Translate :

Sponsored

Vaishnavi Hagawane Case : अखेर वैष्णवीचे बाळ आजोळी पोहोचले ; मुख्यमंत्र्यांच्या एका आदेशावर फिरले चक्र

सध्या महाराष्ट्राला हदरवून टाकणाऱ्या वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane )प्रकरणात एक चांगली गोष्ट घडली आहे. वैष्णवीच्या निधनानंतर तिचे बाळ इकडून तिकडे फिरवले जात होते. ते आता वैष्णवीच्या कुटुंबियांकडे म्हणजे त्याच्या आजोळच्या घरी सुखरूप पोहोचले आहे. 

पुणे : 2025-05-22

सध्या महाराष्ट्रात सर्वांच्या तोंडी वैष्णवी हगवणे या दुर्दैवी महिलेच्या हुंडाबळीचीच चर्चा सुरू आहे. मात्र या दुर्दैवी घटनेत एकच दिलासा देणारी घटना घडली आहे. पाच सहा दिवसांपासून मृत वैष्णवीचे दहा महिन्यांचे बाळ हे नातेवाईकांकडून इकडे तिकडे फिरवले जात होते, ते आता वैष्णवीच्या (Vaishnavi Hagawane ) आई-वडिलांकडे सुपूर्त करण्यात आले आहे. 

मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane ) हिने शुक्रवारी 16 मे रोजी सासरच्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. वैष्णवी हिचा प्रेमविवाह होता. त्यात दहा महिन्याचे छोटे मूल पदरात असताना तिने इतके टोकाचे पाऊल उचलले. वैष्णवी हिच्या मृत्यूनंतर तिचा पती शशांक हगवणे आणि त्याची आई लता आणि बहिण करिष्मा यांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र तिचा सासरा आणि अजितदादा पवार गटाचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी असणाऱ्या राजेंद्र हगवणे हा फरार आहे. यासगळ्या गदारोळात वैष्णवीचे दहा महिन्यांचे बाळ कोणा अज्ञात इसमाने की तिच्या नवऱ्याच्या मित्राने स्वतःच्या ताब्यात ठेवले होते. याविषयीची माहिती वैष्णवीचे मामा आणि वडिल यांनी माध्यमांकडे दिली होती. त्यावरून पाठपुरावा करून,शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून त्याबाळाचा शोध घेऊन ते बाळ आता त्याच्या आजोळी सुखरूप पोहोचले आहे. 

ते बाळ त्यांच्या पर्यत कसे आले याती माहिती वैष्णवीचे काका यांनी माध्यमांना दिली. 

आमचं बाळ आमच्या ताब्यात आलं आहे. आम्हाला बाकी काहीच बोलायचे नाही. आता आऱोपी कसे पकडले जातील एवढचं पहायचं आहे. आरोपींना लवकराच लवकर पकडावं आणि शिक्षा व्हावी हीच आमची विनंती आहे. हे बाळ एका अज्ञात व्यक्तीने आम्हाला फोन करून, बाणेरच्या हायवेवर आमच्या ताब्यात दिले आहे. आम्ही त्या व्यक्तीला कोणतेही प्रश्न विचारले नाहीत, कारण आम्ही बाळ मिळाल्याने आनंदी आहोत. 

वैष्णवी हगवणे हुंडा प्रकरण 

वैष्णवी कस्पटे (Vaishnavi Hagawane ) आणि शशांक हगवणे यांचा प्रेमविवाह होता. शशांक हगवणे हा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांचा मुलगा आहे. घरच्यांना हे लग्न तितकेसे मान्य नसूनही त्यांनी वैष्णवीच्या हट्टाखातर मोठ्या थाटामाटात, जंगी लग्न करून दिले होते. या लग्नात शशांकला 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी, महागडे घड्याळ, चांदीचे ताटं असा मोठा एवज दिला गेला होता. मात्र इतके करूनही पैसाला हपापलेल्या या कुटुंबाने लग्न झाल्यापासूनच्या चार महिन्यातच वैष्णवीचा छळ सुरू केला होता. जमिन खरेदीसाठी दोन कोटींची मागणी सध्या हगवणे कुटुंबाकडून सुरू होती. त्यात वैष्णवीच्या (Vaishnavi Hagawane ) छळाचा त्यांनी कडेलोट केला होता. तिला अमानुष मारहाण केली गेली. त्यातच तिने आत्महत्या केली. मात्र सासरच्यांनी तिची हत्या केली असल्याचे कस्पटे कुटुंबाचे म्हणणे आहे. सध्या हे प्रकरण जनमानसाने आणि माध्यमांनी उचलून धरले आहे. 

 

 

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored