Translate :

Sponsored

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात मोठी घडामोड ; 1670 पानांचे आरोपपत्र दाखल ; ठोस पुरावे जमवले : Big Developments in Vaishanavi Hagvane sucide Case ; 1670 Page Chargessheet Filed.

Vaishanavi Hagvane sucide Case : अवघ्या महाराष्ट्राला हदरवून सोडणाऱ्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आता मोठी घडामोड आहे. वैष्णवीच्या आत्महत्येच्या तब्बल 58 दिवसांनंतर आरोपींवर चार्जशीट फाईल केले गेले आहे. 

पुणे : 15/07/2025

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात , तिचा पती, सासरा, सासू, दिर आणि नणंद यांच्यासह एकुण 11 जणांवर सोमवारी प्रथम श्रेणी न्याय मॅजिस्ट्रेट अलीशा बागल यांच्यासमोर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तब्बल 1670 पानांचे हे आरोपपत्र आहे. या संबंधात बावधन पोलीसांकडून सांगण्यात आले आहे की,11 आरोपींच्या विरोधात ठोस पुरावेही सादर करण्यात आले आहेत. या प्रकरणात सरकारी वकिल म्हणून प्रसिद्ध वकिल उज्ज्वल निकम यांना नियुक्त करण्यात आले आहे.

वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येला 58 दिवस उलटून गेल्यानंतर हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. वैष्णवीला तिचा पति शशांक राजेंद्र हगवणे (वय 27 ). सासरा राजेंद्र हगवणे (वय 63), सासू लता राजेंद्र हगवणे (वय 54 ), नणंद करिश्मा हगवणे (वय 31 ), दिर सुशील राजेंद्र हगवणे ( वय 27 ) सर्वजण मुक्ताई गार्डन, भुकुम परिसर येथील रहिवाशी आहेत, या सर्वांनी वैष्णवीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे. आत्महत्या करण्यासाठी तिला मारझोड करण्यात आली, तिचा अनन्वित छळ केला आणि तिच्या बाळाला बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवले. 

पोलिसांनी 11 आरोपींविरोधात पुरावे गोळा केले आहेत  (Vaishanavi Hagvane sucide Case)

वैष्णवीच्या नातेवाईकांना पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावणाऱ्या निलेश चव्हाण (वय 35, कर्वेनगर ), आत्महत्येच्या घटनेनंतर पळून गेलेल्या राजेंद्र हगवणे आणि सुशिल हगवणे यांना आश्रय देणाऱ्या प्रीतम वीरकुमार पाटील (वय 47, कोंगोली, तालुका निपाणी, बेळगाव, कर्नाटक ) , मोहन उर्फ बंडू उत्तमराव भेगाडे (वय 59, रहाणार भेगादेवस्ती, वडगांव ,मावळ ) बंडू लक्ष्मण फाटक (वय 55, निवासी भांगरवाडी, लोणावळा) अमोल विजय जाधव (वय 35 ) आणि राहुल दशरथ जाधव (वय 45 दोघे निवासी पुसेंगाव, तालुका खटाव, सातारा) या सर्वांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 

16 मेला केली होती वैष्णवीने आत्महत्या (Vaishanavi Hagvane sucide Case)

महाराष्ट्राला सुन्न करणारी अशी ही घटना होती. वैष्णवी हगवणे (वय 24 ) हीने हुंडा आणि जमिन खरेदीसाठी सासरच्यांकडून होणाऱ्या कंटाळून शारिरिक आणि मानसिक छळाला कंटाळून 16 मेला आत्महत्या केली होती. स्वतःच्या घरात गळफास घेऊन तिने आपले आयुष्य संपवले. 

लता आणि करिश्मा हगवणे आणि निलेश चव्हाण यांचा जामिनासाठी अर्ज (Vaishanavi Hagvane sucide Case)

येरवडा जेल मध्ये न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या 6 आरोपींपैकी लता हगवणे, करिश्मा हगवणे आणि निलेश चव्हाण यांनी सत्र न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. यापैकी निलेश चव्हाणच्या याचिकेवर आज सुनावणी होणार होती. लता आणि करिश्मा हगवणे यांच्या अर्जावर 25 जुलैला सुनावणी होणार आहे. या जामिनावरील सुनावणी नंतर सर्व आरोपींवर गुन्हा दाखल होऊन, मगच केसची सुनावणी सुरू होणार आहे. 

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored