PM Narendra Modi Letter : 6 नोव्हेंबर हा दिवस भारताच्या लोकशाहीसाठी महत्त्वाचा दिवस मानला जातो. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताच्या संविधान सभेने जगातील सर्वात मोठे आणि सखोल संविधान औपचारिक स्वीकारले. आज या दिवसाच्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान मोदी आणि एक विशेष गोष्ट केली आहे. काय आहे ते जाणून घेऊ.
दिल्ली : 26/11/2025
26 नोव्हेंबर हा दिवस भारताच्या लोकशाही इतिहासात अत्यंत महत्त्वाचा दिवस समजला जातो. कारण 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताच्या संविधान सभेने जगातील सर्वात मोठे आणि सखोल संविधान औपचारिकरित्या स्वीकारले. या दिवसाला संविधान दिन (Constituion Day) म्हणून ओळखले जाते. दरम्यान संविधान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना एक पत्र (PM Narendra Modi Letter) लिहिले आहे. यात त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे.
काय म्हणाले पंतप्रधान ? PM Narendra Modi Letter
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधून पात्र लिहिले आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “माझे प्रिय देशाचे नागरिक. नमस्कार, आजचा दिवस हा प्रत्येक भारतीयासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. याच दिवशी 1949 मध्ये संविधान सभेने भारताचे संविधान स्विकारले होते. म्हणूनच एनडीने सरकारने 2015 मध्ये 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला”.
पुढे आपल्यात पत्रात पंतप्रधान मोदी म्हणतात, ” आपले संविधान एक पवित्र दस्तऐवज आहे. भारतीय संविधानाच्या शक्तीमुळेच माझ्यासारख्या गरीब कुटुंबातून पंतप्रधानपदापर्यंत पोहोचवले आहे. संविधानाच्या ताकदीमुळेच मला 24 वर्षे सरकारचा प्रमुख म्हणून काम करता आले. मला आठवतयं मी 2014 मध्ये जेव्हा पहिल्यांदा संसद भवनात प्रवेश केला होता, तेव्हा मी संसदेच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाले होते. 2019 मध्ये मी जेव्हा संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये प्रवेश केलेला मी संविधानासमोर (PM Narendra Modi Letter) मी नतमस्तक झालो होतो.
Leave a Reply