Translate :

Sponsored

Vaishanavi Hagwane Dowry Case, 2025 : “ही केस म्हणजे समाजासाठी कलंक” न्यायालयाचे ताशेरे, सासू -ननंद यांचा जामीन रद्द : Bail please Of Mother In Law sister In Law And Husbunds Friend Accused In Vaishanavi Hagwane Death Case Rejected.

हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला.

Vaishanavi Hagwane Dowry Case : महाराष्ट्रातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी केसमध्ये मोठी घडामोड आहे. आरोपी सासू, नणंद आणि तिच्या पतिला न्यायालयाने जामीन नामंजूर केला आहे. काय म्हणाले न्यायालय, जाणून घ्या.

पुणे : 30/09/2025

वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणी आरोपी असणारे तिची सासू, नणंद आणि मित्र अशा तिघांनाही न्यायलयाने जामीन नामंजूर केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधिश के.पी.क्षीरसागर यांनी आरोपींचा जामीन मंजूर केला नाही. यावर मत देत न्यायाधीश म्हणाले की, वैष्णवी हगवणेचा मृत्यू हुंड्यामुळे झाला, ही घटना समाजावर लागलेला मोठा कलंक आहे. या आधारावरच त्या तिघांचा जामीन अर्ज रद्द करून, जामीन नाकारण्यात आला आहे.

मुळशी तालुक्यातील भूगांव येथील रहिवाशी असणाऱ्या वैष्णवी हगवणे (वय 24 ) हीने आपल्या सासरच्या घरी 16 मे ला गळ्याला फास लावून (Vaishanavi Hagwane Dowry Case) आत्महत्या केली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हदरला होता. सासरच्यांनी लग्न झाल्यापासून वैष्णवीला हुंड्यासाठी अपमानित करत छळले होते. त्यामुळे शेवटी कंटाळून, तिने आत्महत्या केली, असा आरोप तिच्या सासरच्यांवर म्हणजे हगवणे कुटुंबावर आहे.

या प्रकरणी वैष्णवीची सासू लता हगवणे (54), नणंद करिश्मा (21), पति शशांक हगवणे (27), सासरा राजेंद्र हगवणे आणि शशांक हगवणेचा मित्र नीलेश रामचंद्र हगवणे ( 35) यांना अटक करण्यात आलेली आहे. यापैकी लता, करिश्मा आणि निलेश या तिघांनी वकिल विपुल दुशिंग यांच्या मार्फत जामीनासाठी अर्ज केला होता. विशेष सरकारी वकिल उज्ज्वला पवार आणि कस्पटे कुटंबाचे वकिल शिवम निंबाळकर यांनी जामीनासाठी तिव्र विरोध केला होता.

क्रुरतेचा गाठण्यात आला होता कळस (Vaishanavi Hagwane Dowry Case)

आरोपींच्या जामीनाला विरोध करताना सरकारी वकिलांनी प्रतिवाद केला की , पोस्टमार्टमच्या रिपोर्टमध्ये वैष्णवीच्या शरीरावर 30 पेक्षा जास्त जखमां होत्या. तिला कायम क्रूर पद्धतीने छळले जात होते. हगवणे कुटुंबाचा मित्र निलेश याच्यावर खुर विश्वास होता. न्यायाधिश के.पी. क्षीरसागर यांनी सरकारी वकिलांचा म्हणणे मान्य करत सासू, नणंद आणि मित्र निलेश याचा जामीन अर्ज फेटाळत, रद्द केला आहे.

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored