• Home
  • राष्ट्रीय
  • रेल्वेचा प्रवास महागणार का? ; 1 जुलैपासून नवीन दर लागू होण्याची शक्यता ; किती वाढवणार तिकीट भाडे? : Railway Travel Can Be Expensive ; Indian Railway Ticket Price Hike Update

रेल्वेचा प्रवास महागणार का? ; 1 जुलैपासून नवीन दर लागू होण्याची शक्यता ; किती वाढवणार तिकीट भाडे? : Railway Travel Can Be Expensive ; Indian Railway Ticket Price Hike Update

Indian Railway Ticket Price Hike : गेल्या काही वर्षांपासून रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे तोट्यात असल्याचे सांगण्यात येते. मात्र एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा मुंबईसारख्या मोठ्या महानगरामध्ये मध्यमवर्गीयांना रेल्वे सर्वात जास्त परवडणारी आहे. सध्या काही अहवालांनुसार रेल्वेच्या तिकिटांच्या किंमती वाढणार असल्याते समजते. 

भारतीय रेल्वेकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने नियमांत बदल करण्यात येत आहे. कित्येक वर्षांनंतर रेल्वेकडून तिकीट दरात वाढ करण्यात येणार आहे. तोट्यात असल्याचा दावा करत रेल्वेने 1 जुलै 2025 पासून ट्रेन तिकिटांचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, 1 जुलैपासून एसी आणि नॉन एसी ट्रेनमधील प्रवास महागणार आहे. रेल्वेने मेल आणि एक्स्प्रेससह सगळ्या ट्रेनच्या तिकीटावरील दर वाढवले आहेत. रिपोर्टनुसार, रेल्वेने नॉन एसी कोचचे भाडे प्रति किलोमीटर 1 पैशांने वाढवले आहेत. तर, एसी कोचचे भाडे 2 पैसा प्रति किमीपर्यंत वाढवण्यात आले आहेत. रेल्वे विभागाने हा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाला पाठवला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर तुमचा रेल्वे प्रवास 1 जुलैपासून महागणार आहे.

1 जुलैपासून होणार वाढ 

रेल्वेकडून 1 जुलै 2025 पासून ट्रेनच्या तिकीटात वाढ करण्याची तयारी करण्यात आली आहे. रेल्वे बोर्ड 1 जुलैपासून तिकीटांच्या दरात वाढ करू शकतात. अनेक वर्षांनंतर रेल्वेने तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं प्रवाशांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. तसंच, महाराष्ट्रात गणेशोत्सव हा सर्वात मोठा सण आहे. या काळात लाखो प्रवासी मुळ गावी जात असतात. अशावेळी बहुतांश प्रवासी रेल्वेचा पर्याय निवडतात. अशावेळी ऐन गणेशोत्सवात रेल्वेची तिकीट महागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नॉन एसी जनरल मेल आणि एक्स्प्रेस ट्रेनचे तिकीटाच्या दरात 1 पैसा प्रति किमी अशी वाढ झाली आहे. तर AC क्लासचे दर 2 पैसे प्रति किमीने वाढणार आहे. म्हणजेच रोज किंवा जवळच प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशावर या निर्णयाचा परिणाम होणार नाही. 500 किमीपेक्षा जास्त प्रवासासाठी तिकीटाच्या दरात वाढ होणार आहे. या निर्णयाच्या अमंलबजावणीसाठी रेल्वे बोर्डाच्या मंजुरीची प्रतिक्षा आहे. हा नियम लोकल ट्रेनसाठी व महिन्याच्या पाससाठी लागू नसणार. फक्त लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठीच हा नियम आहे.

Leave a Reply

Releated Posts

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000 Flights Cancelled In Six Days Chaos At Delhi Airport

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या…

ByByJyoti Bhalerao Dec 7, 2025

TET Exam Update, Big News : TET परीक्षेच्या शिक्षक संघटना आक्रमक, 5 डिसेंबरला काढला जाणार भव्य मोर्चा : Teachers Union Aggressive Against Tet Exam A March Will Be taken Out On December 5th

TET Exam Update : येत्या 5 नोव्हेंबरला रोजी सकाळी 11 वाजता दसरा चौक या ठिकाणाहून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा…

ByByJyoti Bhalerao Dec 1, 2025

LPG Gas Price, Good News : 1 डिसेंबरपासून LPG गॅस सिलेंडरचे दर कमी झाले आहेत, जाणून घेऊ घरगुती आणि व्यावसायिक नवीन दर : LPG Cylinder Price Reduction From 1st December 2025

LPG Gas Price : महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. या दर कपातीचा कशावर नक्की…