• Home
  • दिल्ली
  • Delhi Red Fort Blast, Shocking Update : जैश-ए-मोहम्मदची महिला कमांडर डॉ.शाहीनने दिली स्फोटाची कबुली ; दोन वर्षांपासून करत होते स्फोटकांचा साठा : Jaish E Mohammads Female Commander Dr Shaheen Shahid Has Confesses To Terror Plot
Delhi Red Fort Blast

Delhi Red Fort Blast, Shocking Update : जैश-ए-मोहम्मदची महिला कमांडर डॉ.शाहीनने दिली स्फोटाची कबुली ; दोन वर्षांपासून करत होते स्फोटकांचा साठा : Jaish E Mohammads Female Commander Dr Shaheen Shahid Has Confesses To Terror Plot

Delhi Red Fort Blast : सुरक्षा यंत्रणांनी स्फोटापूर्वी जैश-ए-मोहम्मदची महिला कमांडर डॉ.शाहीन शाहिद हिला अटक केली होती. या चौकशीदरम्यान तिने दहशतवादी कटाची कबुली दिली आहे.

दिल्ली : 12/11/2025

दिल्लीच्या लाल किल्ला परिसरामध्ये सोमवारी (दिनांक 10 ) सायंकाळच्या सुमारास भीषण स्फोट (Delhi Red Fort Blast) झाला. या दहशतवादी हल्ल्याच्या तपासाला आता प्रचंड वेग आला आहे. प्राथमिक तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, कारमधील स्फोट हा सामान्य आत्मघातकी बॉम्बस्फोटासारखा नव्हता, तर संशयिताने घाबरून घाईघाईत तो घडवून आणल्याचे संकेत आहेत. या हल्ल्याच्या तपासात एक मोठा खुलाला झाला आहे. सुरक्षा यंत्रणांनी स्फोटापूर्वी जैश-ए-मोहम्मदची महिला कमांडर डॉ. शाहीन शाहिद हिला अटक केली होती. या चौकशीदरम्यान तिने दहशतवादी कटाची कबुली दिली आहे.

सोमवारी संध्याकाळी 6:52 वाजता लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ झालेल्या स्फोटात 13 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. तर 24 जण गंभीर जखमी झाले आहेत. याची उच्च स्तरीय चौकशी सुरू असून यामध्ये सुरक्षा यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. भारतातील जैश-ए-मोहम्मद (जेईएम) ची महिला कमांडर डॉ.शाहीन शाहिद हिने तपास यंत्रणांसमोर कबूल केले आहे की ती आणि तिचे सहकारी डॉक्टर गेल्या दोन वर्षापासून स्फोटके साठवत होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे ध्येय भारतात मोठे दहशतवादी हल्ले करणे असे होते.

कट रचणारे अमोनियम नायट्रेटचा करत होते साठा (Delhi Red Fort Blast)

चौकशीदरम्यान डॉ. शाहीनने अनेक खुलासे केले आहेत. तिने सांगितले की ती तिचे सहकारी मुझिम्मिल आणि आदिल यांच्यासोबत अमोनियम नायट्रेटसारखे स्फोटके साठवत होती. ही संपूर्ण कारवाई जैश-ए-मोहम्मद (जेईएम) या दहशतवादी संघटनेच्या इशाऱ्यावर केली जात होती. चौकशीदरम्यान, शाहिनने असेही उघड केले की जेव्हा जेव्हा ती डॉ. उमरला भेटायची तेव्हा तो उत्साहाने जाहीक करायचा की ते देशभरात असंख्य दहशतवादी हल्ले करण्याची योजना आखत आहेत. सुरक्षा संस्था शाहीन शाहिदची सतत चौकशी करत आहेत आणि दिल्ली बॉम्बस्फोटांशी संबंधित आणखी अनेक महत्त्वाचे खुलासे समोर येऊ शकतात असा दावा केला जात आहे.

CCTV फुटेज आणि I20 कारची ओळख (Delhi Red Fort Blast)

तपास यंत्रणांनी लाल किल्ला स्फोटात वापरल्या गेलेल्या पांढऱ्या आय-20 कारचे सीसीटीव्ही फुटेज देखील मिळवले आहे. फुटेजपर्यंत मेट्रो स्टेशन पार्किंगमधून कार बाहेर पडताना दिसत आहे, ज्यामध्ये काळा मुखवटा घातलेला एक माणूस होता. असे म्हटले जात आहे की हा माणूस काश्मिरचा रहिवासी उमर नही होता. या कटाच्या संदर्भात तपास यंत्रणांनी मुफ्ती इरफानला अटक केली आहे.

फरिदाबाद विद्यापीठातील डॉक्टर ताब्यात (Delhi Red Fort Blast)

या दहशतवादी कटाशी संबंध समोर आल्यानंतर फरिदाबाद विद्यापीठाचे अल-फलाह विद्यापीठ आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले आहे. सुरक्षा यंत्रणांनी सखोल चौकशीसाठी विद्यापीठातील सात डॉक्टरांसह एकुण 13 जणांना ताब्यत घेतले आहे . स्फोटाचा कट रचणार्या डॉक्टरांनी टेलिग्रामचा वापर करून संवाद साधला का याचाही शोध घेतला जात आहे.

Leave a Reply

Releated Posts

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000 Flights Cancelled In Six Days Chaos At Delhi Airport

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या…

ByByJyoti Bhalerao Dec 7, 2025
1 Comments Text
  • Kathleen1158 says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    https://shorturl.fm/OlIrV
  • Leave a Reply