America-Iran War : अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या 60 टक्के शुद्ध असलेल्या समृद्द युनियमच्या ठावठिकाण्याबद्दल प्रश्न निर्माण झाले आहे. हल्ल्या आधी हे संवेदनशील आण्विक मटेरियल गुप्त स्थानी पोहचवले होते का ? हा प्रश्न सगळ्या जगाला आता पडला आहे. इराणचे अण्विक भविष्य ठरणार आहे, चे या प्रश्नाच्या उत्तरात.
आंतरराष्ट्रीय : 2025-06-23
इराणच्या आण्विक तळांवर अमेरिकेने बॉम्बहल्ले केल्यानंतर इराणमधील समृद्ध युरेनियमचा साठा नष्ट झाला की तो वाचला ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण अलिकडेच अमेरिकेने रातोरात एक मोठा हल्ला करीत इराणच्या तीन प्रमुख आण्विक साईटसना लक्ष्य केले आहे. हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र इराणच्या तीन प्रमुख युरेनियम साईसटना संपूर्णपणे नष्ट केल्याचा दावा केला आहे.
या हल्ल्यासाठी अमेरिकेने अत्याधुनिक B-2स्टीस्थ बॉब्मर्सन 30,000 पाऊंड वजनाचे बंकर -बस्टर बॉम्बचा वापर केला आहे. परंतू इतक्या भयानक हल्ल्यानंतरही अमेरिकेतच संशय घेतला जात आहे की इराणचा युरेनियम साठा सुरक्षित आहे. जर हा दावा खरा असेल तर प्रश्न उरतो की 400 किलोग्रॅम एनरिच्ड युरेनियम इराणने कसे वाचवले आणि तो कुठे लपवून ठेवला आहे.
कोठे गेले युरेनियम ?
इराणच्या आण्विक तळांवर बॉम्ब हल्ले केल्यानंतर रेडिएशन झाल्याचे कोणतेही वृत्त आलेले नाही. त्यामुळे इराण जवळ असलेले 408 किलोग्रॅम युरेनियम जे 60 टक्क्यांपर्यंतच शुद्ध म्हणजे समृद्ध आहे. (आण्विक शस्र बनवण्याच्या पातळीपर्यंत) आता हे युरेनियम कोठे आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर इराणने अमेरिकेच्या एअर स्ट्राईकची कबूली दिली, परंतू अमेरिकेच्या युरेनियम संदर्भातील अनाकलनीय रित्या मौन बाळगले आहे. वास्तविक इराणी अधिकाऱ्यांनी या हल्ल्याने झालेल्या नुकसानाचा विस्तृत अहवाल जाहीर केलेला नाही.
वृत्तसंस्थांचे दावे
बीबीसी वृत्तसंस्थेने एका इराणी अधिकाऱ्याचा हवाला देऊन म्हटले आहे की, ही संवेदनशील साम्रगी तिथून आधीच काढून टाकण्यात आली आहे. इराणी अधिकाऱ्यांच्या या दाव्यामुळे जागतिक पातळीवर खळबळ उडाली आहे. तरीही या विषयावर पाश्चात्य तज्ञांमध्ये स्पष्ट मतभेद आहे. हे सर्व ती युरेनियमची सामग्री आता कुठे आहे यावर अवलंबून आहे, असे फायनान्शियल टाईम्सने अमेरिकेचे माजी आण्विक नेगोशिएटर नेफ्यू यांचे म्हणणे मांडले आहे.