क्रिडा : 2025-05-12
चौदा वर्षांच्या आपल्या विराट कामगिरीनंतर भारताचा लाडका फलंदाज विराट कोहली याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियाचा आधार घेत त्याने एक पोस्ट करून आपल्या चाहत्यांना ही बातमी दिली आहे. गेल्या आठवड्यापासूनच याबाबतचे संकेत विराटने दिले होते. मात्र त्याविषयीचा ठोस निर्णय त्याने आज आपल्या चाहत्यांना सांगितला. रोहीच शर्मापाठोपाठ विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला निरोप दिला असल्याने क्रिकेट रसिकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. अनेक चाहचे सोशलमीडियावर याविषयी भावून पोस्ट, व्हिडियोकरून आपल्या भावना व्यक्त करत आहेत.
10 हजार धावांची अधुरी एक कहानी
विराट कोहलीने आपल्या इंन्स्टा अकांऊट वरून आपल्या निवृत्तीविषयीच्या भावना सविस्तर मांडल्या आहेत. त्यात त्याने आपण या कसोटी क्रिकेटच्या प्रवासाविषयी आनंदी असलो, कायम या प्रवासाकडे हसतमुखाने पहात असलो, तरी एक स्वप्न आता कधीच पूर्ण होणार नाही, याचं दुःख कायम सलत रहाणार आहे, ते म्हणजे कसोटी क्रिकेटमधील 10 हजार धावा पूर्ण करण्याचं स्वप्न. ते स्वप्न पूर्ण होण्याआधीच विराटने कसोटी क्रिकेटला रामराम केला आहे.
विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधील कारकिर्द
आपल्या चौदा वर्षांच्या विराट कारकिर्दीत विराट कोहलीने 123 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात 210 डावांमध्ये 46.85 च्या सरासरीने 9230 धावांचा पाऊस पाडला आहे. अवध्या 770 धावांनी त्याचा 10 हजार धावा करण्याचा विक्रम बाकी असताना त्याच्यासह क्रिकेट रसिकांसाठी हा निर्णय अवघड वाटणारा आहे. कसोटी मधील त्याची 30 शतकं आणि 31 अर्धशतकं क्रिकेट रसिकांच्या कायम स्मरणात रहातील.