• Home
  • राष्ट्रीय
  • Delhi Riots 2020, Big Decision : दिल्ली दंगलीबाबत न्यायलयाचा मोठा निर्णय, दोन जणांची निर्दोष मुक्तता, सहा जण दोषी : Delhi Riots 2020 Courts Big Decision on Delhi Rotots
Delhi Riots 2020

Delhi Riots 2020, Big Decision : दिल्ली दंगलीबाबत न्यायलयाचा मोठा निर्णय, दोन जणांची निर्दोष मुक्तता, सहा जण दोषी : Delhi Riots 2020 Courts Big Decision on Delhi Rotots

Delhi Riots 2020 : सहा वर्षांपूर्वी फेब्रुवारी 2020 रोजी दिल्लीत दंगली झाल्या होत्या. या दंगलीत सकाळी 11 वाजताच्या सुमारास खजुरी खास परिसरात एका जमावाने महाराष्ट्र बँड नावाच्या दुकानाचे नुकसान केले होते. याबाबत आता न्यायालयाने निर्णय जाहीर केला आहे.

दिल्ली : 05/11/2025

दिल्लीतील 25 फेब्रुवारी 2020 रोजी झालेल्या दंगल्याबाबत (Delhi Riots 2020) दिल्लीतील करकुड्डमा न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. दिल्ली दंग्यातील जॉनी कुमार आणि मिथन सिंग यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सरकारी वकील आणि कोणत्याही साक्षीदाराने आरोपी हिंसक जमावाचा भाग असल्याते साक्ष दिली नाही. ते फक्त जमावासोबत उभे होते, त्यामुळे ते दंगलीत सहभागी असल्याते सिद्ध होत नाही. असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रवीण सिंह यांनी म्हटलं आहे.

सहा वर्षांपूर्वी 25 फेब्रुवारी 2020 रोजी दिल्लीत दंगली झाल्या. या दंगलीत सकाळी 11 वाजताच्या सुमारास खजुरी खास परिसरात एका जमावाने महाराष्ट्र बँड नावाच्या दुकानात नुकसान केले. या घटनेनंतर, अज्ञात व्यक्तींविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे ज़ॉनी कुमार आणि मिथन सिंग यांना अटक केली. नंतर एफआयआरमध्ये तोडफोडीच्या इतर सात घटना जोडण्यात आल्या.

त्याचवेळी याच प्रकरणात न्यायालयाने इतर सहा जणांना मात्र सहा महिने ते तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनवाण्यात आली आहे. प्रत्येक दोषीला 61,000 रूपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये ईशान्य दिल्लीत झालेल्या दंगली दरम्यान दंगल, जाळपोळ आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली.

ईशान्य दिल्ली दंगल प्रकरणात सहा जणांना शिक्षा (Delhi Riots 2020)

फेब्रुवारी 2020 मध्ये ईशान्य दिल्लीतील दंगलीदरम्यान दाखल झालेल्या प्रकरणात न्यायालयाने सहा दोषींना शिक्षा सुनावली आहे. हा खटला खजुरी खास पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआरशी संबंधित आहे. खजुरी खास पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या सादतपूर परिसरातील वकील अहमद यांच्या दुकानात दंगलखोरांनी लुटमार करून वस्तू जाळल्या होत्या. या प्रकरणात हरिओम गुप्ता, गोरख नाथ, भीम सैन, कपिल पांडे, रोहित गौतम आणि बसंत कुमार या सहा जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश (एएसजे) प्रवीण सिंह यांनी भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम 188,147,148, 135 आणि 450 अंतर्गत दोषींना शिक्षा सुनावली.

काय म्हणाले सत्र न्यायालय ? (Delhi Riots 2020)

निर्णय देताना न्यायाधीश प्रवीण सिंह म्हणाले की, 2020 च्या दंगलीपूर्वी या सर्व दोषींचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नव्हता आणि दंगलीनंतरही ते कोणत्याही गुन्ह्यात सहभागी झालेले नाहीत. त्यामुळे त्यांच्यात सुधारण्याची शक्यता आहे. म्हणूनच, राज्याने मागितलेल्या कमाल शिक्षेची आवश्यकता या प्रकरणात नाही असे मला वाटते.

पुराव्याअभावी न्यायालयाची भूमिका (Delhi Riots 2020)

आरोपी प्रत्यक्षात हिंसक जमावाचा भाग होते हे सिद्ध करणारे पुरावे नसल्यास केवळ उपस्थिती किंवा घोषणाबाजी हिंसाचाराचा पुरावा मानली जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने दोघांची निर्दोष सुटका केली. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी न्यायलयात आरोपींना साक्षीदारांशी छेडछाड केल्याता दावाही केला होता. पण न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला. न्यायाधीशांनी असे म्हटले की, ज्या पीडितांना स्वतःला इजा झाली आहे ते इतक्या वर्षांनंतर आरोपींची बाजू घेतील यावर विश्वास ठेवणे कठिण आहे. पण ठोस पुराव्याशिवाय, केवळ घोषणा किंवा हजेरीच्या आधारे कोणालाही दोषी ठरवता येत नाही.

Leave a Reply

Releated Posts

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000 Flights Cancelled In Six Days Chaos At Delhi Airport

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या…

ByByJyoti Bhalerao Dec 7, 2025
1 Comments Text
  • Beth4317 says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    https://shorturl.fm/SkKo2
  • Leave a Reply