Translate :

Sponsored

World Marathi Conference In Goa : गोव्यातील जागतिक मराठी संमेलनाचे उद्धाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार : Chief Minister Devendra Fadanavis Inaugurated The world Marathi Conference In Goa

जागतिक मराठी संमेलनाचे उद्धाटन गोवा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

World Marathi Conference In Goa : पणजी (गोवा) येथे जागतिक मराठी अकादमी आयोजित ‘ शोध जागतिक संमेलनाचे 9 जानेवारी रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात येणार आहे.

गोवा : 20/11/2025

पणजी (गोवा) जागतिक मराठी आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ या भव्य जागतिक संमेलनाचे 9 जानेवारी रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्धाटन होणार आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून, ‘पद्मविभूषण’ डॉ. अनिल काकोडकर हे संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविणार  आहेत. असे जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी श्रमिक पत्रकार परिषदेत सांगितले.

या मान्यवरांना प्रदान करण्यात येणार पुरस्कार (World Marathi Conference In Goa)

या जागतिक मराठी संमेलनात दिले जाणारे मानाचे पुरस्कार यंदा गोव्याच्या उद्योगक्षेत्रातील दिग्गज अनिल खवटे यांना ‘ जागतिक मराठी भूषण पुरस्कार ‘ तर चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते महेश मांजरेकर यांना ‘ मराठी जीवनगौरव पुरस्कार ‘ प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात येतील. संमेलनाचे कार्याध्यक्ष दशरथ परब व त्यांचे सहकारी संमेलनाच्या आयोजनाची उत्तम तयारी करत आहेत. अशी माहिती रामदास फुटाणे यांनी दिली आहे. यावेळी जागतिक मराठी अकादमी सदस्य, ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे, गौरव फुटाणे उपस्थित होते.

असे असणार नियोजन (World Marathi Conference In Goa)

9 ते 11 जानेवारी 2026 दरम्यान होणाऱ्या संमेलनात वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर येणार असून उद्धाटन समारंभ दिवशी भाषणे होणार आहेत, तर इतर दोन दिवशी मान्यवरांची मुलाखती होणार आहेत. जागतिक मराठी अकादमीतर्फे दिले जाणारे हे मानाचे सन्मान उद्योग, संस्कृती व कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाला दिलेली संस्थात्मक दाद आहे. ख्यातनाम अणुशास्राज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरणाऱ्या ‘शोध मराठी मनाचा’ या संमेलनात जगभरातील कर्तबगार मराठी बांधवांच्या उपस्थितीत या दोन्ही मान्यवरांच्या गौरव करण्यात येणार आहे. याशिवाय, गोव्यातील स्थानिक कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहेत.

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored