Translate :

Sponsored

Vasubaras Festival 2025, Religiously Big Day: वसुबारस म्हणजे काय ? का साजरा करतात हा सण ? जाणून घ्या सर्वकाही.

दिवाळीचा पहिला दिवस आहे म्हणजे 'वसुबारस'. जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व.

Vasubaras Festival 2025 : दिवाळी या महत्त्वाच्या सणाची सुरूवात होते ते वसुबारस या दिवसापासून. या दिवसाचे काय महत्त्व आहे, कसा साजरा करतात हा दिवस हे जाणून घेऊ.

विशेष लेख : 16/10/2025

भारतातील एक महत्त्वाचा सण म्हणजे ‘दिवाळी’. सुमारे पाच ते सहा दिवस साजरा करण्यात येणारा असा हा सण. या दिवसाची सुरूवात होते ती ‘वसुबारस’ (Vasubaras Festival 2025) या दिवसापासून. हा सण अश्विन महिन्यातील वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो. या दिवसाला ‘गोवत्स द्वादशी’ असेही म्हणतात. खरं तर हा दिवस शेतीप्रधान देशासाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. आपल्याकडे शेतकरी आणि हिंदू धर्मात ‘गायी’ ला देव मानतात. त्यामुळे या गायीविषयी कृतज्ञा व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा करतात. जाणून घेऊया या विशेष लेखातून या दिवसाचे महत्त्व.

कसा साजरा करतात हा दिवस ? (Vasubaras Festival 2025)

या दिवशी घरातील गोधनाची पूजा केली जाते. घरात जर गाय आणि वासरू असेल तर त्यांची पूजा केली जाते. दिवाळीच्या या दिवसापासूनच संध्याकाळी अंगणात दिवे लावले जातात. रांगोळी काढण्यास सुरूवात केली जाते. गाय, वासरू यांची पूजा करून, त्यांना भाकरी आणि भाजीचा नैवेद्य दाखवला जातो. गोडधोड खाऊ घातले जाते. काही स्रिया या दिवशी ‘उपवास’ करतात. गाय आणि वासरू यांना अंघोळ घालून, त्यांना हळद-कुंकू लावले जाते. त्यांचे औक्षण केले जाते.

जर तुमच्याकडे गाय-वासरू नसेल तर आजकाल शहरात गाय-वासराचे छायाचित्र लावून त्यांची पूजा करतात. नैवेद्य दाखवतात. गह्या दिवशी गहू, मूग हे धान्य न खाण्याची प्रथा काहीजण पाळतात. ज्या स्रिया उपवास करतात, त्या संध्याकाळी गवारीची भाजी आणि बाजरीची भाकरी बनवून, ते खाऊन उपवास सोडतात.

हा दिवस साजरा करण्याचा उद्देश्य (Vasubaras Festival 2025)

भारत हा देश कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. देशातील जास्त जनता ही ग्रामीण भागातून येते. अशावेळी आपल्या अनेक सणांना शेती आणि त्यापूरक व्यवसायाची पार्श्वभूमी आहे. जसे की पोळा, मकर संक्रात. तसाच हा दिवस आहे. पोळ्याला शेतीसाठी राबणाऱ्या बैलांची पूजा केली जाते. संक्रात हा सण नवीन पिके आल्यावर, त्यांचा आनंद साजरा करण्यासाठी खरं तर साजरा करतात. तसाच हा वसुबारसेचा दिवस. शेतकऱ्यांच्या आयुष्यात बैलांइतकेच महत्त्व आहे गायीचे. तिच्या दूध, शेण, गोमूत्र यांपासून त्याला अनेक फायदे मिळतात. त्यातून तो अनेक अर्थाजनाचे व्यवसाय करत असतो. अशावेळी तिच्याविषयी कृतज्ञा व्यक्त करण्यासाठी गाय-वासराची पूजा केली जाते.

भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे. घरात सुख समाधान लाभावे, म्हणून ही पूजा केली जाते. संध्याकाळी अंगणातील तुळशीपुढे, परिसरात दिवे लावून दिवाळीची सुरूवात होते. दिवाळीचा पहिला दिवस गोपूजन करून साजरा केला जातो. दिवाळीच्या सणाची सुरूवात म्हणूनही या दिवसाला महत्त्व आहे.

यावर्षी कधी आहे वसुबारस ? (Vasubaras Festival 2025)

यावर्षी दिवाळीचा हा पहिला दिवस 17 ऑक्टोबर 2025 या दिवशी आहे. मिसलेनियस मीडिया हाऊसच्या सर्व वाचकांना येणाऱ्या दिवाळीच्या शुभेच्छा.

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored