Nationalist Congress Party Anniversary : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी लाडकी बहिण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. काय म्हणाले अजित पवार ?
पुणे : 2025-06-10
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा वर्धापन दिनाचा (Nationalist Congress Party Anniversary )कार्यक्रम पुण्यात पार पडला. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना अजित पवारांनी विविध विषयांवर भाष्य केले. गेल्या काही काळापासून विरोधक राज्य सरकारची लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचे विधान करत आहेत. त्यानंतर आता लाडकी बहिण योजना बंद होणार का ? यावर अजित पवारांनी उत्तर दिले आहे. काय म्हणाले उपमुख्यमंत्री ?
लाडकी बहिण योजनेविषयी अजित पवार म्हणाले
लाडकी बहिण योजना बंद होणार का ? या विषयावर बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘जोपर्यंत आम्ही महायुतीत काम करत आहोत, तोपर्यंत लाडक्या बहिणींचे पैसे बंद होऊ देणार नाही. मी हा शब्द लाडक्या बहिणींना देतो. महिना संपल्यावर आदिती मला संपर्क साधते आणि दादा महिलांना पैसे द्या म्हणून सांगते. आम्ही तातडीने पैसे देतो’. अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींनी चिंता करण्याची गरज नाही.
पक्ष मोठा करायचा आहे – अजित पवार
लाडक्या बहिण योजनेवर महत्त्वाचे विधान केल्यानंतर अजित पवार पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आपल्याला मोठा करायचा आहे. त्यासाठी जास्तीतजास्त जागा निवडून आणायच्या आहेत. त्यासाठी लोक आपल्या पक्षात येत आहेत. मी बुलढाण्याला जात आहे. तिथे अनेकजण आपल्या पक्षात येणार आहे. प्रतापराव चिखलीकर, निशिकांत पाटील हे प्रयत्न करत आहेत. पदाधिकारी प्रयत्न करत आहेत. त्यांमुळे लोकं आपल्याकडे येत आहेत. नवीन येणाऱ्यांचं स्वागत करू,पण जुन्या लोकांनी आमचं काय ? असा विचार करू नये. तुमचंही चांगलं होईल. ज्याच्यात नेतृत्व असेल, धमक असेल, सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालता येईल, त्याला संधी दिली जाईल.
सर्व जाती धर्माच्या लोकांना सभासद करून घ्या, अजित पवारांचे आदेश
अजित पवार म्हणाले की, पुणे पिंपरी चिंचवडमध्ये 10 लाख सदस्य नोंदणी झाली पाहिजे. नाशिकमध्ये पाच लाख झाली पाहिजे. अशा पद्धतीने एक कोटीचं टार्गेट आपण ठेवलं आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना सभासद करून घ्या. गरीब असो की डॉक्टर, इंजिनियर वकील असो. त्यांना सभासद करून घ्या. प्रत्येकाला आपल्या विचारधारेशी जोडा. तुम्ही लोकांशी संपर्क करा, असे आवाहन अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केले आहे.