Vasudev Gaitonde Painting : भारतीय चित्रकारांच्या सर्वात महागड्या चित्रांच्या विक्रीत आता चित्रकार वासूदेव गायतोंडे यांचे नावही सामिल झाले आहे. सफ्रनआर्ट कंपनीकडून आयोजित प्रदर्शनात ही विक्री झाली आहे. याविषयी आधिक माहिती जाणून घेऊ.
दिल्ली : 30/09/2025
राजधानी दिल्ली मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कला विक्री प्रदर्शनात भारतीय कलाकारांच्या कलाकृतींनी इतिहास रचला आहे. या विक्रीचे आयोजन सफ्रनआर्ट कंपनीने आपल्या 25 व्या वर्धापनदिनानिमीत्त केले होते. या प्रदर्शनात देश-विदेशातील कला प्रेमींनी सहभाग घेतला होता. या निमित्ताने कलाकार वासुदेव संतू गायतोंडे यांनी 1971 मध्ये निर्माण केलेल्या “अनटायटल्ट ऑयल ऑन कॅनव्हास पेंटींग” ने (Vasudev Gaitonde Painting) आत्तापर्यंतच्या विक्रीच्या सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. त्यांच्या या कलाकृतीला तब्बल 67.08 करोड रूपये इतकी किंमत मिळाली आहे.
वासुदेव संतू गायतोंडे यांची ही कलाकृती दुसरी सर्वात महागडी भारतीय कलाकृती ठरली आहे. गायतोंडे यांची आत्तापर्यंतची ही सर्वात महागडी विकली गेलेली कलाकृती आहे. याआधी त्यांचे एक पेंटींग 42 करोड रूपयांना विकले गेले होते.
या कलाविक्री प्रदर्शनात एम.एफ.हुसैन यांचे प्रसिद्ध पेंटींग ग्राम यात्रा हे 118 करोड रूपयांना विकले गेले आहे. ज्याचा समावेश सर्वात महागड्या भारतीय पेंटींगमध्ये होत आहे. वासुदेव गायतोंडेंच्या पेंटींगला इतकी किंमत मिळणे, म्हणजे भारतीय आधुनिक कलेला मिळणारी ही लोकप्रियता आहे. यामुळे भारतीय कलेविषयी इतर देशांमध्ये विश्वासार्हता वाढत आहे.
इतर कलाकृती (Vasudev Gaitonde Painting)
विक्रीसाठी लावण्यात आलेल्या बोलींमध्ये गायतोंडे यांच्या पेंटींगशिवाय अन्य कलाकृतींनीसुद्धा बाजी मारली. टायब मेहता यांच्या पेंटींगला सुद्दा मागणी होती. याशिवाय फ्रांसिस न्युटन सूजा च्या पेंटींगला ही चांगली किंमत मिळाली आहे. आधुनिक कलेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या नलिनी मलानी यांच्या कलाकृतींनाही मोठी मागणी दिसून आली.
सफ्रनआर्ट कंपनीचे हे आयोजन भारतीय कलेसाठी फार महत्त्वाचे ठरले. त्यांनी त्यांच्या 25 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने हे आयोजन केले होते.
यानिमित्ताने भारतीय कलाकारांना वैश्विक मंच मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय प्रेक्षक भारतीय कलाकारांच्या कामाचे कौतुक करत आहे. या विक्री प्रदर्शनामुळे भारतीय कलेचे भविष्य उज्ज्वल असल्याचे दिसून आले आहे. वासुदेव गायतोंडे आणि एम.एफ.हुसेन सारख्या दिग्गजांची कला बघुन तरूण पिढी या क्षेत्राकडे वळू शकते.
वासुदेव गायतोंडे यांच्याविषयी (Vasudev Gaitonde Painting)
वासुदेव गायतोंडे यांचा जन्म 2 नोव्हेंबर 1924 मध्ये महाराष्ट्रातील नागपुरमध्ये झाला. गायतोंडे भारतीय अमूर्त कलेसाठीचे प्रथम कलाउपासक मानले जातात. त्यांनी आपल्या कलेला कायम नॉन ऑबजेक्टीव्ह म्हटले आहे. त्यांनी कलेसाठी जेन दर्शन आणि प्राचीन कलेतून प्रेरणा घेतली. 10 ऑगस्ट 2001 ला गुडगांव मध्ये त्यांचे निधन झाले.