नवी दिल्ली : 2025-05-07
भारतीय सैन्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. त्यासाठी ऑपरेशन सिंदूर ही मोहीम राबवण्यात आली होती. या हवाई मोहीमेची माहिती देण्यासाठी भारताकडून जी पत्रकार परिषद घेण्यात आली त्यात या दोन महिला अधिकाऱ्यांनी माहिती दिली. त्या महिला अधिकारी म्हणजे, विंग कमांडर व्योमिका सिंह ( wing Commander Vyomica Singh ) आणि (Colonel sofiya Qureshi ) कर्नल सोफिया कुरैशी.
भारतीय सैैन्याने कश्मिरमध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून बुधवारी पहाटे ऑपरेशन सिंदूर ही मोहीम पार पाडली. या मोहिमेची माहिती देण्यासाठी भारताकडून पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या पत्रकार परिषदेचे नेतृत्व केले ते व्योमिका सिंह आणि सोफिया कुरैशी यांनी .
ही पत्रकार परिषद झाल्यापासून संपूर्ण देशात या दोन अधिकार्यांचीच नावे सर्वांच्या तोंडी आहेत. ऑपरेशन सिंदूर कसे पार पडले, काय घडले याची माहिती देऊन सगळ्या जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या या दोन अधिकाऱ्यांविषयी आपण जाणून घेऊ.
Table of Contents
विंग कमांडर व्योमिका सिंह ( wing Commander Vyomica Singh ) यांचे शिक्षण आणि कामगिरी –
व्योमिका सिंह यांनी लहाणपणापासूनच ठरवले होते की, त्यांना भारतीय वायुसेनेत दाखल व्हायचे आहे. त्यासाठी त्यांनी इयत्ता सहावीपासूनच मनाची तयारी केली होती. त्यांच्या नावाचा अर्थ सुद्धा आकाशात रहाणारी म्हणजे व्योमिका असा होतो, हाही एक योगायोग म्हणावा लागेल, किंवा मग कुटुंबाने किती विचारपूर्वक हे नाव ठेवून, त्याची बिजे त्यांच्या संगोपनात रोवली असल्याचे आपल्याला दिसून येते. आज वायू सेनेचा एक महत्त्वाचा भाग झालेल्या व्योमिका यांनी त्यांचे हे नाव किती सार्थ आहे, हे दाखवून दिले आहे. शालेय शिक्षण पुर्ण केल्यानंतर त्यांनी नॅशनल कैडेट कोर ( NCC ) मध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांनी आपले अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्या भारतीय वायु सेनेत दाखल झाल्या. त्यांच्या कुटुंबातील त्या पहिल्या महिला आहेत, ज्या ,सैन्यात भरती झाल्या आहेत. भारतीय वायु सेनेत त्यांची सुरुवातीला हेलिकॉप्टर पायलट म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 18 डिसेंबर 2019 ला त्यांची फ्लाईंग ब्रांचमध्ये कायमस्वरूपी नियुक्ती झाली.
चालवले आहे चेतक आणि चीता हेलिकॉप्टर
विंग कमांडर व्योमिका सिंह यांना हेलिकॉप्टर चालवण्याचा बराच अनुभव आहे. आकाशात 2500 तासांपेक्षा जास्त भरारीचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. अनेक बचाव कार्य आणि अवघड मोहिमांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये व्योमिका सिंह यांनी अरुणाचल प्रदेशमध्ये घडलेल्या एका घटनेत बचाव कार्य करण्याच्या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. 2021 मध्ये माउंट मनीरंग येथील एका बचाव कार्यातही त्यांचा असाच महत्त्वाचा सहभाग राहिला आहे. हा पर्वत 21, 650 फुट इतका उंच आहे. येथे त्यांनी बचाव कार्याचे काम केले आहे. या बचावकार्यात तिन्ही दलांच्या महिला अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.
कर्नल सोफिया कुरैशी (Colonel sofiya Qureshi ) यांचे शिक्षण आणि कामगिरी
भारतीय सेनेतील सिग्नल कोरच्या अधिकारी असणाऱ्या कर्नल सोफिया कुरैशी या एका सैनिक कुटुंबातून येतात. त्यांच्या कुटुंबातील त्यांचे आजोबा हे भारतीय सैन्यदलात होते. त्या भारतीय सेनेतील पहिल्या महिला अधिकारी आहेत. त्यांनी फोर्स 18 मध्ये ट्रेनिंग तुकडीला लिड केले होते. त्यांचा जन्म गुजरात मधील वडोदरा येथे झाला. त्यांचे शिक्षण केंद्रीय विद्यालय, EME मधून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 1992-1995 मध्ये बीएससी केमेस्ट्री आणि बायलॉजीमध्ये त्यांनी आपले पोस्ट ग्रॅज्युएशन पुर्ण केले. पिएचडी करत असतानाच त्यांना भारतीय सेनेतील महिला भर्तीविषयीची माहिती मिळाली, आणि त्यांनी पिएचडी करण्याचे सोडून सैन्यात भरती होण्याचे ठरवले. त्यांच्या कुटुंबातील त्या तिसऱ्या पिढीतील सदस्य आहे, ज्यांनी सशस्र सैन्यात आपली सेवा देत आहेत. 1999 मध्ये त्यांनी चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग करून, सैन्यात प्रवेश केला. त्यानंतर त्यांना सैन्यात लेफ्टिनंट म्हणून नियुक्ति मिळाली. 2006 मध्ये कांगे मध्ये संयुक्त राष्ट्र शांति स्थापना मिशन मद्ये सैन्य पर्यवेक्षक म्हणून सेवा दिली. 2010 पासून त्या शांति अभियान (PKO) शी जोडलेल्या आहेत. पंजाह सीमेवर ऑपरेशन पराक्रम चालवले जात होते तेव्हा त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना जनरल ऑफिसर कमांडर इन चिफ (GOC-in-C ) चे प्रशंसापत्र प्रदान करण्यात आले होते.
काय आहे ऑपरेशन सिंदूर ?
पत्रकार परिषदेत विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी सांगितले की, पहलगाम मध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्याला प्रतुत्यर देऊन, त्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर या मोहिमे अंतर्गत कारवाई केली आहे. भारताने पाकिस्तानच्या ताब्यात असणाऱ्या भागात 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला. या हल्ल्याचा मुख्य उद्देश दहशतवाद्यांचे हे तळ उद्धवस्त करणे हा होता. जे दहशतवादी येथून त्यांचे काम करतात.