US Iran Conflict : ट्रम्प यांनी खोमेनेईच्या मृत्यूनंतर इराणला गंभीर इशारा दिला आहे. इराणने प्रत्युत्तरात हल्ले केल्यास त्यांना योग्य उत्तर देण्यात येईल असे त्यांनी म्हटले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
वॉशिंग्टन : 01-03-2026
अमेरिका-इस्रायलच्या (US Iran Conflict) संयुक्त लष्करी कारवाईने इराणमध्ये प्रचंड अशांतता पसरली आहे. या कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशभरातील शिया मुस्लिम आणि खेमनेई समर्थाकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्डसने देखील खामेनेईंच्या मृत्यूची पुष्टी करत इस्रायल आणि अमेरिकेला बदल्याचा इशारा दिला आहे. दरम्यान या इशाऱ्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर देत इराणला नष्ट करण्याचे संकेत दिले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणला नष्ट करण्याचे संकेत (US Iran Conflict)
डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलच्या हल्ल्यात खोमेनेईंच्या मृत्यूची पुष्टी ट्रुथ सोशल मीडियावरून केली. यानंतर त्यांनी आणखी एक पोस्ट करत इराणला गंभीर इशारा दिला. त्यांनी म्हटले की, नुकतेच इराणला ते भीषण हल्ला करणार आहेत जो आतापर्यंत कधीच कोणी पाहिला नसे असे विधाने आले आहे. परंतु, इराणने अमेरिका- किंवा इस्रायलवर प्रतिहल्ला केल्यास आम्ही अशा शक्तीने हल्ला करू की जगाने आजवर पहिला नसेल.सध्या ट्रम्प यांच्या या विधानामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. इस्रायल-इराण तणाव शिगेला पोहोचला आहे.
ट्रम्प यांनी खामेनेईंच्या मृत्यूची माहिती देताना म्हटले होते की, इतिहासातील सर्वात क्रूर व्यक्ती मारली गेली असून हा संपूर्ण जगासाठी मोठा न्याय आहे. त्यांच्या या विधानावरून ट्रम्प खामेनेईंच्या मृत्यूनंतर आनंदात असल्याचेही स्पष्ट होते.
इराणच्या निशाण्यावर इस्रायलचे पंतप्रधान (US Iran Conflict)
याच वेळी इराणकडून इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना मारण्याची धमकी मिळाली आहे. इराणच्या सरकारी माध्यमाने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमधून संकेत मिळाले आहेत की, नेतन्याहूंच्या जीवाला धोका असून लवकरच त्यांचा खात्मा होण्याची शक्यता आहे.
इराणची सुत्रे कोणाच्या हाती ? (US Iran Conflict)
सध्या इराणमध्ये खामेनेईंच्या मृत्यूनंतर 40 दिवसांचा तर अरब देशांमध्ये 30 दिवसांचा दुखवटा जाहीर कऱण्यात आला आहे. तसेच खामेनेईंच्या धाकटा मुलगा मोजतबा खामेनेई याने देशाची तात्पुरती हाती घेतली आहे. सध्या जगभरात खामेनेईंच्या मृत्यूचा बदला आणि वडिलांच्या मृत्यूचा बदला घेतला जाणार काय यावर चर्चा सुरू आहे. इराणने प्रतिहल्ल्याचे संकेतही दिले आहेत.