Translate :

Sponsored

UNESCO : छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले आता जागतिक वारसा स्थळं म्हणून घोषित; महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद ; काय होणार याचा फायदा ? : Chatrapati Shivaji Maharaj Forts Being Included In UNESCO List And Receiving World Heritage Site Status .

Shivaji Maharaj Forts in  UNESCO list : महाराष्ट्रासाठी आणि शिवराय प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. युनेस्कोने जागतिक पर्यटन स्थळांच्या यादीत आता शिवाजी महाराजांच्या एकुण 12 किल्ल्यांना पसंदी दिली आहे. याचा काय फायदा होणार आहे ? हे जाणून घेऊ. 

मुंबई : 12/07/2025

शिवरायांच्या एकुण 12 किल्ल्यांना युनेक्सोने वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले आहे. या निर्णयामुळे शिवराय प्रेमी आणि प्रत्येक महाराष्ट्रवासीयाला आनंद झाला आहे. जागतिक वारसा यादीत समाविष्ठ झालेल्या किल्ल्यांमध्ये महाराष्ट्रातील 11 आणि तमिळनाडूमधील एक किल्ला यांचा समावेश आहे. 

जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झालेले किल्ले

रायगड, राजगड. प्रतापगड, पन्हाळा. शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि जिंजी.

युनेस्कोच्या यादीत समावेश झाल्यास किंवा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्यानंतरचा फायदा

युनेस्कोच्या यादीत एखाद्या स्थळाचा समावेश झाल्यास किंवा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्यावर त्याचे अनेक फायदे मिळतात. UNESCO च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्यानंतर त्या देशाला आणि जिथे ते स्थळ आहे त्या प्रदेशाला अनेक फायदे होतात. जागतिक स्तरावर त्या ऐतिहासिक स्थळाचे महत्त्व अधोरेखित होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिष्ठा वाढते. समावेश झालेल्या स्थळाच्या संरक्षण आणि जतनासाठी युनेस्को कडून आर्थिक सहाय्य मिळण्याती शक्यता असते. त्यामुळे त्या त्या प्रदेशाचे पर्यटन वाढून, रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतात. जागतिक स्तराचा दर्जा मिळाल्याने त्या स्थळाचा, त्याच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. 

UNESCO ने शिवरायांच्या 13 गड-किल्ल्यांना जागतिक स्तराचा दर्जा दिल्याने शिवरायांच्या गडांचे आता संवर्धन होण्यास चालना मिळणार आहे. महाराष्ट्रातील पर्यटनालाही याचा फायदा होणार आहे. 

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored