्या उत्कृष्टतेचा परिचय देतात. येथील ( Agra Red Fort ) एक अद्वितीय सजावट असलेला मंच आहे. याच मंचावर बादशहा बसत असे.
दीवान-ए-खास
दीवान-ए-खास म्हणजे खास लोकांसाठी असलेला दरबार. हा दिवानखाना भव्य आहे आणि विशेष पाहुण्यांसाठी बनविण्यात आला होता. त्यानुसार येथे उच्च दर्जाच्या कलाकुसरींचे आपल्याला दर्शन होते. येथील भिंतींवर अलंकृत नक्षीकाम, रंगीबेरंगी दगड वापरून केलेले काम हे सर्वकाही उत्कृष्ट स्थापत्यकला दर्शवते. बादशहासाठी ( Agra Red Fort ) असलेले उच्चासन आज एका एका जाळीदार आवरणाने सुरक्षित करण्यात आले आहे.
स्वर्ण मंडप
झोपडीसदृश्य आकाराचे सुंदर कलाकुसर करण्यात आलेले हे सभामंडप आहेत. किल्ल्याच्या ( Agra Red Fort ) सुंदरतेत ते भर घालतात.
जहांगीर महल
हा एक फार विस्तारित असा महाल आहे. अकबराने तो आपल्या मुलासाठी खास बनवला होता.
खास महाल
संपूर्ण किल्ल्यातील ( Agra Red Fort ) एक श्वेतवर्णीय संगमरवरातील सुंदर वास्तू आहे. जवळ जवळ सर्व किल्ला अतिशय सुंदर अशा तपकिरी लाल किल्ल्यात बांधलेला आहे. मात्र किल्ल्याच्या मध्यभागी आल्यावर आपल्याला श्वेतवर्णीय संगमरवरी महाल नजरेस पडतो. सुंदर कमानी, खांब यांनी युक्त असणारा हा महाल पर्यटकांसाठीते विशेष आकर्षण म्हणता येईल. या महालाच्या बाजूने कमानीयुक्त उंच भिंतींचे सज्जे आणि मधोमध मोठे हिरवळीचे उद्यान आहे.
मोती मस्जिद
ही बादशहा शहाजहांची खासगी मशिद होती. येथे त्याचे रोजचे नमाज पठण होत असे. अगदी नंतर त्याच्या पुत्राने औरंगजेबाने त्याला कैदेत टाकल्यानंतरही त्याचा याठिकाणचे नमाजपठण सुरू असल्याची माहीती येथील फलकांवर लिहिण्यात आलेली आहे.
मुसम्मन बुर्ज
ताजमहालाचे दर्शन जेथून घडते ते ठिकाण. संगमरवरी जाळीदार नक्षीकामाने सुशोभित असे हे ठिकाण आहे. अष्टकोनी आकारातील संगमरवरातील येथील सज्जा आणि खिडकी या किल्ल्यातील सर्वात गुढ भासणारी जागा वाटते. कैदेत असणारा बादशहा शहाजहा या खिडकीतून ताजमहाल पहात आपले उर्वरित आयुष्य कंठत असे.
कुतुब मिनार
आग्रा लाल ( Agra Red Fort ) कुतुब मिनार एक प्रसिद्ध मिनार (टॉवर) आहे, जो ऐतिहासिक वास्तुकलेचा एक उत्तम नमुना आहे. या टॉवरच्या आसपासचा परिसर सुंदर उद्यानांद्वारे सजवलेला आहे. किल्ल्याच्या अंतर्गत भागात अनेक भव्य उद्यानांची खास रचना त्याकाळात करण्यात आलेली आहे.
मुघल बाग
किल्ल्यातील मुघल बाग एक सुंदर उद्यान आहे, जिथे विविध फुलं आणि वेली आहेत. हे उद्यान अत्यंत शांत भासते. किल्ला बराच मोठा आहे आणि तो फिरताना जर तुम्हाला थोडी विश्रांती घ्यावी वाटली तर ही बाग त्यासाठीचे उत्तम ठिकाण आहे. याशिवाय अनेक छोट्या मोठ्या वास्तू येथे आहेत.
याशिवाय आग्रा लाल किल्ल्यात अनेक तोफा, मुघल कार्यकालातील रजपूत राजांचे महाल, बादशहांचे अंघोळीची ठिकाणे ज्याला हमामखाने म्हणत ते, मोठे मोठी कारंजी, भव्य रस्ते आणि भिंती असे बरेच काही आहे जे पर्यटकांसाठी एक खजिनांच आहे.
आग्रा लाल किल्ल्याचे सांस्कृतिक महत्त्व
हा लाल किल्ला भारतीय इतिहासात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. हा किल्ला फक्त ऐतिहासिक स्थळ नसून, सांस्कृतिक विविधतेचे आणि एकतेचे प्रतीक आहे. 1947 मध्ये भारतीय स्वतंत्रतेच्या आंदोलनातील महत्त्वपूर्ण घटना येथे घडल्या. किल्ल्यात सांस्कृतिक कार्यक्रम, कला प्रदर्शने आणि विविध उत्सव देखील आयोजित केले जातात. यामुळे, या ऐतिहासिक ठिकाणी भारतीय संस्कृती आणि परंपरेचा उत्सव साजरा केला जातो.
