Translate :

Sponsored

WhatsApp Username Feature, 2026 : ‘युजरनेम’ फीचरवर केंद्राची मेटाला नोटीस, 3 दिवसांत स्पष्टीकरण मागितले : Whatsapp Username Feature India Hold Central Government Notice Meta Security Concerns

'युजनरनेम' फीचरवर केंद्राची मेटाला नोटीस, 3 दिवसांत स्पष्टीकरण मागितले .

WhatsApp Username Feature : व्हॉट्सअपच्या नव्या ‘Username’ फीचरवर केंद्र सरकारने आक्षेप घेतला असून मेटाला याबाबत नोटीस पाठवण्यात आली आहे. सुरक्षेच्या मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागवत सरकारने हे फिचर भारतात लागू कऱण्यास स्थगिती दिली आहे.

नवी दिल्ली : 02-07-2026 

व्हॉटसअप या ॲपची (WhatsApp Username Feature )लोक्रप्रियता सर्वश्रुत आहे. या ॲप शिवाय आता कोणाचेच काम होत नाही अशी परिस्थिती आहे. या ॲपमध्ये कायम कोणते ना कोणते नवीन फिचर लॉंच होत असतात.  आताही असेच एक फिटर मेटाने लॉंच केले आहे. मात्र भारत सरकारने त्याच्यावर सध्या स्थगिती आणली आहे. या सादर केलेल्या नवीन फिचर मुळे आता वापरकर्त्यांना मोबाईल नंबर शेअर न करताही इतरांशी संवदा साधता येणार आहे.

मात्र, या नव्या सुविधेच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकारने सावध भूमिका घेतली असून, व्हॉटसअपची मूळ कंपनी मेटाला बजावण्यात आली आहे. केंद्र सरकारने मेटाला व्हॉटसअपच्या ‘युजनरनेम’ फीचरबाबत तीन दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, या विषयावर सरकारसोबत चर्चा आणि सल्लामसलत पूर्ण होईपर्यंत भारतात हे फिचर रोलआऊच करू नये, असेही सांगण्यात आले आहे.

व्हॉटसॲपने सांगितले आहे की, प्रत्येक युजरनेम वेगळा आणि युनिक असेल. काही महत्त्वाची किंवा प्रसिद्ध नावे आधीच सुरक्षित ठेवण्यात येतील, जेणेकरून त्यांची नक्कल करता येणार नाही. तसेच व्हॉटसअप कोणतीही सार्वजनिक युजरनेम डायरेक्टरी तयार करणार नाही, म्हणजेच एखाद्या व्यक्तीचा युजरनेम माहिती असेल तरच त्याद्वारे संपर्क साधता येईल.

फिचरमुळे गोपनीयता वाढणार, पण सुरक्षिचे चिंता (WhatsApp Username Feature )

व्हॉटसअपच्या मते, या फिचरमुळे वापरकर्त्यांची गोपनीयता अधिक मजबूत होणार आहे. आतापर्यंत व्हॉटस ॲपवर एखाद्या नवीन व्यक्तीशी संपर्क साधण्यासाठी मोबाईल नंबर आवश्यक होता. आता मात्र युजर स्वतःचा वेगळा ‘युजरनेंम’ तयार करून त्याद्वारे संवाद साधू शकणार आहे.

यामुळे समोरच्या व्यक्तीला मोबाईल नंबर दिसणार नाही. मात्र, सरकारला भीती आहे की या सुविधेचा गैरवापर करून सायबर गुन्हेगार बनावट ओळख तयार करू शकतात. एखाद्या प्रसिद्ध व्यक्ती, कंपनी किंवा संस्थेच्या नावासारखा युजरनेम तयार करून लोकांची फसवणूक केली जाऊ शकते, अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

ऑनलाइन फसवणुकीचे नवे मार्ग निर्माण होणार (WhatsApp Username Feature )

सरकारी अधिकाऱ्यांत्या मते, युजरनेमच्या माध्यमातून ओळख लपवणे सोपे झाल्यास ऑनलाईन फ्रॉड आणि बनावट प्रोफाइलच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. याआधी टेलिग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवर बनावट युजरनेम आणि फेक प्रोफाइलच्या माध्यमातून फसवणूकीचे प्रकार समोर आले आहेत.

त्यामुळे व्हॉटसॲपच्या नव्या सुविधेचा वापर सुरक्षित पद्धतीने होईल का, याची सरकारकडून तपासणी केली जात आहे. व्हॉटसॲपने कालच याबाबतचे संकेत दिले होते. मात्र, केंद्र सरकारला यावर शंका उपस्थित झाल्याने केंद्राने त्याला तातडीने मान्यता दिली नव्हती. आता या फिचरला स्थगिती देण्यात आली आहे.

This post was last modified on July 2, 2026 12:08 pm

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored