आंतरराष्ट्रीय : 2025-05-16
‘ॲपल’ ने ( Apple iphone) आपल्या आयफोनचं उत्पादन करू नये, ते अमेरिकेतच सुरू करावं, अशी सूचना मी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कूक यांना दिल्याची माहीती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Trump ) यांनी दिली. सध्या ते पश्चिम आशियाच्या दौऱ्यावर असून त्यांनी कतारची राजधानी दोहा येथे माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बऱ्याच विषयांवर बोलले.
माध्यमांनी त्यांच्याशी अनेक विषयांवर संवाद साधला. त्यावेळी एका प्रश्नावर उत्तर देताना, ते म्हणाले ” मी ॲपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम कूक यांच्याशी चर्चा केली. त्यांनी भारतात उत्पादनांची निर्मीती करण्याएवजी अमेरिकेत करावी, अशी सूचना मी केली आहे. टिम हे माझे मित्र आहेत. त्यांना मी नेहमीच चांगली वागणूक दिली आहे. परंतु ते आता भारतात निर्मीती क्षमता वाढवत असल्याचं समोर येत आहे. भारत स्वत:ची काळजी घेऊ शकतो. माझ्या सूचनेनुसार ॲपलचे अमेरिकेतील उत्पादनांची निर्मीती क्षमता वाढवली जाणार आहे.
ट्रम्प (Trump ) यांच्या या विधानामुळे दिल्लीत चर्चांना उधाण आले आहे. सरकारने ॲपल मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधण्यात आला आहे. त्यांच्याकडून भारतातील गुंतवणूक काढून घेत नसल्याचे, ती गुंतवणूक कायम आहे, असे सांगण्यात आले आहे. अशी हमी ॲपलच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. ॲपल ने चीनमधील आपले उत्पादन घटवले आहे. आणि हा कमी केलेला व्यवसाय भारताकडे वळवण्यात आला आहे. सध्या ॲपल कंपनीच्या सुत्रांकडून अधिकृत कोणतीही माहिती मिळालेली नाही.