पर्यटकांचे आकर्षण
आग्रा किल्ला आज भारतातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. येथे दरवर्षी लाखो पर्यटक येतात, जे किल्ल्याचा इतिहास, वास्तुकला आणि संस्कृती यांचा अनुभव घेतात आणि त्यांचा पर्यटन अनुभव समृद्ध करतात.
ऐतिहासिक अनुभव
आग्रा लाल किल्ला अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. येथे अनेक चित्रे, शिल्पे आणि इमारती आहेत, ज्यांमुळे आपल्याला त्या काळातील ऐतिहासिक कथा समजून घ्यायला मदत होते.
अशीच एक महत्त्वाची घटना जी आपल्या सर्वांच्या लाडक्या आणि शुरवीर अशा छत्रपती शिवाजी महाराजांची जी याच आग्र्याच्या लाल किल्ल्याशी निगडीत आहे. त्यामुळे येथे भेट देताना आणि येथील ‘दिवाने खास’ हा दिवानखाना फिरून पहाताना क्षणोक्षणी त्या घटनेची आपण मनातल्या मनात उजळणी करत असतो.
त्यावेळी आपले महाराज आणि छोटे शंभू राजे कुठे बरं येथे उभे असतील, कसे महाराजांनी आपला झालेल्या अपमानाचा बाणेदारपणे सामना करून हा दरबार सोडला असेल या सर्व प्रसंगाची कल्पना करून आपल्या अंगावर रोमांच उभे रहातात.
छत्रपती शिवाजी महाराज आणि आग्र्याचा लाल किल्ला –
ती घटना थोडक्यात अशी – पुरंदराच्या तहामुळे शिवाजी महाराजांना मुघलांच्या काही अटी पाळाव्या लागल्या होत्या. मात्र ते कधीही औरंगजेबाला भेटण्यासाठी उत्सुक नव्हते. मात्र मुघल सरदार मिर्झा राजे जयसिंग यांच्या आग्रहामुळे आणि स्वराज्याच्या हितासाठी राजे आग्र्याला जायला तयार झाले होते.
. त्यानुसार सोमवार दिनांक ५ मार्च १६६६ रोजी महाराज नऊ वर्षांच्या शंभू राजांसह राजगडावरून औरंगजेबाच्या भेटीस आग्र्यास जाण्यास निघाले. पुढे ११ मे १६६६ या दिवशी महाराज आग्र्यास येऊन पोहोचले. कुँवर रामसिंग व फिदाई खान यांनी महाराजांचे स्वागत करून त्यांना औरंगजेबाच्या वाढदिवशी बादशहाच्या भेटीस घेऊन यावे अशा सूचना असतानाही वेळेवर अनेक बदल करून अगदी ठरवून महाराजांचा वेळोवेळी अपमान करण्यात आला.
प्रत्यक्ष बादशहाच्या भेटी प्रसंगी बादशहाने केलेल्या दुर्लक्षित व्यवहारामुळे शिवाजी महाराज नाराज झाले होते. मात्र पुढे महाराजांना त्यांच्या कर्तृत्वा अनुसार, त्यांचा आब राखून दरबारात योग्य वागणूक दिली गेली नाही. त्यामुळे त्यांच्या नाराजीचे रुपांतर क्रोधात झाले.
स्वाभिमानी महाराज प्रत्यक्ष बादशहाच्या दरबारात जाहीर नाराजी नोंदवत संतापाने या किल्ल्याच्या ‘दिवाने खास’ मधुन निघुन गेले होते. त्यावेळी मुघल साम्राज्याचा सर्वेसर्वा असणाऱ्या क्रूर औरंगजेबाच्या समोर असे करणे किती धाडसाचे असेल हे शब्दात व्यक्त न करण्यासारखेच आहे.
आज इतिहासातील या घटनेची वर्णने थोड्याफार फरकाने अनेक ठिकाणी आहेत. मात्र तुम्ही जेव्हा या आग्रा किल्ल्याला भेट द्याल तेव्हा हे सर्व काही कल्पनेच्या आणि प्रत्यक्ष किल्ल्यातील या ठिकाणाच्या माध्यमातून अनुभवू शकता.
याठिकाणी दिवाने खास आणि दिवाने आम या दरबारांमध्ये बादशहाचे उंचावरील आसन आहे. त्या समोर उभे राहून आपण त्यावेळचा दरबार आणि शिवाजी महाराजांची ही रोमांचकारी धाडसी कृती नक्कीच कल्पनेने अनुभवू शकतो. या एका घटनेसाठीही आग्र्याचा हा लाल किल्ला मला फार महत्त्वाचा वाटतो.
