Translate :

Sponsored

Vaishanavi Hagwane Case Update, Vaishanavi’s Baby Custody : वैष्णवीचे बाळ आता आजोळी वाढणार, बाल कल्याण समितीचा निर्णय

Vaishanavi Hagwane Case Update : वैष्णवी हगवणे हीने आत्महत्या केल्यापासून तिच्या बाळकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. बाळचा निर्णय बाल कल्याण समितीने घेतला आहे. या केस मधील वैष्णवीच्या बाजूने झालेला हा पहिली न्यायपूर्ण घटना म्हणता येईल.

पुणे : 2025-05-30

पुणे जिल्ह्यातील मुळशी येथील वैष्णवी हगवणे हीने 16 मे ला रहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यादिवसापासून तिच्यासह तिच्या 9 महिन्याच्या बाळविषयी हळहळ व्यक्त होत होती. तिच्या नंतर तिच्या बाळाचे संगोपन कोण करणार ? हा प्रश्न एरणीवर होता. हगवणे कुटुंबीय जेल मध्ये असल्याने हा प्रश्न उपस्थित केला जात होता.  आता बाल कल्याण समितीने या समस्येवर योग्य तोडगा काढला आहे. वैष्णवीचा 9 महिन्याचा मुलगा जनक हगवणे याला आता त्याची आजी म्हणजे वैष्णवीची आई स्वाती कस्पटे यांच्या स्वाधीन केले आहे. 

वैष्णवीच्या 9 महिन्याच्या मुलाचा सांभाळ करण्यासाठी स्वाती कस्पटे या योग्य व्यक्ती आहेत. असा निर्वाळा बाल कल्याण समितीने दिला आहे. ही माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली एक्स या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. 

काय म्हणाल्या मंत्री आदिती तटकरे ? (Aditi Tatkare )

पुण्यातील स्व.वैष्णवी हगवणे (Vaishanavi Hagwane ) यांच्या मृत्यूपश्चात त्यांचा 9 महिन्याचा मुलगा जनक हगवणे याचा सांभाळ करण्यासाठी बाल कल्याण समितीने त्याच्या आजी व स्व. वैष्णवी हगवणे यांच्या आई श्रीमती स्वाती हगवणे यांना योग्य व्यक्ती (Fit Person ) म्हणून नियुक्त केले आहे. याबाबत जिल्हा संरक्षण अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या सामाजिक तपासणी अहवालानुसार श्रीमती स्वाती कस्पटे याच योग्य व्यक्ती असून त्यांचे सामाजिक. भावनिक आणि कौटुंबिक वातावरण बालकाच्या हितासाठी अनुकूल आहे. 

यापुढे स्व. वैष्णवी हगवणे यांचा मुलगा कु.जनक हगवणे यांचा कायदेशीर ताबा श्रीमती स्वाती कस्पटे यांच्याकडे असेल. बालकाच्या शिक्षणाची, आरोग्याची व सर्वांगीण विकासाची संपू्र्ण जबाबदारी श्रीमती स्वाती कस्पटे यांची असेल, असे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे. 

सध्या राज्यात वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने संतापाची लाट उसळलेली आहे. सध्या संपूर्ण हगवणे कुटुंबीय पोलीसांच्या ताब्यात आहे. जनक हगवणे याची कस्टडी कस्पटे कुटुंबाकडे देऊन, प्रशासनाने वैष्णवीला काही अंशी न्याय दिल्याची भावना व्यक्त होत आहे. 

 

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored