• Home
  • दिल्ली
  • Delhi Bomb Blast Update, Shocking Information : दिल्ली बॉम्ब स्फोटसाठी ॲपचा वापर आणि आय-20 कार खरेदी, चौकशीदरम्यान आरोपी डॉक्टरची माहिती
Delhi Bomb Blast Update

Delhi Bomb Blast Update, Shocking Information : दिल्ली बॉम्ब स्फोटसाठी ॲपचा वापर आणि आय-20 कार खरेदी, चौकशीदरम्यान आरोपी डॉक्टरची माहिती

Delhi Bomb Blast Update : दिल्ली स्फोटाविषयी दिवसेंदिवस धक्कादायक माहिती समोर येत आहे. या स्फोटासाठी खरेदी केलेल्या स्फोटकांचा साठा सुरक्षित ठेवण्याती जबाबदारी डॉ.मुझम्मिल यांच्यावर होती. स्फोटके आणि रसायनांचा साठा त्यांच्या भाड्याच्या घरात हलवला जात असे.

दिल्ली : 18/11/2025

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोट ( Delhi Bomb Blast Update ) प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. जैश-ए-मोहम्मद च्या मॉड्यूलशी आणि त्यांच्याशी संबंधित अटक कऱण्यात आलेल्या डॉक्टरांच्या चौकशीतून तपास यंत्रणांना महत्त्वाचे आणि धक्कादायक पुरावे मिळाले आहेत आरोपींच्या मोबाईल फोनच्या फॉरेन्सिक तपासणीत सिग्नल ॲपवर एक ग्रुप आढळून आला आहे. या ग्रुपचा प्रमुख डॉ.मुझ्झफर होता. या ग्रुपमध्ये डॉ. उमर, डॉ.आदिल आणि डॉ. शाहीन यांचाही समावेश असल्याचे आढळून आले आहे.

तपास अधिकारी काय म्हणतात ? ( Delhi Bomb Blast Update )

तपास अधिकाऱ्यांच्या मते , या मॉड्यूलमध्ये डॉ. उमरची भूमिका महत्त्वाची होती. डॉ. उमरने अमोनियम नायट्रेट, ट्रायएसीटोन ट्रायपेरोक्साइड (टीएटीपी) किंवा इतर कोणतेही रसायन खरेदी करायचा तेव्हा ते खरेदी केलेले प्रमाण, स्रोत आणि ते कसे तयार केले जाईल यासह तपशीलवार माहिती गटात पोस्ट केली जात असे. डिजीटल फूटप्रिंटसवरून असे दिसून आले आहे की उमरने अमोनियम नायट्रेट, टीएटीपी, सल्फर डायऑक्साइडसह बहुतेक स्फोटक रसायने आणि टायमर आणि वायर्ससारखी उपकरणे खरेदी करण्यात आली होती.

मुझम्मिलवर स्फोटकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ( Delhi Bomb Blast Update )

खरेदी केलेल्या स्फोटकांच्या साठा सुरक्षित ठेवण्याती जबाबदारी डॉ. मुझम्मिल यांच्यावर होती. जेव्हा जेव्हा स्फोटके आणि रसायनांचा साठा त्यांच्या भाड्याच्या घरात हलवला जात असे, तेव्हा मुझम्मिल त्या सर्व वस्तूंचे फोटे काढून मॉड्यूलला पाठवत असे. यामगचा उद्देश स्फोटके सुरक्षितरीत्या साठवली गेल्याची खात्री करून देणे हा होता. शिवाय, डॉ. उमर मॉड्यूलकडून वापरल्या जाणाऱ्या आय-20 कारच्या खरेदीसंदर्भात माहितीही तो नियमितपणे शेअर करत असे.

तपासादरम्यान समोर आलेले महत्त्वाचे नाव म्हणजे फैसल इशाक भट्ट. तो जैश-ए-मोहम्मदशी संबंधित या मॉड्यूलचा हँडलर असल्याचा संशय आहे. डॉ. उमर स्फोटके गोळा करणे, त्यांची तयारी करणे, चाचण्या घेणे आणि इतर संबंधित माहिती दररोज या हँडलरला पाठवत असल्याची माहिती आरोपींनी दिली आहे. अटक केलेल्या आरोपींना अजूनही या हँडलरची खरी ओळख पटलेली नाही.

चार पाकिस्तानी हँडलर्सची नावे उघड ( Delhi Bomb Blast Update )

एजन्सींच्या माहितीनुसार, फरार मुझ्झफर अफगाणिस्तानात पळून गेल्यानंतर मॉड्यूलच्या संपूर्ण ऑपरेशन व रिपोर्टींगची जबाबदारी हा हँडलर सांभाळत होता. तपासात असेही आढळले की हँडलर +966 कोड असलेला सौदी अरेबियाचा व्हर्च्युअल नंबर वापरत होता. त्याची खरी ओळख शोधण्याचे काम सध्या गु्प्तचर यंत्रणा करत आहेत.

प्राथमिक तपासानुसार ‘फैसल इशाक भट” हे नाव टोपणनाव असण्याची शक्यता आहे. पाकिस्तानातील जैश नेटवर्कने संपूर्ण कटाचे स्थानिकीकरण दाखवण्यासाठी आणि पाकिस्तानी हात झाकण्यासाठी जाणूनबूजून काश्मिरी नावाचा वापर केल्याच्या संशय व्यक्त केला जात आहे. आतापर्यंतच्या तपासात जैश-ए-मोहम्मदच्या चार पाकिस्तानी हँडलर्सची नावे समोर आली असून त्या अबू उकाशा, हंजुल्लाह, निसार आणि फैसल इशाक भट यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Releated Posts

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000 Flights Cancelled In Six Days Chaos At Delhi Airport

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या…

ByByJyoti Bhalerao Dec 7, 2025