आग्रा किल्ल्यातील सुंदर नक्षीकाम
आग्रा लाल ( Agra Red Fort ) किल्ल्यातील विविध नक्षीकाम, सजावट आणि वास्तुकलेचा अनुभव घेणे हे पर्यटकांसाठीचे मुख्य आकर्षण आहे. इमारतींच्या भिंतींवरील कलाकृती आणि स्थापत्यशास्त्राचे तंत्र अद्वितीय आहे.
( Agra Red Fort ) शिल्पकला एक अद्वितीय अनुभव देते. इमारतींवर असलेल्या शिल्पांचे निरीक्षण करून पर्यटक त्यावेळच्या स्थापत्य कला कौशल्याने अचंबित होतात.
संरक्षण आणि देखभाल
आग्रा लाल किल्ला ( Agra Red Fort ) एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक स्मारक असल्यामुळे, त्याचे संरक्षण आणि देखभाल अत्यंत आवश्यक आहे. भारतीय सरकारने या किल्ल्याच्या संरक्षणासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये किल्ल्याच्या भिंतींना वावटळीपासून संरक्षण देणे, शुद्धता राखणे, आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करणे समाविष्ट आहे.
युनेस्कोने २००७ ला आग्रा किल्ल्याला जागतिक वारसा स्थाळाच्या यादीत स्थान दिले आहे. किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व जतन करण्यासाठी विविध कार्यकम आयोजित केले जातात. तसेच, ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करणे, ऐतिहासिक माहिती पुरवणे आणि किल्ला संवर्धनासाठी जागरूकता निर्माण करणे महत्वाचे आहे. यामुळे पुढच्या पिढीला या ऐतिहासिक वारशाचा अनुभव घेता येईल.
तुम्ही येथे कसे जाल
तुम्हाला जर विमानाने जायचे असेल तर तुम्ही दिल्ली पर्यंत विमानाने प्रवास करू शकता. याशिवाय रेल्वे, बस किंवा कार अशा अनेक पर्यांयांचा विचार तुम्ही आग्र्याला जाण्यासाठी करू शकता. संपूर्ण आग्रा शहर फिरण्यासाठी तुमच्याकडे कमीत कमी तीन दिवसतरी असायला हवेत. ताजमहाल, लाल किल्ला, जवळचे फतेहपुरसिक्री आणि बाकीचे छोटे स्थळं पहाण्यासाठी जास्तीत जास्त वेळ असेल तर तुम्ही या सर्व वास्तू निवांत पाहू शकता.
खरेदी आणि काय काळजी घ्याल
आग्रा शहर खरेदीसाठीही फार चांगले आहे. संगमरवराच्या अनेक सुंदर वस्तू, आग्र्याचा खास प्रसिद्ध पेठा अशा अनेक बाबींसाठी येथे खरेदीही उत्तम करता येते. म्हणून येथे निवांत वेळ काढून फिरा. टुरिस्ट गाईड आणि विक्रेत्यांच्या नको इतक्या आग्रहाचा तुम्हाला थोडा त्रास होऊ शकतो, मात्र त्यांना बळी न पडता योग्य निर्णय घेणे हे या ठिकाणी कौशल्याचे काम ठरू शकते. तेवढी काळजी येथे फिरताना नक्की घ्या.
आग्रा स्थित लाल किल्ला ( Agra Red Fort ) केवळ एक ऐतिहासिक किल्ला नाही, तर तो भारतीय संस्कृती, इतिहास आणि स्थापत्यकलेचा एक अद्वितीय नमुना आहे. त्याच्या भव्यतेत, स्थापत्यकलेत आणि ऐतिहासिक महत्त्वात अनेक गोष्टी आहेत, ज्या प्रत्येकाला आकर्षित करतात. लाल किल्ला एक असे स्थळ आहे, जिथे आपण इतिहासाच्या अनेक कथा अनुभवू शकतो.
एक मात्र खरे की,आग्रा लाल किल्ल्याने खरा सुवर्ण काळ बघितला तो, मुघल साम्राज्यातील काळ होता. त्याकाळात या किल्ल्याने अनेक महत्त्वाच्या राजकीय घटना, कौटुंबिक उत्सव, सण समारंभ, अनेकांचे जय-पराजय असं सगळं अनुभवलं आहे. आज तोच किल्ला मुकपणे आपल्याला त्यावेळच्या वैभवाची पुसटशीका होईना अनुभुती देत उभा आहे.
जर तुम्ही आग्रा शहराला भेट द्यायला गेला, तर येथील लाल किल्ल्याला ( Agra Red Fort ) भेट द्या. हे ठिकाण तुम्हाला एक वेगळा अनुभव देईल, जो आपल्याला इतिहासाची आणि भारतीय संस्कृतीची विशालता समजून घेण्यासाठी मदत करेल. लाल किल्ला भारताच्या ऐतिहासिकतेचा मोठा पुरावा आहे. त्याचे जतन, संवर्धन करणे हे सर्व भारतीयांचे कर्तव्य आहे.
- ज्योती भालेराव
This post was last modified on November 24, 2024 7:10 pm
View Comments (1)
“This is exactly what I was looking for, thank you!”