Washington Post Crisis : वॉशिंग्टन पोस्टचे सीईओ विल लुईस यांनी मोठ्या प्रमाणात झालेल्या कपातीनंतर राजीनामा दिला आहे. गेल्या आठवडयात 300 हून अधिक पत्रकारांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. काय आहेत याची कारणं जाणून घेऊ.
वॉशिंग्टन : 08-02-2026
पत्रकारीतेमधील एक मानाचे पान समजल्या जाणाऱ्या ‘ वॉशिंग्टन पोस्ट’ (Washington Post Crisis )मुळे सध्या या क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. गेल्या काही दिवसांत या वृत्तपत्राने असे काही निर्णय घेतले आहेत, की त्यामुळे संपूर्ण जगभरातील पत्रकारीतेच्या क्षेत्राला हादरा बसला आहे. वृत्तपत्राचे सीईओ विल लुईस यांनी शनिवारी 7 फेब्रुवारीला आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याच्या अवध्या तीन दिवस आधी लुईस यांनी 300 हून अधिक पत्रकारांना कामावरून कमी केले होते. त्यांचा हा निर्णय अत्यंत वादग्रस्त मानला जात आहे.
Table of Contents
तब्बल 300 पत्रकारांची कपात (Washington Post Crisis )
बुधवार, 4 फेब्रुवारी 2026 हा दिवस वॉशिंग्टन पोस्टच्या इतिहासातील सर्वात दुःखद दिवस ठरला आहे. वृत्तपत्राच्या व्यवस्थापनाने एका झटक्यात 30 टक्के कर्मचारी कपात जाहीर केली. यामध्ये केवळ नवखे कर्मचारी नाहीत, तर अनेक दशकांपासून काम करणारे आंतरराष्ट्रीय वार्ताहर, संपादकीय फळी आणि क्रिडा विभागातील दिग्गजांचा समावेश आहे. माजी कार्यकारी संपादक मार्टी बॅरन यांनी या घटनेचे वर्णन “वृत्तपत्राच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस” असे केले आहे.
कोणत्या विभागात सर्वात जास्त कपात (Washington Post Crisis )
खेळ विभाग – वॉशिंग्टन पोस्टचा ऐतिहासिक खेळ विभाग जवळपास पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय वार्ताहर : रशिया-युक्रेन युद्ध आणि मध्य पूर्वेतील तणाव कव्हर करणाऱ्या अनेक अनुभवी रिपोर्टसना नोकरीवरून काढण्यात आले आहे.
स्थानिक बातम्या : स्थानिक मेट्रो रिपोर्टींमध्येही मोठी कपात करण्यात आली आहे.
सीईओ विल लुईस आणि बेझोस यांच्यावर टिकेची झोड (Washington Post Crisis )
नोव्हेंबर 2023 मध्ये पदभार स्विकारलेले विल लुईस यांचा कार्यकाळ वादांनी वेढलेला राहिला. त्यांनी राजीनामा देताना, म्हटले की, ” पोस्टच्या शाश्वत भविष्यासाठी काही कठिण निर्णय घेणे आवश्यक होते.” मात्र, कर्मचारी संघटनेने त्यांच्यावर सडकून टिका केली आहे. संघटनेच्या मते, लुईस यांनी एका महान अमेरिकन पत्रकारिता संस्थेला नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे Amzon चे संस्थापक आणि पोस्टचे मालक जेफ बेझोस यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असूनही बेझोस यांनी वृत्तपत्रला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी गुंतवणूक करण्याएवजी कर्मचारी कपातील समंती दिल्याने संताप व्यक्त होत आहे.
काय असेल वॉशिंग्टन पोस्टची पुढील वाटचाल (Washington Post Crisis )
विल लुईस यांच्या जागी मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) जेफ डी’ओनफ्रिओ यांची कार्यवाहक (CEO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. व्यवस्थापनाचे म्हणणे आहे की, आता वाचक आणि वापरकर्त्यांचे डोटा पाहुनच पुढील धोरणे ठरवली जातील. मात्र, पत्रकारांच्या मते, केवळ डेटावर अवलंबून राहिल्याने गंभीर आणि शोध पत्रकारितेचा बळी दिला जात आहे.