Translate :

Sponsored

Wet Drought News, 2025 : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला ! मुख्यमंत्र्यांनी केली पहाणी, दिले मदतीचे आश्वासन : Heavy Rainfall In Maharashtra : Devastation, Relief Efforts

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ओला दुष्काळ भाग पहाणी दौरा.

Wet Drought News, Devendra Fadanavis : महाराष्ट्रात अतिवृष्टीने कहर केला आहे. अनेक भागात शेतीचे मोठे नुकसान झाले आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी झाली आहे, शेतकरी हवालदील झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या नुकसानग्रस्त भागांचा दौरा करत आहे. सोलापूर आणि लातूर जिल्ह्यांना भेट देऊन त्यांनी मदतीचे अश्वासन दिले आहे.

सोलापूर : 24/09/2025 

महाराष्ट्रात सध्या पावसाने धुमाकुळ घातला आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यासह अनेक भागात पावसामुळे दारूण परिस्थिती निर्माण झाली असून, गावं, घरं, शेती सगळं पाण्याखाली गेलं आहे. अतिवृष्टीमुळे लोकांना रहायला डोक्यावर छप्पर उरलं नाही,अनेक ठिकाणी अन्न-पाण्याची सोय उरलेली नाही. पूरपरिस्थिमुळे मोठी बिकट परिस्थीती उपलब्ध झालेली आहे. अशा परिस्थीतीत सरकारने आता शेतकऱ्यांना मदतीचे अश्वासन दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis)  आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नुकसानग्रस्त भागाचे दौरे सुरू आहेत. सोलापूर आणि लातूर या दोन जिल्ह्यांच्या पाहणी दौरा मुख्यमंत्र्यांकडून सुरू आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांचा माढ्यातील निमगावामध्ये पाहणी दौरा सुरू आहे. निमगाव आणि आसपासच्या गावात पावसाने मोठे नुकसान केले आहे. शेती अक्षरशः पाण्याखाली गेल्याने हाहाःकार माजलेला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज तिथे जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी आमदार अभिजीत पाटील, जयकुमार गोरे हे उपस्थित होते.

शेतकऱ्यांना सरकारी मदत (Wet Drought News )

निमगाव, दरफळ या गावांमध्ये जाऊन तेथील नुकसानाची, परिस्थितीची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. शेतकऱ्यांना तर सरकार मदत करणार आहेत. पण ज्यांच्या घराचं, अन्नधान्यांच नुकसान झालं आहे. अशा लोकांना देखील आम्ही मदत करणार आहोत. शासनाने हा निर्णय घेतला आहे की, कोणतेही अधिकचे निकष न लावता आणि आवश्कता असेल तर निकष शिथिल करून नागरिक-केंद्रीत मदत करणार आहोत. केवळ नियमांवर बोट न ठेवता, नागरिकांना व शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशा पद्धतीने मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. दिवाळीपूर्वीच सरकार सर्वांना मदत करणार आहे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

महिला, शेतकरी, नागरिक आणि अधिकाऱ्यांनीही मांडल्या व्यथा (Wet Drought News)

निमगाव आणि आसपासच्या गावात पावसाने मोठं नुकसान केलं आहे. शेती अक्षरशः पाण्याखाली गेल्याने लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिथे जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी स्थानिक महिला, शेतकरी, नागरिक आणि तेथील अधिकाऱ्यांनी झालेल्या नुकसानीची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. निमगावसह उंदरगाव, वाकाव, दारफळ यासह सीना नदीच्या पट्ट्यात येणाऱ्या गावांमध्ये परिस्थिती भिषण आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याबद्द्ल सविस्तर माहिती घेतली. ड्रोन दृश्य पाहिली, संपूर्ण परिस्थितीचा, नुकसानीचा आढावा घेतला आहे. सर्वांचं म्हणणं एकुण घेऊन मुख्यमंत्र्यांनी योग्य मदत करू अशी ग्वाही गावकऱ्यांना दिली आहे.

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored