Veteran Actor Vivek Lagoo Passes Away : ज्येष्ठ मराठी अभिनेते विवेक लागू यांचे निधन झाले आहे. मराठीतील ते एक कसलेले अभिनेते होते. दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे ते पती होते. त्यांच्या जाण्याने मराठी कलाविश्वात कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.
मुंबई : 2025-06-19
मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू (Actor Vivek Lagoo ) यांचे निधन झाले आहे. विवेक लागू हे दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे पती होते. त्यांच्या मागे एक मुलगी अभिनेत्री मृण्मयी लागू हा परिवार आहे. विवेक लागू यांनी अनेक मालिका आणि चित्रपटात आपल्या कसदार अभिनयाचा ठला उमटवलेला आहे. त्यांच्या निधनाचे कारण अजून स्पष्ट झाले नाही. उद्या म्हणजे 20 जूनला त्यांच्यावर अंधेरी परिसरातील ओशिवरामधील स्मशान भूमीत सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार कऱण्यात येणार आहे.
विवेक लागू यांची कारकिर्द
विवेक लागू हे एक अत्यंत सयंत अभिनय करणारे अभिनेते होते. त्यांनी काम केलेल्या चित्रपटांपैकी ‘गोदावरीने काय केले’, ‘अग्ली’,व्हॉट अबाऊट सावरकर, 31 दिवस या चित्रपटांतील काम गाजले. त्यांनी अनेक हिंदी, मराठी मालिकांमध्ये कामे केली. त्यांतील चार दिवस सासूचे, हे मन बावरे, एका लग्नाची दुसरी गोष्ट या काही मालिकांमधील त्यांची कामे प्रेक्षकांच्या कायम स्मरणात रहातील.
विवेक लागू यांच्या जाण्याने मराठी कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे.