Translate :

Sponsored

World Blitzz Team Chess Competition; Divya Deshmukh Won At London : दिव्या देशमुखने रचला इतिहास, लंडन येथील स्पर्धेत चीनच्या दिग्गज खेळाडूवर केली मात !

Divya Deshmukh Chess :18 वर्षांच्या दिव्या देशमुख हिने लंडन येथे आयोजित केलेल्या वर्ल्ड ब्लिट्ज टीम चेस चॅम्पियनशिप स्पर्धेत चीनची दिग्गज बुद्धिबळपटू होउ यिफान हिला पराभूत केलं आहे. दिव्याने मिळवलेल्या या यशानंतर नरेंद्र मोदींनी सुद्धा तिचं कौतुक केलं आहे.

London : 2025-06-21

Divya Deshmukh Chess : भारतातील सर्वात चतुर आणि कौशल्यपूर्ण बुद्धिबळपटूंपैकी एक असणाऱ्या नागपूरच्या दिव्या देशमुख हिने बुद्धिबळाच्या जागतिक स्पर्धेत मोठं यश मिळवलं आहे. 18 वर्षांच्या दिव्या देशमुख हिने लंडन येथे आयोजित केलेल्या वर्ल्ड ब्लिट्ज टीम चेस चॅम्पियनशिप स्पर्धेत चीनची दिग्गज बुद्धिबळपटू होउ यिफान हिला पराभूत केलं आहे. दिव्याने मिळवलेल्या या यशानंतर नरेंद्र मोदींनी सुद्धा तिचं कौतुक केलं आहे.

WR बुद्धिबळ संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या यिफानने राउंड-रॉबिन सेमी फायनल सामन्याच्या पहिल्या सत्रात दिव्याला हरवले होते, परंतु दिव्याने दुसऱ्या सत्रात कमबॅक केलं आणि पांढऱ्या सोंगट्यांनी खेळून सुरुवातीला फायदा घेतला. दिव्याने मिळवलेल्या या यशाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

पंतप्रधानांनी केलं कौतुक :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर लिहिले की, ‘लंडनमध्ये झालेल्या वर्ल्ड टीम ब्लिट्ज चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या स्टेजच्या ब्लिट्ज सेमीफायनलमध्ये जगातील नंबर 1 ची खेळाडू असलेल्या यिफानला हरवल्याबद्दल दिव्या देशमुख हीच अभिनंदन. त्याचे यश त्याचा संयम आणि दृढनिश्चय दर्शवितो. यामुळे बऱ्याच बुद्धिबळ खेळाडूंना देखील प्रेरणा मिळेल. त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा’. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या पोस्टवर दिव्या देशमुखने रिप्‍लाय दिला. तिने म्हंटले की, धन्यवाद आदरणीय पंतप्रधानमंत्रीजी , तुमच्याद्वारे मला सन्मानित करण्यात येणं हे माझ्यासाठी सन्मान आणि प्रोत्साहनात्मक आहे.

Congratulations to Divya Deshmukh on defeating the World No. 1, Hou Yifan in the 2nd leg of Blitz semifinal at the World Team Blitz Championships, London. Her success highlights her grit and determination. It also inspires many upcoming chess players. Best wishes for her future… pic.twitter.com/mjdWO0llFT

— Narendra Modi (narendramodi) June 19, 2025

कोण आहे दिव्या देशमुख :

नागपुरच्या दिव्या देशमुख हिचा जन्म 9 डिसेंबर 2005 मध्ये झाला असून वयाच्या 5 व्या वर्षीपासून ती बुद्धिबळ खेळायला शिकली. दिव्याचे दोन्ही पालक वडील जितेंद्र आणि आई नम्रता हे डॉक्टर आहेत. दिव्याची बहीण बॅडमिंटनपटू असून तिला सुरुवातीपासून खेळाचे आकर्षण होते. 2012 मध्ये वयाच्या सातव्या वर्षी तिने अंडर -7 राष्ट्रीय चँपियनशिप जिंकली होती, त्यानंतर तिने अंडर-10 (डरबन, 2014) आणि अंडर-12 (ब्राजील, 2017) मध्ये जागतिक युवा विजेतेपद जिंकले. त्यानंतर दिव्या लवकरच महिला FIDE मास्टर बनली आणि ऑक्टोबर 2021 पर्यंत ती महिला ग्रँडमास्टर चा खिताब जिंकली. दिव्याने आतापर्यंत तीन गोल्ड, अनेक आशिया स्पर्धा आणि जागतिक युवा विजेतेपद जिंकली आहेत.

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored