युक्रेन : 2025-05-01
अनेक महिने संपर्कात नसणाऱ्या येक्रेनियन पत्रकार (Ukrainian journalist )व्हिक्टोरिया रोश्चिना (Victoria Roschyna) यांचा मृतदेह रशियाने येक्रेनच्या ताब्यात दिला आहे, असे युक्रेनियन फिर्यादी प्रवक्त्याने सांगितले आहे.
किव यांनी सांगितले आहे की, रशिया आणि युक्रेन युद्धाचे वार्तांकन करणाताना बेपत्ता झालेल्या महिला पत्रकार व्हिक्टोरिया रोश्चिना यांचे अवशेष परत करण्यात आले आहे. अनेक त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. फेब्रुवारीमध्ये युक्रेन आणि रशियामधील युद्धादरम्यानच्या देवाणघेवाणीच्या प्रक्रियेतून, त्यांचा हा मृतदेह आमच्या ताब्यात देण्यात आला आहे.
युक्रेनियन युद्ध विभागातील गुन्हे विभागाचे प्रमुख प्रवत्ता बेलोसोव्हा म्हणाले की, रोश्चिना यांच्या मृतदेहाच्या फॉरेन्सिक तपासणीत ” छळ आणि गैरवर्तनुक झाल्याच्या अनेक खुणा आढळल्या आहेत. ज्यामध्ये शरिराच्या विविध भागांवर ओरखडे आणि रक्तस्राव, तुटलेली बरगडी आणि विजेचे धक्के (शॉक ) दिल्याच्या खुणा आहेत. फॉरेन्सिक विभागाच्या रिपोर्टनुसार, तज्ञांनी असे म्हटले आहे, की रोश्चिना या जिवंत असतानाच या जखमा झाल्या असतील. रशिया युद्धादरम्यान ताब्यात घेतलेल्या लोकांना असे विजेचे धक्के देण्यासाठी ओळखला जातो, असे आजपर्यंतचा इतिहास सांगतो.
बेलौसोव्ह म्हणाले की, रोश्चिना यांच्या मृतदेहाची वारंवार डिएनए चाचणी करण्यात आली आहे. त्यातून हा रोश्चिना यांचाच मृतदेह असल्याचे सिद्ध झाले, परंतु रशियावरून त्यांच्या मृतदेह पाठवताना त्यावर एक अज्ञात पुरूष असे लेबल लावले होते. मृतदेहाच्या स्थितिवरून रोश्चिना यांच्या मृत्यूचे कारण अजून स्पष्ट झाले नाही. त्यासाठी आम्ही आंतरराष्ट्रीय फॉरोन्सिक तज्ञांसोबत काम करत आहोत.
रोश्चिना यांच्या युक्रेनस्का प्रावदा येथील सहकाऱ्यांनी सांगितले की, तिचा मृतदेह रशियाकडून देताना, त्यातील काही अवयव गायब करण्यात आले होते. यातून रशिया तिच्या मृत्यूचे खरे कारण लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट होते. तिच्या मृतदेहाच्या अवशेषांची तपासणी करणाऱ्या पथकाने सांगितले आहे की, मेंदू, डोळ्यांचे बुबुळं, श्वासनलिकेचा काही भाग गायब होत्या.
युक्रेनियन पत्रकार व्हिक्टोरिया रोश्चिना यांच्याविषयी
युक्रेनियन पत्रकार व्हिक्टोिरिया रोश्चिना या ऑगस्ट २०२३ पासून बेपत्ता होत्या. त्यांचा संपर्क तुटला होता. त्या रशियाच्या ताब्यात असणाऱ्या युक्रेनियन भागात त्या गेल्या होत्या. तेथे रहात असणाऱ्या, युद्धाने व्यापलेल्या लोकांच्या जीवनाचे वार्तांकन करण्यासाठी त्या तेथे गेल्या होत्या. रोश्चिना ही एक तरूण, धाडसी पत्रकार होती. रोश्चिना जेव्हा असाईनमेंटवर असताना मेसेजेसला उत्तर देत नव्हती , तेव्हाच तिच्या वडिलांना काहीतरी गडबड असल्याचे जाणवले होते. मात्र जोपर्यंत मॉस्कोने कबुल केले नव्हते की, त्यांनी तिला ताब्यात घेतले आहे, तोपर्यंत त्यांना तिच्या ठावठिकाणा माहित नव्हता. तब्बल नऊ महिन्यापर्यंत तिच्याविषयी तिच्या कुटुंबिंयांना तिची काहीही माहिती नव्हती. रशियाने तिच्यावर कुठलाही खटला न चालवता, कोणताही आरोप न करता त्यांच्या ताब्यात ठेवले होते. सप्टेंबर 2024 पर्यंत या तरूण, तडफदार पत्रकार महिलेचा मृत्यू झाला होता.