Translate :

Sponsored

vaishanavi Hagwane Case Update : अखेर नराधम सासरा राजेंद्र हगवणे आणि दिर सुशील हगवणे यांना अटक

Rajendra Hagwane, Sushil  Hagvane : मुळशी येथील वैष्णवी हगवणे ( vaishanavi Hagwane ) हिने सासरच्याला जाचाला कंटाळून 16 मे ला आत्महत्या केली होती. तेव्हापासून तिचा सासरा राजेंन्द्र हगवणे आणि दिर सुशील हगवणे हे दोघे फरार होते. मात्र या प्रकरणाचा सगळ्याबाजूने जोर वाढल्यावल या पिता पुत्रांना आता अटक झाली आहे. 

पुणे : 2025-05-23

वैष्णवी हगवणे ( vaishanavi Hagwane ) हिने सासरकडच्यांच्या पैशांच्या मागणीला आणि होणाऱ्या अमानुष छळाला कंटाळून आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येला आठ दिवस होत आले, तरी तिचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दिर सुशील हगवणे हे दोघे फरार होते. अखेर आठ दिवसांनंतर पोलिसांना त्यांना अटक करण्यात यश आले आहे. 

वैष्णवी हगवणे हिचा लग्न झाल्यापासूनच सासरी पैसे आणि चारित्र्यावर संशय घेणे या गोष्टींमुळे अमानुष छळ सुरू होता. तिच्या आत्महत्येला सासरा राजेंद्र हगवणे, नवरा शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे हे जबाबदार असल्याचे वैष्णवीच्या आई-वडिल्यांचे म्हणणे आहे. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर त्वरीत तिचा नवरा, सासू आणि नणंदेला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र सासरा राजेंद्र हगवणे आणि दिर सुशील  (Rajendra Hagwane-Sushil  Hagvane  )हा फरार होता. 

राजेंद्र हगवणे यांचे राजकिय संबंध लक्षात घेता, या प्रकरणात राजकिय दबाव असल्याने त्याला अटक होत नसल्याचे बोलले जात होते. त्यामुळे या प्रकरणात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातले आणि त्याचा परिणाम म्हणून की काय, आज पहाटे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या पिता-पुत्रांना अटक झाली आहे. 

त्यांना अटक होण्याआधी गेले आठ दिवस हे दोघे (Rajendra Hagwane-Sushil  Hagvane  )फरार असताना, हॉटेलमध्ये मटणावर ताव मारण्याचा व्हिडियो व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सुन जिवानीशी गेली तरी या पैसेपिपासू लोकांना पाझर फुटला नसल्याचे म्हटले जात आहे. हा सर्व घटनाक्रमा पाहता अटक झालेले वैष्णवीच्या सासरकडच्या या पाचही जणांना मानुसकिचा कुठलाही धर्म नसल्याचे दिसते, तेव्हा त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी होत आहे. सध्या वैष्णवी ( vaishanavi Hagwane ) हिचे 10 महिन्याचे बाळ तिच्या माहेरी म्हणजे कस्पटे कुटुंबाकडे सुखरूप आहे. 

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored