Translate :

Sponsored

Umarati Raid, Pune Crime News, Big News : ‘उमराटी’ छाप्यानंतर आता पुणे पोलीसांचा मोर्चा शहरातील सराईत गुन्हेगारांकडे : After Umrati raid, Pune Police will Serches city Criminals

'उमराटी’ छाप्यानंतर आता पुणे पोलीसांचा मोर्चा शहरातील सराईत गुन्हेगारांकडे

Umarati Raid, Pune Crime News : नुकतीच पुणे पोलिसांनी मध्यप्रदेश-महाराष्ट्र सीमेजवळील उमरटी या ठिकाणी मोठा छापा टाकत कारवाई केली. या कारवाईनंतर त्यांनी शहरातही गुन्हेगारीवर नजर ठेवत आपला मोर्चा शहरातील सराईत गुन्हेगारांकडे वळवला आहे.

पुणे :25/11/2025

मध्य प्रदेशातील उमराटी गावात छापा टाकून शस्त्रसाठ्यांचे अड्डे आणि शस्त्र बनविणाऱ्या ५० भट्ट्या नष्ट करून शस्त्रसाठे जप्त (Umarati Raid, Pune Crime News)  केल्यानंतर आता पुणे पोलिसांकडून शहरातील सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेतली जाणार आहे. या झाडाझडतीमध्ये यापूर्वी बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या सराइतांची चौकशी केली जाणार आहे.

पुणे पोलीसांची मोठी कारवाई (Umarati Raid, Pune Crime News)

मध्य प्रदेशमहाराष्ट्र सीमेजवळ असलेल्या उमराटी गावात पुणे पोलिसांच्या १०५ जणांच्या पथकाने छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी पिस्तूल, मॅगझिन, पिस्तूल तयार करण्यासाठी लागणारे सुट्टे भाग, तसेच अन्य साहित्य असा मुद्देमाल जप्त करून सनीभाई चावला (३७), जसबिरसिंग प्रकाशसिंग चावला (२२), प्रवीणसिंग उत्तमसिंग टकराना (२२), राजपालसिंग प्रधानसिंग जुनेजा (३६), अलोकसिंग जोहरसिंग बर्नाला (२७), नानाकसिंग अजितसिंग बर्नाला (३२), गुरुचरणसिंग बर्नाला (२३, सर्व रा. उमराटी, जि. बडवानी, मध्य प्रदेश) यांना अटक केली. उमाराटीतील कारागिरांनी गेल्या सहा ते सात वर्षात सराईतांना देशी बनावटीच्या ७०० ते ८०० पिस्तुलांची विक्री केल्याचे समोर आले आहे. अटक आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडी दिली आहे.

काही खुन प्रकरणांमध्ये ‘उमराटीट कारागिरांच्या पिस्तुलांचा वापर (Umarati Raid, Pune Crime News)

दरम्यान, उमराटी येथील कारागिरांनी तयार केल्या पिस्तुलांची विक्री मध्यस्थांमार्फत पुण्यातील गुंड टोळ्यांतील सराइतांना केली आहे. शरद मोहोळ, वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपींनी येथील कारागिरांनी तयार केलेल्या पिस्तुलांचा वापर केल्याची माहिती उजेडात येत आहे.या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शहरातील सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये यापूर्वी बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या सराइतांची चौकशी केली जाणार असल्याचे पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी सांगितले.

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored